महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे.
कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे करून ते गुळाच्या पाकात टाकणे (जिलबी तळल्यावर जशी पाकात टाकतात त्याप्रमाणे). ते लगेच पाकातून काढून खावेत. पटकन करायचं आणि गटकन गिळायचं असं हे गडगिळं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : २ कप मधु मका दाणे, १/४ कप कोथंबीर (चिरून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ छोटा टोमॅटो (बारीक चिरून), १/४ टी स्पून मिरे पावडर, १/४ टी स्पून चाट मसाला, १ छोटे लिंबू रस, १ टे स्पून बटर, मीठ चवीन.
कृती : मक्याचे दाणे थोडे उकडून घ्यावे. (म्हणजे कुकर मध्ये एक शिट्टी काढावी). कांदा, टोमॅटो, कोथंबीर बारीक चिरून घ्यावी. एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमाटो घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम सर्व्ह केले तर छान लागते. सर्व्ह करतांना मक्याच्या दाण्यावर कांदा, टोमाटोने सजवावे. वरतून मिरे पावडर, चाट मसाला भूर भुरावा.
भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे.
प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.
साहित्य: २०० ग्राम खवा
१ कप दूध
१०० ग्राम साखर
२ चिमूट केशर
१ लहान चमचा वेलची पावडर
बारीक चिरलेले बदाम, पिस्ता
कृती: प्रथम खवा मळून घ्यावा.
पेढा करण्याआधी दूधात केशर मिक्स करून ठेवावे. तयार खवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये घ्यावा त्यात साखर घालावी. मध्यम आचेवर ढवळत राहावे. ५-७ मिनीटात साखर आणि खवा यांचे पातळसर मिश्रण तयार होते. त्यात दूध घालावे. आणि मिडीयम लो गॅसवर सारखे ढवळत राहावे. मिश्रण जरा घट्ट झाले त्यात वेलची पावडर घालावी. जवळ जवळ २८-३० मिनीटांनी पेढ्यांसाठी घट्ट गोळा तयार होतो.
मिश्रण अगदी थोडा वेळ निवळू द्यावे, शक्यतो मिश्रण गरम असतानाच पेढे वळावेत. हातांच्या तळव्यांना थोडे तूप लावून पेढे वळावेत. सजावटीसाठी पेढ्यांना वरती बदाम, पिस्त्याचे काप लावावेत.
टीप: पेढे जर पिवळ्या रंगाचे हवे असतील त्यात खायचा रंग घालावा. पेढे ५-६ दिवस फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकतात. पेढे बनवल्यावर दोन एक दिवसांनी पेढ्यांचा गोडपणा जरा वाढतो, त्याप्रमाणे साखर कमीजास्त करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
महाराष्ट्रातल्या तमाम खाद्य प्रेमींसाठी एक नवीन मेजवानी घेऊन लवकरच येत आहोत.
दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या.
साहित्य:- चण्याच्या डाळीचे पीठ २ वाट्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार लिंबाचा रस, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, खाण्याचा सोडा पाव चमचा, ओलं खोबरं 4 चमचे, कोथिंबीर, सोडा पाव चमचा, हिंग पाव चमचा, मोहरी १ चमचा.
कृती:- चण्याच्या डाळीच्या पिठात सोडा, मीठ, तिखट घालून चाळून घ्यावे. नंतर यात थोडे कोमट पाणी व लिंबाचा रस घालून एकत्र मळून घ्यावे. त्यात १ चमचा तेलही घालावे. नंतर साच्यात याची शेव पाडून ही शेव वाफेवर उकडून घ्यावी. तोपर्यंत एका छोट्या कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण घालून परतावे. गॅस बंद करून यात थोडी साखर, मीठ व हळद घालावी. शेव वाफवून झाल्यानंतर त्यावर ही फोडणी घालावी. वरून खोबरं, कोथिंबीर पण घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti