(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श ( भाग – ७ )

    गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली.

      January 27, 2022


  • गोष्ट छोटी – दोन आज्यांची!

    एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस फाईल मध्ये दाखवतात त्या पद्धतीने दोन-चार लोकांशी एकाच गोष्टीविषयी गप्पा मारून त्यांच्या नकळत तिला हवी ती माहिती बरोबर काढून घ्यायची. इतकी चाणाक्ष !

      December 13, 2022


  • अजब न्याय नियतीचा – भाग २४

    तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’

      October 11, 2019


  • संस्कारांची टोपी…

    समाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी ! तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया !

      August 19, 2017


  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ७

    ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती….  तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले…..

      April 7, 2020


  • डॉक्टर संशोधिका गर्टी थेरेसा कोरी

    कोणत्याही परिस्थितीत आपण डॉक्टर व्हायचेच हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. वैद्यकीय शिक्षण फार अवघड असते हे तिला घरातील लोकांनी व इतरांनी सांगून पाहिले. मात्र ध्येयापासून ती किंचितही ढळली नाही. कठोर परिश्रमाच्या आधारे सर्व अडथळे पार करून ती अखेर डॉक्टर झाली व नंतर रोगाबाबत तिने असे काही संशोधन केले की, अनेक मोठ्या रोगांवरती उपाय शोधणे सहज सोपे झाले. तिच्या संशोधनाबद्दल तिला १९४७ साली नोबेल पुरस्कारही मिळाला. गर्टी थेरेसा कोरी (Gerty Theresa Cori) हे तिचे नाव. हा नोबेल पुरस्कार तिचे पती कार्ल कोरी तसेच अर्जेंटिनाचे वैज्ञानिक बर्नार्डो ए हाऊसे यांच्यासह तिला विभागून देण्यात आला होता.

    गर्टी थेरेसाचा जन्म १५ ऑगस्ट १८९६ रोजी ऑस्ट्रियातील प्राग शहरात झाला. तिचे वडील एका चिनी कारखान्यात व्यवस्थापक होते. घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. गर्टीचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले व वयाच्या दहाव्या वर्षी तिला पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले व पूर्ण करून दाखविले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच तिची व कार्ल कोरीची ओळख झाली व नंतर दोघेही एकमेकांचे जीवनसाथी बनले. पहिल्या महायुद्धाच्या काळात केवळ ऑस्ट्रियन असल्यामुळे कोरी दाम्पत्याला प्राग शहर सोडावे लागले व दोघेही व्हिएन्नामध्ये आले. एका बालरुग्णालयात दोघांनीही काम सुरू केले. मात्र वैद्यकीय संशोधनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून दोघेही अमेरिकेत आले व त्यांनी विविध रोगांसंबंधी संशोधन सुरू केले. रक्तामधील साखरेबाबत त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळेच मधुमेहावरचे उपाय सुलभ झाले. या संशोधनाला 'कोरीचक्र' असे आजही संबोधले जाते. या संशोधनाबद्दलच त्यांना डॉ. बर्नार्डो हाऊसे यांच्यासमवेत नोबेल पुरस्कार लाभला. त्यानंतर कोरी दाम्पत्याने सेंट सुई येथे स्वतःची प्रयोगशाळा काढून संशोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले. या प्रयोगशाळेचा अनेक संशोधकांनी लाभ घेतला. दुर्देवाने गर्टी कोरीला एका असाध्य रोगाने पछाडले. तब्बल दहा वर्षे तिने या रोगाशी झुंज दिली,परंतु २६ ऑक्टोबर १९५७ रोजी तिचे निधन झाले.

      April 8, 2017


  • बॅड हॅबिट (कथा)

    तशी ती सॉलिड आहे ,
    सगळ्यांना माहित आहे हे ,
    तसे तिलाही माहीत आहे.
    पण मला ती फार उशीरा खरी कळली .

      May 26, 2021


  • पुरुषार्थ

    एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.

      October 1, 2024


  • कळीचा माकड

    (इंडोनेशियन लोककथा)

    इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..

      October 22, 2025


  • विश्वबंधुत्व जपणारी लेखिका पर्ल बक

    ज्या साहित्यिकांनी आपल्या लेखनाद्वारे पूर्व-पश्चिम जोडण्याचे म्हणजेच विश्वबंधुत्व जपण्याचे कार्य केले. त्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध लेखिका पर्ल बक (Pearl Buck) हिचे नाव अग्रभागी आहे.

    पर्ल बक अमेरिकेत जन्मली, चीनमध्ये वाढली व आयुष्याच्या अखेरीस ती पुन्हा अमेरिकेत येऊन राहिली.

    पर्ल बकचा जन्म २६ जून १८९२ रोजी अमेरिकेतील हिल्स बार येथे झाला. बालपणी तिचे नाव होते पर्ल सिंडेस्ट्रायकर. तिचे आई-वडील दोघेही चीनमध्ये अमेरिकी मिशनरींचे काम करीत होते. त्यामुळे पाच महिन्यांची असतानाच पर्ल त्यांच्याबरोबर चीनमध्ये गेली. यांगत्सी नदीवरील चिकियांग शहरात तिचे बालपण गेले. लहानपणापासूनच तिला साहित्याची फार आवड होती. वयाच्या सातव्या वर्षी तिने चार्ल्स डिकिन्सच्या रचना वाचायला सुरुवात केली. तिला सांभाळण्यासाठी ठेवलेल्या चिनी महिलेने तिला अनेक चिनी कथा सांगितल्या, त्यामुळे चिनी संस्कृतीबद्दल तिला साहजिकच ओढ निर्माण झाली होती. शांघाय येथील एका दैनिकात तिने लिहायला सुरुवात केली व वाचकांना तिचे लेखन आवडू लागले.

    वयाच्या सतराव्या वर्षी पर्ल बक पुन्हा अमेरिकेत गेली, मात्र अमेरिकेतील अति मोकळे वातावरण तिला आवडले नाही. चीनची ओढ होतीच, त्यामुळे ती पुन्हा चीनमध्ये गेली. आपल्या आजारी आईची सेवा करीत असताना तिने उत्तर चीनमधील मका जनजीवनाचा अभ्यास केला व ' इन चायना टू ' हा लेख प्रसिद्ध केला. तो अतिशय गाजला. १९२६ साली पर्ल बकने ' ईस्ट विन्ड, वेस्ट विन्ड' ही आपली पहिली कादंबरी लिहिली. ती १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर लिहिलेल्या 'द गुड अर्थ' कादंबरीला 'पुलित्झर ' पुरस्कार मिळाल्यामुळे तिला आंतराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पर्ल बकने एकूण १८ कादंबऱ्या व लहान मुलांसाठी २३ कथांची पुस्तके लिहिली.

    १९३८ मध्ये तिला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. आयुष्याच्या अखेरीस आपल्या अमेरिकेतील वास्तव्यात तिने निराधार मुला-मुलींसाठी आश्रम सुरू केला व तेथे आलेल्या मुला-मुलींच्या आयुष्याला वेगळे वळण दिले.

      April 7, 2017