(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • महापूर – कथा – १

    म्हातारी कमरेत पार वाकली होती .

    काठीच्या आधारानं , लटपटत्या पायांनी , शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी , गळणाऱ्या भांड्यातून आणत होती .

    चार दिवसांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले , पाच मृतदेह , माती बाजूला करून कुणीतरी वर आणून ठेवले होते .
    त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृतदेहावर , म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करीत होती .

    म्हातारा नवरा , मुलगा , सून , नातवंडं मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यावर , त्या देहाकडे बघताना , खाचा होत चाललेल्या डोळ्यांतलं पाणी केव्हाच आटून गेलं होतं .
    ऐंशी वर्षाचा तिचा सुरकुतलेला देह अधिकच आक्रसून गेला होता .

    पाण्यानं ते सडलेले मृतदेह धुण्याचं तिचं काम सुरूच होतं

    समोर बघ्यांची गर्दी , हातातल्या मोबाईलवर त्यादृश्याचा व्हिडीओ काढण्यात गर्क होती .

    चॅनलवाले शूटिंग करीत होते. म्हातारीचा बाईट घेण्यासाठी धडपडत होते .

    त्यांचे प्रश्न तयार होते .
    - या बॉडी कडे बघताना आता मनात काय भावना आहेत ?
    - नातवंडं कशी ओळखली ?
    - घर गाडलं जात असताना , त्या प्रसंगाकडे कसं बघता तुम्ही ?
    - समाजाला काय सांगाल ?

    एक ना दोन , अनेक प्रश्न तयार होते , पण म्हातारी त्यांच्याकडे बघत नव्हती .
    त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता .
    रिकामटेकडे बघे मात्र चर्चा करीत होते .

    थोड्या वेळाने म्हातारीने एक पितळी डबा हाती घेतला . त्याच डबक्यातल्या पाण्याने धुतला . आणि उघडून बघ्यांच्या गर्दीतल्या सर्वांसमोर धरला .
    त्यात पाचशेच्या दहाबारा नोटा होत्या .
    एक सोन्याचं मंगळसूत्र होतं . आणि चांदीचे चार वाळे होते .

    " हे घ्या सोनं , चांदी आणि होते नव्हते ते पैसे . तुम्हाला या मदतीची गरज आहे ! यातून तुम्हाला नवीन मोबाईल घेता येईल , प्रसिध्दी मिळेल आणि फेसबुक की कायसं असतं ना , त्यावर टाकता येईल . हे घ्या . मला आता याचा उपयोग नाही . टिव्ही वाल्यांना पण द्या . "

    म्हातारीनं सगळ्यांसमोर डबा ठेवला . पाठी वळली .

    गर्दीतल्या बघ्यांच्या माना खाली झुकल्या होत्या . मोबाईल बंद झाले होते. चॅनल वाल्यांचे बूम बंद पडले होते . आणि कॅमेरा वाल्यांनी अँगल बदलला होता .

    आता मात्र खाली झुकलेल्या प्रत्येकाला जाणवत होतं...

    - आपले पाय मातीनं जरा जास्तच बरबटले आहेत ...!

    - श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
    ९४२३८७५८०६
    --------
    कथा नावासह शेअर करायला माझी काहीच हरकत नाही .
    मात्र कथेतील आशयावर चिंतन जरूर करा .

  • मनाची श्रीमंती

    वचनं की दरिद्रता' असे म्हणतात. माणूस कितीही गरीब वा दरिद्री असला तरी ही गरिबी वा दारिद्र्य प्रत्येक वेळी दाखवायलाच पाहिजे असे नाही. उलट कितीही दारिद्र्य असले तरी आपले बोलणे-चालणे, तसेच आचरणातून ' श्रीमंती' दाखविता येते. त्याचीच ही कथा.

    एका चाळीतील एका खोलीत एक महिला व तिची चार लहान मुले राहात होती. त्यांची परिस्थिती फारच गरिबीची होती; परंतु त्या महिलेने आपल्या मुलांना अशी शिकवण दिली होती की, आपण फार गरीब आहोत हे ते नेहमीच विसरून जाऊन रोजचा दिवस आनंदाने जगत होती. कारण ते सर्वजण एकाच खोलीत राहात असले तरी खोलीचा वेगवेगळ्या भागांना त्यांनी दिवाणखाना, पाकशाळा, शयनगृह,
    अभ्यासगृह अशी नावे दिली होती. म्हणजे पाकशाळेच्या भागात स्वयंपाक व भोजन करणे, अभ्यासगृहामध्ये मुलांनी अभ्यास करणे व शयनगृहात झोपणे. गरिबीमुळे त्यांच्या घरात फारशी भांडी नव्हती. रोज भोजन करायला ते पत्रावळी वापरत. मात्र त्यांना ते सोन्याच्या थाळ्या म्हणत. तसेच पदार्थांनाही त्यांनी वेगवेगळी नावे दिली होती. पिठलं- भाकरी केली असल्यास त्यांना ते श्रीखंड-पुरी म्हणत. गुळाला ते अमृतखंड म्हणत, तर मिरच्यांचा ठेचा असल्यास ते त्याला खमंग पक्वान्न असं म्हणत. जेवताना या शब्दावरून त्यांच्यात नेहमीच हास्यविनोद चालत. फाटक्या सतरंजीला ते काश्मिरी गालिचा म्हणत, तर मोडक्या खुर्चीला ते सिंहासन असे संबोधित. एकदा त्या चाळीत त्यांच्या खोलीच्या बाजूलाच एक नवीन बिर्‍हाडकरू आले. दिवसा तसेच रात्री मुलांचे ते वेगवेगळे शब्दप्रयोग त्यांच्या कानावर आले. त्यामुळे त्या बिन्हाडकरूला वाटले, आपल्या शेजारी फार श्रीमंत माणसे राहात आहेत.

    मात्र इतके श्रीमंत कुटुंब चाळीत कसे काय राहाते, याबद्दल त्या बिर्‍हाडकरूला विलक्षण कुतूहल वाटत होते. काही दिवसांनी त्यांचा परिचय होत गेला व एके दिवशी तो नवीन बिऱ्हाडकरू त्या महिलेच्या घरात गेला. तेव्हा त्याला ती महिला सिंहासनावर बसून (मोडक्या खुर्चीवर) काश्मिरी गालिचावर (फाटकी सतरंजी) बसलेल्या आपल्या मुलांना शिकवित होती, असे दृश्य दिसले. खोलीत त्याने सर्वत्र नजर फिरवली, तेव्हा त्यांच्या शब्दप्रयोगाचा अर्थ कळायला त्याला फारसा वेळ लागला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने व समाधानाने कसे जगायचे हे त्या कुटुंबाकडून तो शिकला होता.

    त्याबद्दल त्या कुटुंबाचे कौतुक करून त्याने त्यांचा निरोप घेतला.

  • कुणात जीव रंगला

    एक खेडूत आईची भाबड प्रेमाची गोष्ट.

  • कळीचा माकड

    (इंडोनेशियन लोककथा)

    इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..

  • राजमुकुटाची चोरी

    खारच्या सोळाव्या रोडवरील “निवांत” ह्या बंगल्यात नेहमीप्रमाणेच शांतता होती. तो बंगला खाजगी डिटेक्टीव्ह यशवंत धुरंधर ह्यांचा होता. बंगल्यात ते, त्यांचा भाचा व मदतनीस चंद्रकांत नवलकर, त्यांच्या घराची व्यवस्था पहाणाऱ्या आत्या नसलेल्या पण आत्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वयस्क बाई, सदू नांवाचा एक अर्धवेळ काम करणारा पण तिथेच रहाणारा व शिकणारा गडी, रहात.
    निवांत जरी निवांत असला तरी निवांतकडे एक एसयुव्ही वेगाने येत होती आणि त्यांत बसलेले दिवाण अस्वस्थ होते.

  • वेश्या वस्तीत

    वेश्या जीवनातील जगणाऱ्या स्त्रियांची विदरक्ता लेखातून रेखाटली आहे . ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे … ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेशेचा एक कलकचं लावला ती सामान्य स्त्री सारखी जगू पाह्यला खूप धडपडली पण शेवटी तिचं ह्या समाजात जगनच त्यांना अमान्य होतं ..

  • मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा………….!!!

    “गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा”

    ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस हा दिवस तिची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.अर्थात गायी-वासराच्या अंगी असणारी उदारता,शांतता व समृद्धीची भावना सामान्य माणसाच्या अंगी वृद्धिंगत व्हावी अशी त्यामागची भावना असते.शेतकऱ्याच्या घरी अशी समृद्धी गायी-वासराच्या आणि दुध-दुभत्याच्या रुपाने सतत नांदत राहावी व त्यातून शेतकऱ्याची सर्व बाजूंनी भरभराट व्हावी ही भावनाही पूजा करण्यामागे नक्कीच असते.हल्ली कोणतीही पूजा सहेतुक होत असली तरी त्यामागे श्रद्धेचा,संस्कृतीचा,परंपरेचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले जाते.

    पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे खूप गायी असायच्या.त्यांची नावेही भवळी,मोरी,कपिली,खिलारी,तांबडी अशी छान असायची.प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच आणि त्यामुळे आहारात हमखास दुध व दुधाचे पदार्थ असायचेच असायचे.जर गावात एखादी गायी व्याली तर शेजाऱ्यांना कच्च्या दुधापासून बनविलेला खरवस खायला लोक आवर्जून बोलवायचे.दही-दुधाचा घरात नुसता पूर असायचा.पण पुढे ‘जिथं पिकतं तिथ विकत नाही’ या म्हणीला छेद गेला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनेंतर्गत स्थापिलेल्या दुध-संघाने दुध घ्यायला सुरुवात केली.एकदा दुध विकण्याची गोडी निर्माण झाल्यावर दरात मनमानी सुरु झाली आणि एकूण व्यवसाय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून दुधाची गुणवत्ता खालावत गेली व मनाचा कोतेपणा वाढत गेला.ज्याच्या घरात चार-पाच गायी आहेत तोही बिचारा बिगर-दुधाचा चहा पिऊ लागला.दह्या-दुधाचा माठ हा शब्दप्रयोग फक्त गाण्यातच(गवळणीत) दिसू लागला.आता त्याची जागा किटली आणि वाटीने घेतलीय.शहरात पूर्वी थोड्या-फार प्रमाणात गायी दिसायच्या पण आता त्यांची संख्या खुपच कमी आहे.शहरात प्राण्यांच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांना प्रतिकृती किंवा चित्राचा आधार घ्यावा लागतो.फार फार तर शहरात एखाद्या मंदिराच्या बाहेर उभी असलेली गाय आणि चारा घेऊन असलेला गोरक्षक दिसतात.भाविक मग त्या गोरक्षकाकडील चारा विकत घेतात.गायीला चारतात आणि गोमातेचे दर्शन झाले या आनंदात घरी परततात.

    शेतकरी मोसमी हंगामामुळे शेतीपासून दूर जात आहे.ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरित लोकांची वाढत जाणारी संख्या आणि त्यातून वाढणारे शहरीकरण यामुळे काही सांस्कृतिक बाबी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.१९९० च्या दशकात शिक्षक,भूगोल किंवा अर्थशास्त्र शिकविताना ग्रामीण भागात ७०% व शहरी भागात ३०% लोकसंख्या राहते असे सांगायचे.आता त्यांनाच ग्रामीण भागात ५५% व शहरी भागात ४५% लोकसंख्या राहते असे अलीकडच्या सर्वेनुसार सांगावे लागते.त्यामागे विविध कारणे आहेत.बदल हा जरी सृष्टीचा नियम असला तरी तो आश्वासक असला म्हणजे पचनी पडायला सोपा जातो.

    अशी ही गाय आणि तिचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.गायीच्या पूजेच्या दिवशी आणि नेहमीच देशी,गावरान आणि एकूण सर्वच गायींचे मानवी जीवनातील नैसर्गिक महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि तिचे गाणेही जोपासले पाहिजे-

    “दिन दिन दिवाळी,गायी-म्हशी ओवाळी;गायी कुणाच्या?...........लक्षीमनाच्या”.

    - भाऊसाहेब लाला टुले
    tulebhausaheb1986@Gmail.com

  • वेगळा भाग – ५

    अशोक सोबत झालेल्या त्या बोलण्यामुळे बाबू पुढचे काही दिवस अशोकला भेटलाच नाही ,

    शाळेत जरी तो त्याला दिसला तरी तो त्याला टाळू लागला, एकटा शाळेत येऊ जाऊ लागला.

    संध्याकाळ चा बराच वेळ दत्त मंदिरात घालवू लागला .त्या दिवसानंतर मात्र अशोक आणि आपल्यात खूप फरक आहे ,

    त्याचे आणि आपले विचार हे खूप वेगळे आहेत, अशोक आपला मित्र कधीच होऊ शकत नाही ह्याची

    जणू खात्रीच बाबुला वाटू लागली होतीं,

  • सुखस्वप्न

    सुखस्वप्न

    शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे.

  • कासव आणि माकड

    (मॉरिशसची लोककथा)

    खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होते माकड आणि एक होते कासव. या कासवाला सात मुले होती. माकड मात्र आळसात वेळ घालवीत असे. कासव खूप कष्ट करीत असे. एकदा कष्टाचे काम केल्यावर त्याला त्याची मजुरी मिळाली, तर त्या मजूरीच्या पैशातून त्याने तांदुळाचे एक पोते खरेदी केले. ते पोते घेऊन कासव घरी येत असता वाटेतच मध्यावर थांबले. त्याने आपल्या पाठीवरचे पोते रस्त्यावर काढून ठेवले.