नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिका-याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला.
April 17, 2022
भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.
November 27, 2025
आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.
November 25, 2025

पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो.
May 13, 2022
प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते..
May 10, 2022
सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची.
August 24, 2017
माझ्या एका कथेची ही जन्मकथा आहे . सन २००० च्या महाराष्ट्र टाइम्स च्या दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली होती .
January 20, 2025
उत्सव हा नात्यांचा असतो पण आता नातीच टिकत नाहीत तर उत्सव कसला आणि उत्सवासाठी उत्साह कुठला.
November 15, 2021

अनेक वेळा एम.एफ. हुसेनला भेटलो होतो, त्याची बहुतेक पैंटिंग्ज प्रत्यक्ष पाहिली आहेत, त्याला पैंटीग्स करताना सुद्धा, त्याने मला एकदा जहांगीरच्या सॅमओव्हर मध्ये कॉफी पिताना एक स्केचही काढून दिले होते… त्याची मा-अधुरी … माधुरी संकल्पना सॉलिड आवडली होती, ३० वर्षाची आई आणि ८० वर्षाचा मुलगा….
November 4, 2019
सकाळी अकरा- साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करुन यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बील, पाणी बील, बाजार हाट, बँकाची आणि ही सगळी कामे सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेंट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती.
November 27, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti