(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • चकोल्या

    चकोल्या

    चकोल्या खेडेगावातील आषाढ-श्रावणातील खास पदार्थ. पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत. हवा थंड. त्याकरिता एक खमंग पदार्थ. उपास सोडण्याकरितासुद्धा हा पदार्थ करतात.

    साहित्य- १ वाटी शिजवलेली तुरीची डाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, चिंच, गूळ, जिरे, व सुके खोबरे भाजून कुटलेले, ओवा, २ वाटय़ा कणीक, तेल इ.

    कृती- प्रथम पातेल्यात तेलाची हिंग, मोहरी, मेथी घालून खमंग फोडणी करणे. त्यात शिजवलेली तुरीची डाळ घालून पाणी घालणे. नंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, जिरे, खोबरं घालून पातळ आमटी करणे.

    नंतर कणकेत तिखट, मीठ, ओवा, हळद, गोडा मसाला, तीळ २ चमचे मोहन घालून घट्ट कणीक भिजवणे. ते मळून त्याच्या पोळ्या लाटणे, त्याचे शंकरपाळे कापणे. आता आमटी ठेवलेला गॅस मंद ठेवून त्यात ते शंकरपाळे घालणे मधूनमधून हलक्या हाताने हालवणे, चांगल्या शिजल्या की गॅस बंद करणे. (साधारण घट्टच करणे) खायला देताना त्यावर साजूक तूप, बाजूला लसूण चटणी, कांदा उभा चिरलेला व भाजलेल्या भातवडय़ाबरोबर देणे.

    - सुमन सांबारे, दादर, मुंबई.

  • Masaala Paan-300

    मुखवास मसाला पान

    नागवेलच्या पानांची दांडी तोडून घ्यावी. मग पानांना बारीक चिरून त्यात वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणाला फ्रीज मध्ये ठेवावे. हे मिश्रण २-३ दिवस टिकू शकते.

  • चकोल्या

    ३१ डिसेंबर साठी शाकाहारीचे प्रकार

    रोस्टेड पेपर टोमॅटो सूप
    साहित्य:- तीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड.
    कृती:- ओव्हन २०० सेल्सिअसवर तापवून त्यात मिरच्या, लसूण, कांदा व टोमॅटो २० ते २५ मिनिटे भाजून घ्यावे. काळी झालेली साल काढून गार झाल्यावर मिक्सनरमध्ये पेस्ट करावी. गाळण्याने गाळून घ्यावी.
    त्यात व्हेज स्टॉक, लिंबाची साल घालून ५ ते १० मिनिटे उकळावे. चवीला मीठ, मिरपूड, लिंबाचा रस व क्रीम घालून गरम गरम प्यायला द्यावे. आवडत असल्यास उकळताना उकडलेला पास्ता घालावा.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    क्रीमी कॉर्न
    साहित्य::- ४०० ग्रा. चा टिन स्वीट कॉर्न (क्रीम स्टाइल), २ वाटी कॉर्नफ्लोअर, मीठ, अर्धा चमचा सफेद मिरेपूड, १ वाटी पाणी आणि तळण्यासाठी तेल.
    कृती :- स्वीट कॉर्न, १० चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरे पूड आणि पाणी मिक्स करून मिश्रण दाटसर होईर्पयत शिजवावं, तेलाचा हात लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतून पसराववं. गार होईर्पयत थांबवून मग शंकरपाळ्याच्या आकाराच्या वडय़ा पाडाव्यात. वडय़ा कॉर्नफ्लोर पावडरमधे घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळाव्यात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    लसूनी टिक्की
    साहित्य- ६ मध्यम आकाराचे बटाटे, अर्धा कप लाल तिखट, पाव कप चिरलेली कोथिंबीर, ४ ते ६ तुकडे आलं, १ मध्यम आकाराचा कांदा, ६- ८ काजू, पाव कप पनीर, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ.
    कृती - बटाटे उकडून चांगले चुरडून घ्या. त्यात मीठ घालून चांगले मळून घ्या. त्याचे दहा एकसारख्या आकाराचे गोळे करा. कांदा आणि आलं बारीक चिरून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. काजूची पावडर करून घ्या आणि ती कांदा, आलं, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि पनीर यात मिसळून घ्या. या मिश्रणाचेही दहा गोळे करा. बटाटय़ाच्या गोळ्यांमध्ये हे पनीरचे गोळे घाला. त्याला टिक्कीचा आकार द्या. कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात हे गोळे सोडून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. कागदावर पसरा. गरम असतानाच टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर खायला द्या.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    तंदुरी पनीर
    साहित्य:- २०० ग्रा. पनीर, १/२ वाटी घट्ट दही, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चमचा कसुरीमेथी, लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, चिमूटभर तंदुरी कलर, १ चमचा लिंबाचा रस, मीठ आणि अमूल बटर,
    कृती :- पनीरचे चौकोनी मध्यम आकाराचे काप करावेत. पनीर व बटर सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करावं. साहित्य चांगलं मिक्स करून पनीरच्या कापांना लावावं. ते दोन तास तसेच राहू द्यावं. स्टीलच्या सळईला पनीर लावून तंदूरमधे ठेवून ते भाजून घ्यावेत. तंदूर नसल्यास गॅसवर, धरून गोल फिरवत भाजून घ्यावेत. शेवटी बटर लावावं.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    नारळाच्या मलईचे कटलेट्स
    साहित्य:- १ वाटी नारळाची (शहाळ्याची) मलई, १ वाटी उकडलेल्या बटाटय़ांचा लगदा , १/२ वाटी तांदळाचं पीठ, मीठ, १ चमचा तीळ, गरम मसाला, हिरव्या मिरच्यांचे काप, १ चमचा साखर, १ चमचा आमचूर पावडर आणि तळायला तेल.
    कृती :- नारळाच्या मलईचे बारीक काप करावेत,. तेल सोडून वरील सर्व साहित्य चांगले एकत्र करून मिश्रण थोडं सैल ठेवावं. मिश्रणाचे चपटे कटलेट बनवून दोन्ही बाजूंनी तेल टाकून चांगले खरपूस शॅलो फ्राय करावेत.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    चीज चिली पराठा
    साहित्य :- १ वाटी किसलेलं चीज, २ चमचे चिली फ्लॅक्स, १ चमचा साखर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लसूण पेस्ट, १ वाटी, मळलेलं पीठ आणि गरजेनुसार बटर.
    कृती :- मळलेलं पीठ व बटर सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी करून त्यात सारण भरावं. पारी पॅक करून पराठा लाटून घ्यावा. बटर सोडून पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्यावा. भाजल्यानंतर तो त्रिकोणी कापावा.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    मसालेदार लच्छा पराठा
    साहित्य:- गव्हाचे पीठ एक वाटी, मैदा अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, धने-जीरे पावडर, बडीशेप पावडर, मिरची पावडर, कसुरी मेथी गरजेनुसार, बटर गरजेनुसार.
    कृती:- गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, चार टी स्पून तेल एकत्र करा. घट्ट पीठ मळून घ्या. अर्धा तास ठेवा. नंतर चपातीसाठी घेतो तेवढा गोळा घ्या. पीठ लावून मोठी चपाती लाटा. त्यावर धने-जीरे-बडीशेप पावडर भुरभुरा. त्यावर तिकट, कसुरी घाला. कागदाच्या पंख्याप्रमाणे घड्या तव्यावर भाजून घ्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    व्हेज सिझलर
    साहित्य:- अर्धा कप फ्लॉवरचे छोटे तुकडे, दोन गाजर, दोन बटाटे, एक सिमला मिरची, 8-10 फरसबीच्या शेंगा, दोन कांदे, दोन टोमॅटो बारीक चिरून, दोन अननसाच्या चकत्या, 3 सफरचंद, एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून, लाल तिखट, सैंधव, मीठ व मिरेपूड, दोन चमचे टोमॅटो सॉस, तेल, दोन चमचे लसूण पेस्ट.
    कृती:- सर्व भाज्या गार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात. गाजर, फरसबी, बटाटे, सिमला मिरची उभी कापावी. सफरचंद, अननस व कांदे बारीक चिरून घ्यावेत. उकळत्या पाण्यात गाजर, बटाटे, फरसबी, फ्लॉवरचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतावेत. त्यातच लसूण पेस्ट परतून घ्यावी. सिमला मिरचीचे तुकडे व टोमॅटोच्या फोडी परताव्या व अर्धवट उकडलेल्या भाज्या नीट अलगद मिसळून घ्याव्यात. त्यात हलकेच सफरचंद व अननसाचे तुकडे मिसळून घ्यावेत.
    सर्व्ह करताना तवा चांगला गरम करून त्यावर कोबीचे पान नीट पसरावे व त्यावर भाज्यांचे मिश्रण घालावे. एक चमचा लोण्याचा गोळा गरम तव्यावर घालून "सिझल'चा खमंग वास व वाफेसह डिश सर्व्ह करावी.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    व्हेज शाही बिर्याणी
    साहित्य:- २५० ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्लॉवर, पाव वाटी गाजर, पाव वाटी उभी चिरलेली फरसबी, ३ उभे चिरलेले कांदे, १ बटाटा, २ टॉमेटो, दीड टेबलस्पून आले:-लसूण पेस्ट, २ टेबलस्पून मिरची पावडर, १ टेबलस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून बिर्याणी मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, १ चमचा तूप, लाल, हिरवा खाण्याचा रंग, कोथिंबीर, काजू, तेल, चवीनुसार मीठ
    कृती:- प्रथम चिरलेल्या भाज्या व मटार तळून घ्याव्या. नंतर कांदा तळून घ्याव्या. काजू तळून घ्यावे. ३ चमचे तेलात कांदा परतून घ्यावा. त्यात आले:-लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, हळद टाकून एकजीव करावे. बारीक चिरलेला टॉमेटो टाकून तेल सुटेपर्यंत ढवळावे. मग तळलेल्या भाज्या, काजू टाकून दहा मिनिटे वाफवावे. चवीनुसार मीठ घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी. दुसºया भांड्यामध्ये तयार झालेली भाजी व शिजवलेला भात यांचे दोन थर लावावे. वरून लाल, हिरवा रंग, खरपूस तळून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, काजू व तूप पसरवावे. पाच मिनिटे गॅसवर ठेवून वाफ काढावी.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    सिझलर ब्राऊनी
    गरम सिझलिंग प्लेटला बटर लावून त्यावर अननसाची चकती ठेवावी. त्यावर गरम ब्राऊनीचा तुकडा व व्हॅनिलाचा स्कूप ठेवावा. त्यावर आवडत असल्यास चॉकलेट सॉस (गरम) घालावा. गरमागरम प्लेटवर ही वाफाळती सिझलर ब्राऊनी खूपच टेस्टी लागते.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    आंबा आइस्क्रीम
    साहित्य:- दीड वाटी व्हिपिंग क्रीम, थंडगार, २ कप आंब्याचा रस(सध्या डब्यातील), पाऊण वाटी पिठी साखर, वेलची पूड (ऐच्छिक).
    कृती:- मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बाऊल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
    गार झालेले काचेचे बाऊल घेऊन त्यात गार व्हिपिंग क्रीम घाला आणि फेटा. क्रीम थोडे फ्लफी व्हायला लागले की २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रीम व्यवस्थित फ्लफी झाले की फेटणे थांबवावे. यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलची पूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो इसेन्स घालायचा असल्यास २-३ थेंब घाला. नीट मिक्स करा. जर तुमच्याकडे आइस्क्रीम मशीन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटून घ्या.
    जर आइस्क्रीम मशीन नसेल तर हे मिश्रण फ्रीझर सेफ प्लास्टिक किंवा मेटलच्या भांडय़ात घाला. साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रीझरमधून काढा. मिक्सरमध्ये फिरवा. असे १-२ वेळा करून परत फ्रीझरमध्ये ठेवा. आइस्क्रीम सेट झाले की सव्‍‌र्ह करा.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    आइस्क्रीम कॉकटेल
    साहित्य:- २ स्कूप वॅनिला आइस्क्रीम, १ स्कूप मँगो आइस्क्रीम, १/४ वाटी स्ट्रॉबेरी क्रश, थोडे आंब्याचे तुकडे
    डेकोरेशनसाठी:- ४ ते ५ पिस्ता, बदाम, २ चमचे स्ट्रॉबेरी जेलीचे तुकडे, २ चमचे ग्रीन जेलीचे तुकडे, २ चमचे टूटीफ्रूटी, २-३ ग्लेझ चेरीज (पाकवलेल्या), १ वेफर बिस्कीट.
    कृती:- मध्यम आकाराचा उभा ग्लास घ्यावा. त्यात तळाला थोडा स्ट्रॉबेरी क्रश घालावा. त्यावर वॅनिला स्कूप घालावा. त्यावर जेलीचे तुकडे, ड्रायफ्रूट्स आणि थोडा अजून स्ट्रॉबेरी क्रश घालावा. फळांचे तुकडे घालावे. थोडे परत वॅनिला आइसक्रीम घालून वर मँगो आइस्क्रीमचा स्कूप घालावा. सजावटीसाठी १-२ पिस्ता, १ बदाम, टूटीफ्रूटी आणि चेरीज लावावे. कडेने वेफर बिस्कीट खोचून लगेच सव्‍‌र्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    फालुदा
    साहित्य:- ८ स्कूप्स वॅनिला आइसक्रीम, १ ते दीड वाटी रोझ सिरप, २ चमचे सब्जा बी, १/२ लिटर थंड दूध
    १ पॅकेट फालुदा शेवया, ४ चमचे ड्राय फ्रूट्स, छोटे तुकडे, स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली, १/२ वाटी टूटी-फ्रूटीचे तुकडे
    सजावटीसाठी चेरी.
    कृती:- फालुदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकिटावरील कृती वाचून जेली बनवावी. सब्जा बी फालुदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १ वाटी पाण्यात भिजवून ठेवाव्यात. १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालुदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनिटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसऱ्या भांडय़ात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे. दूध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे. फालुदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे. त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आइस्क्रीमचा १ स्कूप, दूध आणि परत त्यावर १ स्कूप वॅनिला आइस्क्रीम घालावे. ड्रायफ्रूट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.
    टीप : फालुदाच्या मधल्या लेयरमध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अननसाचे तुकडे इत्यादी आंबटगोड चवीची फळे घातल्यास फालुदा दिसायला आकर्षक तसेच चवीला स्वादिष्ट लागतो.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    जिंजरमिंट मॉकटेल
    साहित्य : एक जुडी पुदिन्याची, आल्याचे तुकडे सोलून काप करून घेतलेले, दोन कप साखर, चार
    लिंबाचा रस, शेंदे मीठ, दोन लहान चमचे भाजलेले जिरे, १०-१२ काळे मिरे, २, लवंगा, १ लहान तुकडा तेजपान, दोन मोठे चमचे मध व चुरा केलेला बर्फ.
    कृती : सर्व प्रथम पुदिन्याच्या पानांना चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावे. त्यात आलं, काळेमिरे, जिरं, मीठ, लवंगा, तेजपानं आणि कुटलेला बर्फ घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पाणी घालून घालून गाळून घ्यावे. जर मध आवडत असेल तर ते घालून थंड थंड सर्व्ह करावे. हे पेय तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • चकोल्या

    आजचा विषय वाळवण भाग ३

    उन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटला, तरी आपल्या खाद्यसंस्कृतीत त्याचं मोठं योगदान आहे. कुरकुरीत खाद्यसंस्कृतीचा वाळवण संस्कृतीत मोठे वैविध्य आहे. अडीअडचणीला उपयोगी पडावेत म्हणून खाद्यपदार्थाची बेगमी करण्याची पद्धत आपण आपल्या पूर्वजांकडून, असं म्हणायला हरकत नाही. मिठाचे गुणधर्म लक्षात आल्यावर तो पदार्थ खारवू लागला. पुढे तेल, साखर, मीठ, लवंग, मोहरी, काळेमिरे या सर्वाचा वापर तो पदार्थ संरक्षित ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्याची चव वाढवण्यासाठीही करू लागला. तेव्हापासून ते आजतागायत या प्रथेचे आपण पालन करत आहोत.
    झटपट कुरडया
    साहित्य: एक वाटी दलिया, (बाजारात दलियाचे पाकीट मिळते.) मीठ, तुरटी, पाणी
    कृती : एक वाटी (१०० ग्रॅम) दलिया भिजत घाला. दुसऱ्या दिवशी त्याचा आंबूस वास येतो. असे झाल्यास कुरडया करण्यास ते तयार आहे, असे समजावे. ते आंबले नाही, तर आणखी एक दिवस त्याचे एकदा पाणी काढून पुन्हा भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी काढून त्यात दोन वाटय़ा पाणी घालून हाताने व्यवस्थित कुस्करून (मिक्सरवरही हे करता येईल.)प्लास्टिकच्या गाळणीने गाळून घ्यावे. असेच पुन्हा दोन वाटय़ा पाणी टाकून पुन्हा गाळणीने गाळून घ्या. आता दलिया हाताला मोकळा लागतो. गाळून घेतलेले सत्त्व एकसारखे ढवळून घ्या. पातेल्यात अर्धी वाटी पाणी, त्यात आवश्यकतेनुसार थोडे मीठ, अर्धी चिमुट तुरटी पावडर घालून ते पाणी उकळा. उकळी आली की त्या पाण्यात गव्हाचे सत्त्व टाकून चांगले हलवून झाकण ठेवा. ताटलीवर थोडे पाणी ठेवा. पाच ते दहा मिनिटांनी झाकण काढून पुन्हा चांगले हलवून गॅस बंद करा. सोऱ्याने कुरडया घाला. कडकडीत वाळवून हवे तेव्हा तळाव्यात.
    बाजरीच्या खारोडय़ा
    साहित्य- अर्धा किलो बाजरी, दोन वाटय़ा ताक, मीठ, एक कांदा, दोन चमचे लसूण पेस्ट, सात-आठ बारीक चिरलेली मिरची.
    कृती- बाजरी निवडून तीन-चार तास पाण्यात भिजत घाला. नंतर उपसून मिक्सरवर दळा अथवा खलबत्त्यात कांडा. मिक्सरवर केल्यास जरासे भरडेच वाटा. रात्री ताकात बाजरीचे पीठ भिजवा. रात्रभर पीठ आंबू द्या. दुसऱ्या दिवशी चार वाटय़ा पिठाला आठ वाटय़ा पाणी घ्या. गॅसवर मोठय़ा भांडय़ात पाणी उकळू द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची व मीठ घाला. पाणी चांगले उकळल्यावर त्यात बाजरीचे आंबवलेले पीठ घालून चांगले शिजू द्या. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. पिठाला दाटपणा आल्यावर चांगले हलवून गॅसवरून खाली उतरवा. जरा थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर अथवा ताटावर छोटय़ा मुगोडय़ांप्रमाणे टाका. कडक उन्हात दाने-तीन दिवस वाळवा. चांगले वाळवल्यावर कच्चे तेल व कांदा बारीक चिरून घाला. या खारोडय़ा तळत नाहीत.
    सरगुंडे
    साहित्य : एक वाटी शेवयाचा रवा, (शेवयाचा रवा तयार मिळतो.) साखर, मीठ चवीप्रमाणे, टूथपिक्स
    कृती : रवा पाण्याने घट्ट भिजवावा. भिजवताना त्यात मीठ, साखर घालावी. दोन तासांनी दूधपाणी घालून तो मऊ करून घ्यावा. शेवयाप्रमाणे सूत बारीक काढावे. टूथपीकवर हे सूत गुंडाळावे व सुकत घरातच ठेवावे. एका तासाने ते वाळून स्प्रिंगसारखे निघतील हे सरगुंडे. गावठी न्यूडल्स म्हणा हवं तर. असे हे सरगुंडे गरम पाण्यात तेल, मीठ व साखर घालून उकळावेत. चाळणीत काढून थंड पाणी ओतावे.
    गावठी आंब्याच्या रसात सरगुंडे घालून खातात. विदर्भात खेडेगावांत सरगुंडे, आंब्याचा रस याचे जेवण म्हणजे मेजवानी मानली जाते.
    चवदार चिकवडय़ा
    साहित्य- दीड वाटी साबुदाणा, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, चवीनुसार मीठ, एक चहाचा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, तीन-चार हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबिर.
    कृती- दीड वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी दोन वाटय़ा पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ, जिरे पावडर, हिरव्या मिरच्यांचा जाड ठेचा, कांद्याचा व टोमॅटोचा गाळून घेतलेला रस त्या पाण्यात घाला. कोथिंबिरीची हिरवी छोटी पाने त्यात घाला. साबुदाणा घालून चिक शिजवा. पारदर्शक (ट्रान्सपरंट) झाला की प्लास्टिक पेपरवर चमच्याने गोल गोल पापडय़ा घाला. या पापडय़ा थोडय़ाशा सुकल्यावर कात्रीने कापून त्याचे लांबट चौकोनी तुकडे करा व त्यांची पोकळ गुंडाळी करा. कडक उन्हात वाळवून या ‘स्टिक्स’ तेलात तळून खाव्यात.
    भुसवडय़ा
    साहित्य- एक वाटी गहू, अर्धी वाटी ज्वारीचा भरडा, पाऊण इंच आले, तीन मध्यम तिखट मिरच्या, चवीनुसार मीठ
    कृती- गहू तीन दिवस पाण्यात भिजत ठेवा. रोज रात्री त्यातील पाणी काढून दुसरे घाला. तिसऱ्या दिवशी गहू मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून जाडसर दळून घ्या. गव्हाचा चोथा पिळून गव्हाचा रस बाजूला करा. पुन्हा थोडे पाणी घेऊन चोथा त्यात धुऊन घ्या. गव्हात ज्वारीचा भरडा, मिरची, आले यांची गोळी घालून ते मिश्रण गॅसवर शिजवा. वाफ आली की, हे मिश्रण खाली उतरवून त्यात मीठ घाला. मिश्रण मळून त्याचे गोल चप्पट गोळे करून ते उन्हात वाळवा. ते वाळल्यावर गरम तेलात खुसखुशीत तळा. या भुसवडय़ा पापड-कुरडय़ाप्रमाणे चवदार लागतात.
    वाळवलेली कोथिंबीर
    साहित्य - कोथिंबीर, मीठ, तिखट किंवा ओली मिरची.
    कृती - कोथिंबीर धुवून निथळून घ्यावी. बारीक चिरावी, त्यात वाटलेली ओली मिरची किंवा लाल तिखट व मीठ घालावे. ते एकत्र करून उन्हात वाळवावे.
    वाळलेली हरभऱ्याची भाजी
    साहित्य. एक किलो हरभऱ्याची पालेभाजी.
    कृती. या भाजीचा सीझन असतो, तेव्हा ही भाजी कडकडीत उन्हात चार दिवस वाळवावी. नंतर थोडी हाताने चुरडून बरणीत भरून ठेवावी. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात भाज्या खूप कमी येतात, तेव्हा ही वाळलेली भाजी उपयोगाला येते. थोडी भाजी गरम पाण्यात भिजवून नेहमीप्रमाणे भाजी करता येते. अर्धी वाटी भाजी, एक वाटी बेसन घेऊन एकत्र पाण्यात कालवून आमटीप्रमाणे लसणाची फोडणी केल्यास छान आमटी किंवा पिठल्याचा प्रकार तयार होतो.
    पोह्यांचे मिरगुंड
    साहित्य. एक किलो जाड पोहे, मिरची पूड, मीठ, पापडखार, हिंग.
    कृती. पोहे भाजून घ्यावेत किंवा उन्हात वाळवून घ्यावेत व नंतर दळून आणावेत. दळलेल्या पिठातील दोन वाट्या पीठ घ्यावे. जाड बुडाच्या भांड्यात दोन वाट्या पाणी तापवावे. त्या पाण्यात दोन चमचे मिरची पूड, मीठ, अर्धा चमचा हिंग, दीड चमचा पापडखार घालावे. उकळी आल्यावर त्यात पोह्याचे पीठ घालून छान शिजवून एकजीव करावे. झाकून वाफ येऊ द्यावी. नंतर पीठ काढून त्याला तेलाचा हात लावून चांगले मळावे. त्यानंतर खलबत्त्यात पीठ कुटून घ्यावे. पीठ मऊसर झाले पाहिजे. नंतर याचे गोळे करून लाटावेत व उन्हात वाळवावेत. तळल्यानंतर हे मिरगुंड छान फुलतात.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • चकोल्या

    चीझ कॉर्न रोल

    साहित्य: चीज १ वाटी, हिरवी चटणी २ टे. स्पून, काळीमिरी पूड १ टे. स्पून, साबुदाण्याचे पीठ १ वाटी, स्मॅश केलेला बटाटा १ वाटी, कॉर्न १ वाटी, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार.

    कृती: प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, चीज, हिरवी चटणी, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. उकडलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण मळुन घ्या. बटाट्याचे रोल करुन त्यात कॉर्नचे मिश्रण स्टफ करा आणि नंतर रोल पीठात घोळवून तळुन घ्या. अश्याप्रकारे चीज कॉर्न रोल तयार.

  • चकोल्या

    कसुरी मेथीच्या नमकीन पुऱ्या

    साहित्य : पाव किलो मैदा, १ मोठा चमचा कसुरी मेथी, २ चमचे तीळ व तेवढाच ओवा हातावर खरडून घ्यावा. आवडीप्रमाणे तिखट-मीठ, तळायला तेल ३ वाट्या, तसेच ७ मोठे चमचे मोहनासाठी तेल

    कृती : प्रथम मैदा चाळून घ्यावा. मग तो एका तसराळ्यात ठेवावा. त्यात तेलाचे कडकडीत गरम मोहन घालावे. तसेच तिखट - मीठ, तीळ व ओवा त्यात घालावा. मग मैद्याला हे सर्व तेलासह चांगले चोळावे. कसुरी मेथी चुरून घालावी. आता मैदा पाण्याने अगदी घट्ट भिजवावा व २ तास झाकून ठेवावा. या गोळ्याचे ४ ते ५ सारखे भाग (गोळे) करावेत. १ गोळा घ्यावा व त्याची ओट्‌यावर (तेल लावून) मोठी पोळी लाटून, लहान वाटीने सारख्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात व मध्यम आचेवर बदामी रंगावर खमंग तळाव्यात. त्या कागदावर टाकाव्यात म्हणजे जास्तीचे तेल कागदाला लागेल. या पुऱ्या खुसखुशीत व चविष्ट लागून १०-१२ दिवस छान राहतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • चकोल्या

    आगरी कोळी स्टाईल “बांगडा फ्राय”

    म्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला , पाऊण चमचा हळद ,७ ते ८ लसणाच्या पाकळ्या ,१ इंच आल्याचा तुकडा ,आवडीनुसार १ टी. स्पून चिंचेचा कोळ ,३ ते ४ हिरव्या मिरच्या ,अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी,चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या .

  • चकोल्या

    चीज व्हेजिटेबल सॅंडविच

    साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, १ मध्यम भोपळी मिरची, बारीक चिरून, १/२ कप पातळ चिरलेली कोबी, १/२ कप जाडसर किसलेले गाजर, १/२ कप बारीक चिरलेला फ्लॉवर, १/२ कप दूध, १ टेस्पून मैदा, १/४ कप किसलेले चीज, १/४ टिस्पून काळी मिरपूड, २ टेस्पून बटर, चवीपुरते मिठ, १/२ टिस्पून साखर.

    इतर साहित्य: ३ टेस्पून तिखट हिरवी चटणी (कोथिंबीर मिरचीची), टॉमेटो केचप.

    कृती: मैदा आणि दूध एकत्र करून ठेवावे. गुठळ्या राहू देउ नयेत. बटर कढईत घेउन त्यात सर्व भाज्या २ मिनिटे मोठ्या आचेवर परताव्यात. मिरपूड, साखर आणि मिठ घालावे. आच कमी करून भाज्यांमध्ये मैदा+दुधाचे मिश्रण घालावे. नीट मिक्स करावे. जरा घट्टसर झाले की चीज घालून मिनिटभर मिक्स करावे. ४ ब्रेड स्लाईसेसवर चटणी लावावी. उरलेल्या ४ स्लाईसेस वर टॉमेटो केचप लावावा. तयार मिश्रण कोमट झाले की त्याचे ४ समान भाग करावे. चटणी लावलेल्या स्लाईसेस वर ठेवावे. वरून टॉमेटो केचप लावलेला ब्रेड ठेवून सॅंडविच तयार करावे. तिरपे कापून दोन त्रिकोणी तुकडे करावे. टॉमेटो केचप आणि हिरवी चटणीबरोबर सर्व्ह करावे.

  • चकोल्या

    गुलगुले

    साहित्य:- २ वाट्या पुरण, जायफळ - वेलची पूड, काजू - बदामाचे बारीक तुकडे, २ वाट्या उडदाच्या डाळीचे पीठ, थोडी पिठीसाखर, तळण्यासाठी रिफाईंड तेल अथवा तूप.
    कृती:- पुरणात जायफळ, वेलची पूड, काजू - बदामाचे बारीक तुकडे घालावेत. उडदाच्या डाळीच्या पिठात थोडे मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर व पाणी घालून सरसरीत कालवावे. (भजीच्या पिठाप्रमाणे) तेल तापले की पळीभर तेल त्यात घालावे. पुरणाचे छोटे - छोटे गोळे ह्या पिठात बुडवून तळावेत. गरमागरम गुलगुले वाढावेत व साजूक तुपाबरोबर खावेत.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • चकोल्या

    ओसामण

    साहित्य - अर्धी ते पाऊण वाटी तुरीची डाळ, फोडणीसाठी दोन-तीन लवंगा, दालचिनी, तमालपत्र, एखाद्‌-दोन लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर फोडणी.

    साहित्य - सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, लांब उभे किसलेले खोबरे (ऐच्छिक).

    कृती - डाळ सात-आठ वाट्या पाणी घालून शिजवून घ्यावी. वरचं-वरचं सर्व दाट पाणी काढून घ्यावं. त्यात मीठ, थोडीशी साखर घालावी. वरून लवंग, दालचिनी, एखाद-दोन लाल मिरच्या व तमालपत्राची फोडणी घालावी. वरून कोथिंबीर, खोबरं (ऐच्छिक) घालून सजवावे व गरम-गरम प्यावं.
    गरम मसाल्याऐवजी एखादी हिरवी मिरची वा थोडे आले घालून हिंग, जिरे यांची फोडणी दिल्यावरही छान चव लागते. तमीळ रसम्‌चा हा गुजराती भाऊच म्हणा ना!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३