महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
चकली उत्तम होण्यासाठी प्रथम भाजणी उत्तम व्हावी लागते. तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ या सर्व गोष्टी धुवून मग भाजायच्या असतात. चकलीची भाजणी जास्त भाजायची नसते. सर्व धान्यं भाजून झाली की त्यात धने व जिरे भाजून घालून सर्व मिश्रण बारीक दळून घ्यायचं असतं. या पिठात तिखट, मीठ, तीळ, ओवा आणि गरम तेलाचं मोहन घालून आणि पुरेसं पाणी घेऊन पीठ भिजवायचं असतं. मग त्या पिठाचा छोटा गोळा थोडा मळून घेऊन चकली पात्रात घालून चकल्या पाडायच्या असतात.
चकली कशी तळावी?
चकली तळणं हे कौशल्याचं काम असतं. चकली कमी तापलेल्या तेलात म्हणजे दीडशे डीग्री सेल्सियसपेक्षा) (या तपमानाला मायलार रिअँक्शन सुरू होते) कमी तपमानाच्या तेलात टाकली तर चकलीच्या बाहेरच्या भागाचा संपर्क गरम तेलाशी आल्यानं तेथील पाण्याची वाफ होऊन ती बाहेर येऊ लागते. त्या छिद्रांमधून तेल आत शिरू लागतं, पण मायलार रिअँक्शन न झाल्यानं बाहेरील भाग सोनेरी व घट्ट होत नाही. आतील भागातील पाण्याची वाफ झाली तरी तिचा दाब पुरेसा नसल्यानं ती बाहेर येत रहाते. आत शिरणार्या् तेलाला ती अटकाव करू शकत नाही. आणि म्हणूनच तेल भरपूर आत शिरल्यानं व बाहेरील भाग घट्ट न झाल्यानं चकली विरघळते. या उलट खूप तापलेल्या तेलात जर चकली टाकली तर बाहेरील भाग लगेच सोनेरी व थोड्याच वेळात लाल बनतो. बाहेरील भाग घट्ट असल्यानं अतिरिक्त वाफ बाहेर येऊ शकत नाही. अशी चकली तळून काढली की बाहेरून लाल व कडक, पण आतून मऊ असते. तपमान कमी झाल्यावर चकलीमधील वाफ आतल्या आत शोषली जाते व चकली मऊ पडते. चिवट होते. या कारणांसाठी चकली तळतांना तेलाचं तपमान मध्यम ठेवावं लागतं. म्हणजे ती सोनेरी आणि खुसखुशीत होते. चकली तळत असताना बाहेर येत असलेल्या वाफेमुळे सतत बुडबुडे येत असतात. हे बुडबुडे येणं खूप कमी झालं की चकली तळून झालेली असते.
भाजणी कशी भिजवावी?
चकलीची भाजणी सैल भिजली तर अशा पिठाची चकली कागदावर पाडून तळणीत टाकतेवेळी तिचा आकार बदलण्याची शक्यता असते. शिवाय पाण्याचा अंश जास्त असल्यानं अशी चकली गरम तेलात टाकली की खूप मोठय़ा प्रमाणात वाफ बाहेर येते. त्या छिद्रांमधून तेल आतपर्यंत जाऊन चकली विरघळू शकते. जर वाफेच्या दाबानं तेलाला रोखून धरलं तर चकली गार झाल्यावर मऊ पडू शकते. अशा वेळी आणखी थोडी कोरडी भाजणी घेऊन त्यात तिखट, मीठ, गरम तेल वगैरे घालून ती सैल भाजणीत घालून मिश्रण योग्य तेवढं मऊ ठेवावं. भाजणी घट्ट भिजली तर पाण्याचा अंश कमी असल्यानं कमी वाफ बाहेर येते. छिद्रं कमी पडतात. त्यामुळे तेल त्यात कमी शिरतं व चकली खुसखुशीत होत नाही. अशा वेळी भाजणीत थोडं पाणी घालून ती जरा सैल करावी. उकडीच्या पाण्यात भाजणी भिजवली तर उच्च तपमानामुळे भाजणीतील स्टार्चमधील अमायलोज व अमायलोपेक्टिन विरघळू लागतात. रेणूंचा आकार मोठा होतो. अशा पिठाची चकली गरम तेलात टाकल्यावर पाण्याची वाफ होऊन छिद्र खोलवर पडतात (कारण पाणी कणाच्या आतपर्यंत शिरलेलं असतं) ती खूपही असतात. त्यामुळे खूप तेल आतवर शिरू शकतं. अशी चकली तोंडात विरघळेल इतकी खुसखुशीत होऊ शकते, पण तळायला वेळ लागतो, जरा तेलकट असते आणि विस्तव फार मंद नाही, फार तीव्र नाही, असा ठेवून तपमान व्यवस्थित ठेवावं लागतं.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूङ
कृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा यांचे पातळ पातळ तुकडे करा. ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येते. आता त्यावर काकडीचे तुकडे ठेवा व अगदी थोडे मीठ वरून घाला. नंतर टोमॅटोचे तुकडे ठेवा व त्यावर बटाटयाच्या चकत्या ठेवा पुन्हा अगदी थोडे मीठ वरून टाका आणि मिरपूडही टाका, त्यावर दूसरा ब्रेडच्या स्लाइस घालून दोन्ही हातात मिळून ते जरा दाबा. सुरीने सॅडविचचे एकसारखे दोन किंवा दोन त्रिकोण होतील अशारितीने तुकडे करा. याच पध्दतीने चारी सॅडविच तयार करा. खायला घेताना बरोबर टोमॅटो साँस घ्या.
साहित्य : हरभऱ्याची डाळ, दही, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, फोडणी.
कृती : हरभऱ्याची डाळ ३ तास भिजत ठेवावी. नंतर डाळ जाडसर वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. नंतर त्यात दही व मीठ घालावे. वरून खमंग फोडणी द्यावी. तोंडी लावायला हा पदार्थ खूपच छान लागतो.
- अमरेंद्र मुळये, कांदिवली, मुंबई.
पालकाची पाने शिजवून त्याची पेस्ट करा. कढईत तेल गरम करून त्यात पालकाची पेस्ट, दूध, मीठ आणि काजू पेस्ट घालून शिजवून घ्या. आता यात शिजवलेली भाजी, मक्यागचे दाणे, सिमला मिरची, हिरवी मिरची, बेबी कॉर्न, काळी मिरेपूड, लवंगपूड घालून व्यवस्थित परतून घट्ट होईपर्यंत शिजवा. गरमागरम पराठ्यासह सर्व्ह करा.
मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळून दोन तास पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घाला. लिंबू रस गाळून त्यात टाका आणि चांगले मिसळा.
साहित्य:- ४ बर्गरचे पाव, १०० ग्राम टोफू, २ कांदे, १ टोमाटो, १ लाल मिरची, ४ चीज स्लाईस, १/२ वाटी लेट्युस, रांच ड्रेसिंग, मीठ, मिरे पूड, तेल.
कृती:- टोफूचे तुकडे करून कढईत तेल घालुन गरम करून गुलाबी रंगावर भाजणे त्यात कांद्याचे तुकडे, लाल मिरची घालुन गुलाबी होईपर्यंत भाजणे.
मीठ आणि मिरे पूड घालुन चांगले हलवणे. मिश्रणाचे ४ भाग करणे. प्रत्येक पावावर चीजचा स्लाईस ठेवून मिश्रणाचा एक भाग ठेवणे. त्यावर लेट्युस, टोमाटो, केचप आणि रांच सॉस घालुन दुसरा पाव ठेवणे व खायला देणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : तीन वाट्या उपवासाच्या भाजणीचे पीठ, चवीपुरते तिखट, जिरेपूड एक चहाचा चमचा, चहाचे दोन चमचे लोणी, मीठ, तूप.
कृती : मंद गॅसवर पातेल्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवा. त्यात जिरेपूड, तिखट, मीठ, लोणी, घाला. पातेल्यातील पाणी उकळले की पातेले खाली उतरावा. पीठ चाळा, भाजणीचे पीठ त्यात हळूहळू सोडा चांगले कालवा. नंतर मिश्रण झाकून ठेवा. थंड झाल्यावर हे पीठ पसरट भांड्यात (परातीत) काढा. चांगले मळून घ्या. कढईत तूप गरम करा. सोऱ्यात चकलीचा साचा घालून या तयार केलेल्या पिठाच्या चकत्या पाडा. तळा. गरम असतानाच दह्याबरोबर खा.
साहित्य व कृती :- कलिंगड कापल्यावर त्याच्या साली किसून त्यातील पांढरा भाग काढून घ्यावा. डोसे, उत्तप्पे, आप्पे यांचे पीठ वाटताना पाणी घालण्याऐवजी त्यात कलिंगडाचा पांढरा भाग घालावा.
कलिंगडाच्या बिया वेगळ्या काढून घ्याव्या. त्या स्वच्छ धुऊन वाळवाव्या. शेंगदाणे भाजतो त्याप्रमाणे भाजाव्यात. तडतड आवाज आला, की त्या गरम असतानाच त्यावर मिठाचे पाणी शिंपडावे व बिया ढवळाव्यात. या प्रकारे खारवलेल्या बिया छान लागतात. त्या गार झाल्यावर पांढरट दिसतात. अशा बिया जास्त असतील, तर बाटलीत भरून ठेवाव्यात. चण्या- फुटाण्यासारख्या लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डोशाचं पीठ उरलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवताना त्यात विड्याचे पान घालून ठेवा. पीठ आंबट होत नाही.
इडली उरली तर फ्रीजमध्ये झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी एक-एक इडली पाण्यात बुडवून वाफवा. इडली मुलायम होते.
मटारदाणे उकडायला ठेवा. एक उकळी आली की, त्यात चिमूटभर हळद घालून गॅसवरुन उतरवा. ते हिरवेगार राहतात.
पालकाची पाने मिठाच्या पाण्यात भिजवून दोन मिनिटे ठेवा. मग त्याची पुरी करून फ्रीजमध्ये ठेवा. पुढील ८ दिवसांकरिता त्याचा वापर करता येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेऊन त्यांत डिंकाची पावडर तळून व फुलवून घ्या.नंतर काजू, बदाम यांची तुकडे किंवा काप आणि बेदाणे हेही साजूक तुपात तळून घ्या. गव्हाचे पफ मिक्सरमध्ये फिरवून त्याचीही रव्यासारखी पावडर करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून घ्या
Copyright © 2025 | Marathisrushti