(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पोप आणि नोकर

    एका गावात एक पादरी (धर्मगुरू) राहत होता. त्याने एक नोकर ठेवला होता. अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.

      December 25, 2024


  • जोडवी – भाग २

    विजय आणि यामिनी बाहेर फिरून रात्री उशिरा घरी येतात… घरातील बंद केलेले दिवे सुरु करतात आणि सोफ्यावर बसतात…

      December 29, 2022


  • क्रांतिकारी संशोधिका मारिया ज्योपर्ट मायर

    विद्वत्तेचा वारसा तिला लहानपणापासूनच मिळाला होता. फ्रेडरिक विज्ञानाचे प्राध्यापक तर आई मारिया चूल ज्योपर्ट शिक्षिका होती. वडिलांना विज्ञानाची फार आवड होती. त्यामुळे निसर्गातील अनेक विज्ञानवादी चमत्कार तिला लहानपणीच पहायला मिळाले. त्यामुळे तिचीही विज्ञानदृष्टी तयार झाली व पुढे ' वैज्ञानिक संशोधन' हेच तिने आपले ध्येय मानले व परमाणू संरचनेबाबत नवा शोध लावून तिने विज्ञानाला नवी दिशा दिली. याच संशोधनाबद्दल तिला १९६३ मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला.

    तिचे नाव मारिया ज्योपर्ट मायर (Maria Goeppert Mayer)

    मारिया मूळची जर्मनीतील कॅटोविसची. ( आता हा भाग पोलंडमध्ये आहे.) २८ जून १९०६ रोजी तिचा जन्म झाला. एकुलती एक असली तर तिचे लाड करण्याबरोबरच आई-वडिलांनी तिला विज्ञानवादी दृष्टी दिली. त्यामुळे अभ्यासाबरोबरच तिची संशोधनाची आवड वाढत गेली. उच्च शिक्षणासाठी तिने गोटिंजन विद्यापीठाची निवड केली व तेथे भौतिकशास्त्रात तिने संशोधन सुरू केले. संशोधनानिमित्त ती इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातही गेली. तेथेच तिची भेट प्रख्यात संशोधक अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याशी झाली. १९३० साली तिला गोटिंजन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर जोसेफ ई. मायर यांच्याशी विवाह केल्यानंतर दोघे अमेरिकेत आले व जान हाफकिन्स विद्यापीठात नोकरी करत तिने अणू व परमाणूबाबत संशोधन सुरू केले. शिकागोमधील एका राष्ट्रीय प्रयोगशाळेत तिला फर्मी, युरे, क, टेलर आदी प्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परमाणू संरचनेबाबत आपले मौलिक संशोधन पूर्ण झाल्यानंतर मारियाने ते 'फिजिकल रिव्हर या पत्रिकेत प्रसिद्ध केले. नेमका असाच काहीसा सिद्धांत जे.एच.डी. जेन्सन यानेही त्याच काळात प्रसिद्ध केला. त्यामुळे उभयतांना १९६३ चे नोबेल विभागून देण्यात आले. पुरस्काराचा अर्धा भाग युजीन पी. विगनर यांना देण्यात आला. मारिया नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात रसायनशास्त्राची प्राध्यापक झाली. मात्र तेथे काम करताना तिला पक्षाघात झाला व तिची वाचा गेली, तरीही तिने आपले काम चालूच ठेवले होते. २० फेबुवारी १९७२ रोजी मारियाचे हृदयविकाराने निधन झाले.

      April 1, 2017


  • शाळा, शिक्षक, मुलं आणि सकाळ…

    पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं हळूच पसरतात जमिनीवर . नकळत बागेतली , दारातली , कुंडीतील फुलं बघतात डोकावून.आज तोडण्यासाठी कुणाचा नंबर आहे ते ?

    दिवस सरकत जातो.रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढते.. लालपरी मुक्कामाच्या गावावरून निघते. प्रवाशांची धांदल उडते.भाजीवाले,दुधवाले , खारी, पाववाले ओरडून विकतात.आपला माल... शिक्षक करतात प्रवास गाडीने . जेवणाचे डब्बे असतात सोबतीला.मुलंही पळतात शाळेच्या ओढीने . दप्तरात आपले भविष्य घेऊन . वडाच्या, पिंपळाच्या झाडावर भरते पाखरांची शाळा. गाव, नदी, डोंगर, रस्ता , चौक होतात जागे सेवेसाठी. मुलं शाळेत गोळा झाली की गजबज होतो सुरू. परिपाठाने घुमतो परिसर. सडा रांगोळीने सजते घर. शेतातील कामाची असते लगबग. खुरपणी , कोळपणी, नांगरणी, पाळी, पेरणी, राखणी, गुरांची सोडबांध , वेचणी , तोडणी यांचा असतो समावेश . शाळेत पहिला तास सुरू होतो. प्रसन्न मुद्रेने असतात सर्वचजण. हजेरी होते. वेळापत्रक असते.तासिकेनुसार शिक्षक बदलतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, इतिहास , भूगोल हे असतात विषय . जे शिकवतात. जे घडवतात उद्याचा भारत. प्राथमिक शाळेतच घडत असते भविष्य .. शाळेत नसतो निर्जिव दगडांच्या सांगाडा .भींत बोलत असते मुलांशी . संवाद होतात फळ्यावरच्या अक्षरांशी. संवाद होतात रंगवलेल्या भिंतीशी.निसर्गातील प्रत्येक घटकांशी.. सकाळ सरून जाते पटकन.दुपारची चाहूल लागते. अंगाला ऊन स्पर्श करून जाते.जाणिव करून देते.पोटात ओरडतात कावळे. न्याहारीचा वखत टळून गेलेला. मुलं बघतात . किचनशेडकडे . भात , वरण , खिचडी की अजुन काही. हात धुवून तयार असतात.गाडीला अडकवलेला डबा पटकन येतो हातात. मनसोक्त होते पंगत . रानात सुटतात मजूर . दुपारच्या भाकरीसाठी. लसणाची चटणी आणि पाट्यावर रगडलेला ठेचा असतो . तोंडी लावण्यापुरता. कामाचा पडतो विसर . कारण कोणते तरी एक गाणं असत सोबतीला.असेच दिवस पडतात मागे एकेक ....प्रत्येक दिवसाची सकाळ असते नविन काही देणारी .. शिकवणारी ...

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    मो.9421442995
    vitthalj5@gmail.com

      May 17, 2017


  • जनस्थान : नाशिकविषर्या लोककथा

    अगस्ती मुनी यांना दक्षिण भारतातील प्रबळ राक्षसांचा नाश करण्यासाठी व ऋषीमुनींना आश्रय देण्यासाठी उत्तर भारतातून ब्रह्मा, विष्णू महेश यांना दक्षिण भारतात पाठवतात. तेव्हा महादेव म्हणतात की, “मी गोदाकाठच्या पंचक्रोशीत जनस्थान या ठिकाणी ‘कपालेश्वर’ या नावाने प्रकट होईन” आणि विष्णूने वचन दिले की, “मी रामअवतारी तुमच्या भेटीला येईन.

      November 15, 2025


  • माणुसकी

    संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर पाऊस नुसता भरभरून कोसळत होता. मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात झुमझोड पाऊस आणि ट्रॅफिक अडकून पडणे ही काही नवीन गोष्ट नव्हती.

      November 27, 2025


  • मला माहीत आहे

    मी आणि ती ‘ हल्ली अनेकांना आवडत आहे , अर्थात कारण मला ती आवडते .

      July 3, 2021


  • बकासुराची गोष्ट

    कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत.

      December 25, 2024


  • संगीत आणि समाधान

    संगीताचा सखोल अभ्यास असलेले एक गुरु होते. संगीत हेच जीवन मानून त्यांनी संगीताची आराधना केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दूरवरून संगीत शिकायला तरुण येत असत. त्यांच्याकडून फारशी अपेक्षा न ठेवता गुरूही त्यांना संगीत शिकवित असत.

    एकदा एक तरुण त्यांच्याकडे सतार शिकण्यासाठी आला. त्या तरुणाला संगीताचे उपजतच ज्ञान होते. त्यामुळे तो लवकरच सतारवादन शिकला. परंतु तो तरुण वृत्तीने फारच चंचल होता. त्याचे स्वतःचे कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नव्हते. त्यामुळे तो अनेकदा दुःखी व असमाधानी असायचा. त्याच्या गुरूच्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली होती.

    जीवनात सुख आणि समाधान कसे असते व ते मानायचे असते हे त्याला संगीताच्या आधारेच पटवून सांगायचे असा गुरूंनी निश्चय केला. एकदा हा तरुण असाच एकटा विमनस्क अवस्थेत बसला असताना गुरू त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो दुःखी व असमाधानी असल्याचे त्यांना कळले. याचे कारण मात्र त्या तरुणालाच माहीत नव्हते. तेथे बाजूलाच एक सतार होती. गुरूंनी तिच्या सर्व तारा सैल केल्या व त्या तरुणाला सतार वाजविण्यास सांगितले.

    त्यावर तो तरुण म्हणाला, या तारा इतक्या सैल आहेत की, कोणालाही सतार वाजविणे अशक्य आहे. त्यावर गुरूंनी पुन्हा सतार हातात घेतली व तिच्या तारा एकदम ताणून बसविल्या व त्याला पुन्हा सतार वाजविण्यास सांगितले. तो तरुण लगेच म्हणाला तुम्ही सतारीच्या तारा एवढ्या ताणल्या आहेत की, ती वाजवायचा प्रयत्न केला तर ताराच तुटू शकतील. त्यावर गुरू त्याला म्हणाले की, तुझ्या दुःखाचे कारण तूच सांगितले आहेस. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास दुःख निर्माण होऊ शकते, जसे सतार अगदी सैल व फार ताणली तर तिच्यातून चांगले सूर येत नाहीत. तसेच जीवनात प्रत्येक गोष्टीत समतोल साधला तरच सुखासमाधानाचे संगीत निर्माण होऊ शकतं. त्या तरुणाला गुरूंचा हा उपदेश पटला व त्याने त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.

      January 2, 2018


  • मी आणि ती’ – २

    घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…

      November 2, 2019