रत्नागिरी येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे गेली सहा दशके रंगदेवतेची पूजा बांधणाऱ्या एका निरलस पुजाऱ्याचा गौरव आहे. अकोला या आडवळणाच्या गावचा लौकिक जाधव, जाधव, राम
रसिकाश्रयी असा आहे. नाटक जगवण्याचा अकोलेकरांचा ध्यास खूप जुना आहे. बालगंधर्वाची नाटय़ संस्था कर्जाच्या ओझ्याखाली दबली तेव्हा नाटय़रसिकांनी पुढाकार घेऊन हे कर्ज फेडले आणि बालगंधर्वाना सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले,
असा गौरवपूर्ण इतिहास अकोलेकरांचा आहे. याच शहरात इतिहास, सूतकताई आणि शारीरिक शिक्षण हे विषय तरुण वयात शिकवणारा राम जाधव नावाचा एक ‘वेडा’ गेली साठ वर्षे रंगदेवतेच्या पूजेत तन्मयतेने सहभागी झाला. राम जाधव रंगदेवतेची सेवा करत नाहीत पूजा करतात इतका भक्तिभाव त्यांच्या मनात आहे. ‘रसिकाश्रय’ ही नाटय़चळवळ १९६० साली संस्थारूपाने सुरू केली. येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत रसिकाश्रय ही संस्था सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असतानाच या संस्थेच्या शिरोमणीची अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी आणि तीही बिनविरोध हा सुवर्णकांचन योगच म्हणायला हवा. राम जाधव मुळचे बुलढाणा जिल्ह्य़ातले. साडेसहा दशकापूर्वी ते शिक्षणासाठी अकोल्याला आले आणि सर्वार्थाने अकोलेकर झाले. रेल्वेत तिकीट निरीक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सततची फिरती आणि रंगभूमीची पूजा या दोन्ही आघाडय़ांवर ‘मामा’ म्हणून अकोल्यात आणि मराठी नाटय़ परिवारात परिचित असलेल्या राम जाधव यांनी स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवली. त्या काळात म्हणजे १९५० च्या दशकात आंतरधर्मीय विवाह करून खळबळ माजवणाऱ्या आणि कायद्याची पदवी संपादन केलेल्या राम जाधव यांनी नंतरच्या आयुष्यात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि नाटय़ चळवळीला रसिकाश्रय मिळवून देण्यासाठी कोणत्याही पदाची तसेच, सन्मानाची अपेक्षा न बाळगता सक्रिय असणारा निरलस कार्यकर्ता, अशी विविधांगी कामगिरी बजावली. या सहा दशकात सुमारे ९० नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली. यात ३ संगीत नाटके आणि ४ हिन्दी नाटकांचा समावेश आहे. विजया मेहता यांच्या संपर्कात आल्यावर १० बालनाटकांची निर्मिती करतानाच विजया मेहता यांनी आयोजित केलेल्या तसेच, विजया मेहता यांच्या नेतृत्वाखाली न झालेल्याही शेकडो नाटय़ प्रशिक्षण शिबिरात एक प्रशिक्षक म्हणून राम जाधव सहभागी झाले. जे काही करायचे ते नीट नेटकेच असले पाहिजे, असा आग्रही कटाक्ष बाळगणारा राम जाधव ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जातात. तरी विविध उपक्रमात सहभागी होताना कोणताही तोरा न बाळगता किंवा इतक्या प्रदीर्घ अनुभवाने आपण नाटय़ चळवळीतले ‘महागुरू’ झालो आहोत, असा अहं न दर्शविता सतरंजी उचलणारा-टाकणारा कार्यकर्ता ते प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकात राम जाधव लीलया वावरले. रंगदेवतेची पूजा हीच इतिश्री न मानता भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धातील मृतांच्या वारशांसाठी निधी संकलन, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणे अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमात स्वत: आणि रसिकाश्रयच्या सहकाऱ्यांसह धावून जाण्याची संवेदनशीलताही राम जाधव यांनी दाखवली. मराठी रंगभूमीच्या इतिहासात मलाचा दगड धरलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे संक्षिप्तीकरण करण्याचा धाडसी आणि आवाहनात्मक प्रयोगही राम जाधव यांनी यशस्वीपणे पेलला. ‘संक्षिप्त मी नटसम्राट’ हे एक आव्हान असून प्रत्येक प्रयोगात आणखी कठीण होऊन ते आव्हान खुणावत असते, असे सांगत गेली १३ वर्षे राम जाधव हे आव्हान तेवढय़ाच तन्मयतापूर्ण भाविकपणे पेलत आहेत. अकोलेकरांचा नाटय़चळवळीला आश्रय सक्रियपणे देण्याची परंपराही या काळात राम जाधव यांनी एखाद्या व्रतासारखी पाळली आहे. वृद्ध कलावंतांचा उचित गौरव आणि त्यांना सहाय्य मिळवून देण्यासाठी वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी राम जाधव यांची धडपड आजही सुरू आहे. रसिक मराठी नाटकापासून दुरावत आहेत कारण, त्यांच्या आवडी-निवडीचा विचारच केला जात नाही, अशी खंत राम जाधव यांना आहे. या संदर्भात ठोस काही तरी करण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेली सहा दशके अशा विविध भूमिकात अग्रणी राहूनही प्रसिद्धीची हौस न बाळगलेल्या राम जाधव यांची नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या चाहत्यांना सुखावणारी आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यानंतर म्हणजे सुमारे ४० वर्षांनंतर हा बहुमान विदर्भाच्या वाटय़ाला आला आहे, याचेही अप्रुप वैदर्भीयांना असणे स्वाभाविकच म्हणायला हवे.
-------------------------------------------------
राम जाधव - त्यांचा रसिकाश्रय
भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, सतत नाविन्याचा शोध ही वैशिष्ट्यं असलेले अकोल्याचे राम जाधव नाट्यसंमेलनाध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत...
बुलडाण्यात लेखक-कलावंतांची उत्तम निपज होते, असं म्हणतात. राम जाधव हेही बुलडाण्याचेच. तिथून आपलं कलावंतपण घेऊन अकोल्याला नोकरीच्या निमित्ताने आले आणि तिथेच रूजले.
' रसिकाश्रय' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. कुठल्याही कलावंतानं आणि रसिकानं हक्कानं आश्रयाला यावं, असं हे कलाघर. ही गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची. गेल्या पन्नास वर्षांत रसिकाश्रयचा पसारा इतका वाढत गेला की या वडाच्या पारंब्या पुन्हा मातीत रूजल्या, फांद्यांना फांद्या फुटत गेल्या आणि आज रसिकाश्रयचा हा एकमेव बुंधा स्वत:च त्या झाडाच्या सावलीत बसून वरचा विस्तार शांतपणे बघतो आहे. हौशी रंगभूमीच्या इतिहासात एक संस्था एकाच माणसाच्या आधारावर पन्नास वर्षं टिकल्याचं दुसरं उदाहरण नाही.
राम जाधवांकडे नाट्यसंमेलनाध्यक्षपद चालत येण्यासाठी एवढं कर्तृत्वही पुरेसं आहे. पण त्यांचं काम तेवढंच नाही. केवळ संस्था उभी करणं आणि ती जिवंत ठेवणं हे अवघड असलं तरी अशक्य नाही. पण ती संस्था चाकोरीबाहेरचे मार्ग चोखाळत धगधगती ठेवणं, तिला ऊर्जा पुरवत राहाणं हे मात्र कठीण काम आहे. जाधव मामांचा पिंड हा जात्याच प्रयोगशील रंगकर्मीचा होता, त्यामुळे सतत वेगळ्या वाटेने जात राहाणं हे त्यांचं भागधेय बनलं. पण ते ज्या भौगोलिक परिसरात राहात होते तिथे राहून वेगळेपणाचा वसा घेणं, हे महाकठीण काम होतं. जाधवमामा ज्या काळात हौशी रंगभूमीवर कार्यरत झाले आणि राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकं करू लागले तो काळच मुळी मराठी रंगभूमीसाठी धामधुमीचा होता. साठ सालानंतर एक नव्या जाणिवेच्या रंगकर्मींची लाटच महाराष्ट्राच्या सर्व भागातून मराठी रंगभूमीवर आली. यात मुंबईतून विजया मेहता, अरविंद देशपांडे होते, पुण्यातून पीडीएचे भालबा केळकर होते, अहमदनगरमधून मधुकर तोरडमल नाटकं घेऊन स्पर्धेत उतरत होते, नागपुरातून पुरूषोत्तम दारव्हेकर येत होते, सोलापुरातून वामन देगांवकर नाटकं करत होते. तुल्यबळांचा मुकाबला राज्य नाट्य स्पधेर्त होत असे. अशा काळात राम जाधव विदर्भातल्या अकोला केंदातून नाटकं करू लागले. त्यांनी स्वत:चं नटपण कमावलेलं होतं. भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, नाटकाचं अर्थनिर्णयन करण्याची तयारी, सतत नाविन्याचा शोध आणि त्यातून आलेला धाडसीपणा एवढ्या भांडवलावर त्यांनी मुंबई-पुण्याकडच्या मंडळींना आपली दखल घ्यायला लावली. त्यांनी स्पर्धेत सादर करण्यासाठी नाटकं निवडली तीच राष्ट्रीय स्तरावर गाजलेली झालेली 'एवम् इंदजीत', 'आषाढ का एक दिन', 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'आणि एक दोणाचार्य', 'उद्ध्वस्त धर्मशाळा' अशी. ही नाटकं अकोल्यातील नाटकवेड्यांना बिल्कुल परिचयाची नव्हती. त्यामुळे त्यांच्या निवडीची चेष्टाही झाली. पण जाधव-मामांनी नेटाने ती केली. या अनवट नाटकांसाठी नटसंच तयार करण्याची, त्यांची तयारी करवून घेण्याची जबाबदारीही त्यांनी न कंटाळता पार पाडली.
जाधवांच्या व्यक्तिमत्त्वात जसा एक नाटक्या आहे तसाच एक कार्यकर्ताही आहे आणि खमक्या संयोजकही आहे. आपल्या गावातल्या लोकांना नव्या संवेदनेच्या नाटकांसाठी तयार करायचं असेल, नवी अभिरुची घडवायची असेल तर नाटकाच्या बरोबरीने काव्यवाचन, नामवंतांच्या मुलाखती, चर्चा-परिसंवाद असेही कार्यक्रम आयोजित करायला हवेत आणि त्यासाठी नव्या विचारांच्या रंगकर्मींना सतत आपल्या परिसरात बोलवायला हवं, हे ओळखून त्यांनी रसिकाश्रयच्या छत्राखाली मुक्त व्यासपीठच उभं केलं. वसंतराव देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेलं ८२वं नाट्य संमेलन अकोल्यात भरवण्याचं धाडसही त्यांनी त्यापोटीच केलं. याच संमेलनात 'घाशीराम कोतवाल'वरचा परिसंवाद गाजला होता. याच संमेलनात नेते आपले राजकारणाचे जोडे बाजूला काढून चक्क श्रोत्यांतच बसले होते. याच संमेलनात राम जाधवांनी सादर केलेलं चिं. त्र्यं. खानोलकरांचं 'दोन पिकली दोन हिरवी' हे नाटक (ज्याची रंगावृत्ती कमलाकर सोनटक्के आणि बापू लिमये यांनी केली होती) सर्वत्र चचिर्लं गेलं. संमेलन भव्य झालं, मामांच्या कुशल संयोजनाची ग्वाही सगळीकडे फिरली. पण खर्च अंगाबाहेर गेला. तो निस्तरण्या-साठी जाधवमामांनी 'दोन पिकली'चे प्रयोग लावले. पन्नास-साठ प्रयोगांतून सुमारे दीड लाख रूपये उभे केले आणि देणेक-यांची तोंडं बंद केली. प्रसंगी पदरचे पैसे घातले. पण याबद्दल त्यांनी कधी वाकडा शब्द काढला नाही. प्रायोजक मिळवून संमेलनं फायद्यात नेण्याच्या आजकालच्या दिवसांत मामांचा तो व्यवहार आज चेष्टेचा विषय ठरेल, पण त्यांनी तो कोणतीही वाच्यता न करता निभावला. त्यांचा ऋजु स्वभाव आणि दांडगा लोकसंपर्क या दोन गुणांनी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा तोल कधीच ढळू दिला नाही.
रेल्वेतली टीसीची नोकरी त्यांनी आनंदाने केली याचं एकमेव कारण त्यांना त्यानिमित्ताने सर्वत्र संचार करण्याची मिळालेली संधी, हेच असावं. आपलं नाट्यवेड जपण्यासाठीच त्यांनी नोकरीत मिळणारी बढती नाकारली आणि टीसीच राहाणं पसंत केलं. सर्व संमेलनांना हजर राहाणं, नाटकाच्या सेन्सॉरबोर्डात सतत क्रियाशील राहाणं, अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी भ्रमंती करणं हे सगळं वयाच्या पंच्याहत्तरीतही ते तबीयतीने करतात. काही वर्षांपूर्वी 'नटसम्राट' संक्षिप्त स्वरूपात सादर करण्याचा वेगळा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. शिरवाडकरांच्या या नाटकातली सगळी स्वगतं एका सूत्रात गुंफून ती ते एका निवेदिकेच्या मदतीने सादर करीत आणि संपूर्ण 'नटसम्राट' पाहिल्याचा अनुभव देत. विदर्भातल्या रसिकांनी या प्रयोगाची खूप प्रशंसा केली.
तनाने-मनाने सदैव हौशी आणि प्रायोगिकच राहिलेले राम जाधव यांना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मिळणारा मान दुर्लभच म्हटला पाहिजे, कारण व्यावसायिक रंगभूमीभोवतीच बहुतेक वेळा फिरत राहिलेल्या नाट्यसंमेलनाला हौशी नाटकवाल्यांची फारशी आठवण आलेलीच नाही. म्हणूनच यावेळी जाधवमामांचा मान हा आपलाच बहुमान समजून महाराष्ट्रातल्या तमाम हौशी रंगकर्मींनी रत्नागिरीच्या संमेलनाला हजर राहिलं पाहिजे.
रत्नागिरी येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे गेली सहा दशके रंगदेवतेची पूजा बांधणाऱ्या एका निरलस पुजाऱ्याचा गौरव आहे. अकोला या आडवळणाच्या गावचा लौकिक जाधव, जाधव, राम
रसिकाश्रयी असा आहे. नाटक जगवण्याचा अकोलेकरांचा ध्यास खूप जुना आहे. बालगंधर्वाची नाटय़ संस्था कर्जाच्या ओझ्याखाली दबली तेव्हा नाटय़रसिकांनी पुढाकार घेऊन हे कर्ज फेडले आणि बालगंधर्वाना सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले,
असा गौरवपूर्ण इतिहास अकोलेकरांचा आहे. याच शहरात इतिहास, सूतकताई आणि शारीरिक शिक्षण हे विषय तरुण वयात शिकवणारा राम जाधव नावाचा एक ‘वेडा’ गेली साठ वर्षे रंगदेवतेच्या पूजेत तन्मयतेने सहभागी झाला. राम जाधव रंगदेवतेची सेवा करत नाहीत पूजा करतात इतका भक्तिभाव त्यांच्या मनात आहे. ‘रसिकाश्रय’ ही नाटय़चळवळ १९६० साली संस्थारूपाने सुरू केली. येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत रसिकाश्रय ही संस्था सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असतानाच या संस्थेच्या शिरोमणीची अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी आणि तीही बिनविरोध हा सुवर्णकांचन योगच म्हणायला हवा. राम जाधव मुळचे बुलढाणा जिल्ह्य़ातले. साडेसहा दशकापूर्वी ते शिक्षणासाठी अकोल्याला आले आणि सर्वार्थाने अकोलेकर झाले. रेल्वेत तिकीट निरीक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सततची फिरती आणि रंगभूमीची पूजा या दोन्ही आघाडय़ांवर ‘मामा’ म्हणून अकोल्यात आणि मराठी नाटय़ परिवारात परिचित असलेल्या राम जाधव यांनी स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवली. त्या काळात म्हणजे १९५० च्या दशकात आंतरधर्मीय विवाह करून खळबळ माजवणाऱ्या आणि कायद्याची पदवी संपादन केलेल्या राम जाधव यांनी नंतरच्या आयुष्यात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि नाटय़ चळवळीला रसिकाश्रय मिळवून देण्यासाठी कोणत्याही पदाची तसेच, सन्मानाची अपेक्षा न बाळगता सक्रिय असणारा निरलस कार्यकर्ता, अशी विविधांगी कामगिरी बजावली. या सहा दशकात सुमारे ९० नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली. यात ३ संगीत नाटके आणि ४ हिन्दी नाटकांचा समावेश आहे. विजया मेहता यांच्या संपर्कात आल्यावर १० बालनाटकांची निर्मिती करतानाच विजया मेहता यांनी आयोजित केलेल्या तसेच, विजया मेहता यांच्या नेतृत्वाखाली न झालेल्याही शेकडो नाटय़ प्रशिक्षण शिबिरात एक प्रशिक्षक म्हणून राम जाधव सहभागी झाले. जे काही करायचे ते नीट नेटकेच असले पाहिजे, असा आग्रही कटाक्ष बाळगणारा राम जाधव ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जातात. तरी विविध उपक्रमात सहभागी होताना कोणताही तोरा न बाळगता किंवा इतक्या प्रदीर्घ अनुभवाने आपण नाटय़ चळवळीतले ‘महागुरू’ झालो आहोत, असा अहं न दर्शविता सतरंजी उचलणारा-टाकणारा कार्यकर्ता ते प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकात राम जाधव लीलया वावरले. रंगदेवतेची पूजा हीच इतिश्री न मानता भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धातील मृतांच्या वारशांसाठी निधी संकलन, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणे अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमात स्वत: आणि रसिकाश्रयच्या सहकाऱ्यांसह धावून जाण्याची संवेदनशीलताही राम जाधव यांनी दाखवली. मराठी रंगभूमीच्या इतिहासात मलाचा दगड धरलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे संक्षिप्तीकरण करण्याचा धाडसी आणि आवाहनात्मक प्रयोगही राम जाधव यांनी यशस्वीपणे पेलला. ‘संक्षिप्त मी नटसम्राट’ हे एक आव्हान असून प्रत्येक प्रयोगात आणखी कठीण होऊन ते आव्हान खुणावत असते, असे सांगत गेली १३ वर्षे राम जाधव हे आव्हान तेवढय़ाच तन्मयतापूर्ण भाविकपणे पेलत आहेत. अकोलेकरांचा नाटय़चळवळीला आश्रय सक्रियपणे देण्याची परंपराही या काळात राम जाधव यांनी एखाद्या व्रतासारखी पाळली आहे. वृद्ध कलावंतांचा उचित गौरव आणि त्यांना सहाय्य मिळवून देण्यासाठी वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी राम जाधव यांची धडपड आजही सुरू आहे. रसिक मराठी नाटकापासून दुरावत आहेत कारण, त्यांच्या आवडी-निवडीचा विचारच केला जात नाही, अशी खंत राम जाधव यांना आहे. या संदर्भात ठोस काही तरी करण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेली सहा दशके अशा विविध भूमिकात अग्रणी राहूनही प्रसिद्धीची हौस न बाळगलेल्या राम जाधव यांची नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या चाहत्यांना सुखावणारी आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यानंतर म्हणजे सुमारे ४० वर्षांनंतर हा बहुमान विदर्भाच्या वाटय़ाला आला आहे, याचेही अप्रुप वैदर्भीयांना असणे स्वाभाविकच म्हणायला हवे.
————————————————-
राम जाधव – त्यांचा रसिकाश्रय
भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, सतत नाविन्याचा शोध ही वैशिष्ट्यं असलेले अकोल्याचे राम जाधव नाट्यसंमेलनाध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत…
बुलडाण्यात लेखक-कलावंतांची उत्तम निपज होते, असं म्हणतात. राम जाधव हेही बुलडाण्याचेच. तिथून आपलं कलावंतपण घेऊन अकोल्याला नोकरीच्या निमित्ताने आले आणि तिथेच रूजले.
‘ रसिकाश्रय’ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. कुठल्याही कलावंतानं आणि रसिकानं हक्कानं आश्रयाला यावं, असं हे कलाघर. ही गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची. गेल्या पन्नास वर्षांत रसिकाश्रयचा पसारा इतका वाढत गेला की या वडाच्या पारंब्या पुन्हा मातीत रूजल्या, फांद्यांना फांद्या फुटत गेल्या आणि आज रसिकाश्रयचा हा एकमेव बुंधा स्वत:च त्या झाडाच्या सावलीत बसून वरचा विस्तार शांतपणे बघतो आहे. हौशी रंगभूमीच्या इतिहासात एक संस्था एकाच माणसाच्या आधारावर पन्नास वर्षं टिकल्याचं दुसरं उदाहरण नाही.
राम जाधवांकडे नाट्यसंमेलनाध्यक्षपद चालत येण्यासाठी एवढं कर्तृत्वही पुरेसं आहे. पण त्यांचं काम तेवढंच नाही. केवळ संस्था उभी करणं आणि ती जिवंत ठेवणं हे अवघड असलं तरी अशक्य नाही. पण ती संस्था चाकोरीबाहेरचे मार्ग चोखाळत धगधगती ठेवणं, तिला ऊर्जा पुरवत राहाणं हे मात्र कठीण काम आहे. जाधव मामांचा पिंड हा जात्याच प्रयोगशील रंगकर्मीचा होता, त्यामुळे सतत वेगळ्या वाटेने जात राहाणं हे त्यांचं भागधेय बनलं. पण ते ज्या भौगोलिक परिसरात राहात होते तिथे राहून वेगळेपणाचा वसा घेणं, हे महाकठीण काम होतं. जाधवमामा ज्या काळात हौशी रंगभूमीवर कार्यरत झाले आणि राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकं करू लागले तो काळच मुळी मराठी रंगभूमीसाठी धामधुमीचा होता. साठ सालानंतर एक नव्या जाणिवेच्या रंगकर्मींची लाटच महाराष्ट्राच्या सर्व भागातून मराठी रंगभूमीवर आली. यात मुंबईतून विजया मेहता, अरविंद देशपांडे होते, पुण्यातून पीडीएचे भालबा केळकर होते, अहमदनगरमधून मधुकर तोरडमल नाटकं घेऊन स्पर्धेत उतरत होते, नागपुरातून पुरूषोत्तम दारव्हेकर येत होते, सोलापुरातून वामन देगांवकर नाटकं करत होते. तुल्यबळांचा मुकाबला राज्य नाट्य स्पधेर्त होत असे. अशा काळात राम जाधव विदर्भातल्या अकोला केंदातून नाटकं करू लागले. त्यांनी स्वत:चं नटपण कमावलेलं होतं. भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, नाटकाचं अर्थनिर्णयन करण्याची तयारी, सतत नाविन्याचा शोध आणि त्यातून आलेला धाडसीपणा एवढ्या भांडवलावर त्यांनी मुंबई-पुण्याकडच्या मंडळींना आपली दखल घ्यायला लावली. त्यांनी स्पर्धेत सादर करण्यासाठी नाटकं निवडली तीच राष्ट्रीय स्तरावर गाजलेली झालेली ‘एवम् इंदजीत’, ‘आषाढ का एक दिन’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आणि एक दोणाचार्य’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ अशी. ही नाटकं अकोल्यातील नाटकवेड्यांना बिल्कुल परिचयाची नव्हती. त्यामुळे त्यांच्या निवडीची चेष्टाही झाली. पण जाधव-मामांनी नेटाने ती केली. या अनवट नाटकांसाठी नटसंच तयार करण्याची, त्यांची तयारी करवून घेण्याची जबाबदारीही त्यांनी न कंटाळता पार पाडली.
जाधवांच्या व्यक्तिमत्त्वात जसा एक नाटक्या आहे तसाच एक कार्यकर्ताही आहे आणि खमक्या संयोजकही आहे. आपल्या गावातल्या लोकांना नव्या संवेदनेच्या नाटकांसाठी तयार करायचं असेल, नवी अभिरुची घडवायची असेल तर नाटकाच्या बरोबरीने काव्यवाचन, नामवंतांच्या मुलाखती, चर्चा-परिसंवाद असेही कार्यक्रम आयोजित करायला हवेत आणि त्यासाठी नव्या विचारांच्या रंगकर्मींना सतत आपल्या परिसरात बोलवायला हवं, हे ओळखून त्यांनी रसिकाश्रयच्या छत्राखाली मुक्त व्यासपीठच उभं केलं. वसंतराव देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेलं ८२वं नाट्य संमेलन अकोल्यात भरवण्याचं धाडसही त्यांनी त्यापोटीच केलं. याच संमेलनात ‘घाशीराम कोतवाल’वरचा परिसंवाद गाजला होता. याच संमेलनात नेते आपले राजकारणाचे जोडे बाजूला काढून चक्क श्रोत्यांतच बसले होते. याच संमेलनात राम जाधवांनी सादर केलेलं चिं. त्र्यं. खानोलकरांचं ‘दोन पिकली दोन हिरवी’ हे नाटक (ज्याची रंगावृत्ती कमलाकर सोनटक्के आणि बापू लिमये यांनी केली होती) सर्वत्र चचिर्लं गेलं. संमेलन भव्य झालं, मामांच्या कुशल संयोजनाची ग्वाही सगळीकडे फिरली. पण खर्च अंगाबाहेर गेला. तो निस्तरण्या-साठी जाधवमामांनी ‘दोन पिकली’चे प्रयोग लावले. पन्नास-साठ प्रयोगांतून सुमारे दीड लाख रूपये उभे केले आणि देणेक-यांची तोंडं बंद केली. प्रसंगी पदरचे पैसे घातले. पण याबद्दल त्यांनी कधी वाकडा शब्द काढला नाही. प्रायोजक मिळवून संमेलनं फायद्यात नेण्याच्या आजकालच्या दिवसांत मामांचा तो व्यवहार आज चेष्टेचा विषय ठरेल, पण त्यांनी तो कोणतीही वाच्यता न करता निभावला. त्यांचा ऋजु स्वभाव आणि दांडगा लोकसंपर्क या दोन गुणांनी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा तोल कधीच ढळू दिला नाही.
रेल्वेतली टीसीची नोकरी त्यांनी आनंदाने केली याचं एकमेव कारण त्यांना त्यानिमित्ताने सर्वत्र संचार करण्याची मिळालेली संधी, हेच असावं. आपलं नाट्यवेड जपण्यासाठीच त्यांनी नोकरीत मिळणारी बढती नाकारली आणि टीसीच राहाणं पसंत केलं. सर्व संमेलनांना हजर राहाणं, नाटकाच्या सेन्सॉरबोर्डात सतत क्रियाशील राहाणं, अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी भ्रमंती करणं हे सगळं वयाच्या पंच्याहत्तरीतही ते तबीयतीने करतात. काही वर्षांपूर्वी ‘नटसम्राट’ संक्षिप्त स्वरूपात सादर करण्याचा वेगळा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. शिरवाडकरांच्या या नाटकातली सगळी स्वगतं एका सूत्रात गुंफून ती ते एका निवेदिकेच्या मदतीने सादर करीत आणि संपूर्ण ‘नटसम्राट’ पाहिल्याचा अनुभव देत. विदर्भातल्या रसिकांनी या प्रयोगाची खूप प्रशंसा केली.