महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, कुठल्याही व्यक्तीसाठी प्रियच आहे.
ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात.
घरासमोर लावलेल्या हरतर्हेच्या भाज्या हे नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.
मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
साहित्यः
सव्वा कप भिजवलेला साबुदाणा,२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,२ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,दीड टीस्पून लाल तिखट,दीड टीस्पून लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,तेल.
चटणीसाठी लागणारे साहित्य:
१/२ कप खवलेले ओले खोबरे,२ लहान हिरव्या मिरच्या,३ टेबलस्पून दही,१/२ कप कोथिंबीर.
कृतीः
प्रथम साबुदाणा भिजत घालावा. साबुदाणा भिजविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणे घ्यावेत. साबुदाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी घालावे व लगेच पाणी निथळुन घ्यावे. अगदी थोडेसे पाणी शिल्लक ठेवावे व त्यावर झाकण ठेवावे. साधारण २ तासांनी त्यात लिंबाचा रस घालावा व पुन्हा झाकुन ठेवावे व साधारण १ ते दीड तास थांबावे. उकडलेला बटाटा किसून घेऊन त्यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व त्यात शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. चटणी तयार करण्यसाठी चटणीचे वरील दिलेले सर्व साहित्य मिक्सरमधून एकत्र फिरवून घ्यावे व गरमागरम वडे ओल्या खोबर्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.
अर्धा कप पाणी व जिलेटिन एकत्र करा. डबल बॉयलरवर विरघळवून घ्या. दूध, साखर, कोको, अंडी वापरून कस्टर्ड बनवा. गार झाल्यावर जिलेटिन घाला. थोडे क्रीम घाला. काचेच्या बाऊलमध्ये सेट करा. वर फेसलेले क्रीम, अक्रोडाचे तुकडे पेरा, किंवा किसलेले चॉकलेट पेरा. तरुण मंडळींचा हा आवडता पदार्थ आहे
साहित्य :- दोन वाट्या टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा सालासह देशी तीळ, एक चहाचा चमचा हातावर चोळलेला ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या तेल.
कृती :- प्रथम एका बाऊलमध्ये टरबुजाचा कीस घ्यावा. त्यात तिखट, मीठ, तीळ व ओवा घालावा. त्यात तांदळाची पिठी घालावी. हे मिश्रण थेडे दाट होण्यासाठी त्यात मावेल तेवढे बेसन घालावे. कढईत मंद आंचेवर तेल गरम करावे. त्यात वरील मिश्रणाची छोटी छोटी बोंडे तयार करून तळावीत. गरम खायला द्यावीत.
टीप वरील मिश्रण थोडी जास्त पिठी आणि बेसन घालून घट्टच परतावे. त्याचे वडे हातावर थापून ब्रेड क्रम्स, जाड रवा किंवा शेवईचा चुरा यांपैकी एकातच वडे घोळून तव्यावर परतावेत. तसेच टरबुजाच्या किसात फक्त गूळ आणि मावेल तेवढी कणीक कालवूनही हा पदार्थ करता येतो.
हे मिश्रण थोडे पातळ करून त्याची धिरडीही करता येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : बोनलेस चिकन – १/२ किलो, दही – ३/४ कप, मिरपुड – १ चमचा, क्रीम – १ चमचा, कॉर्न फ्लोअर – ३ चमचे, गरम मसाला पावडर – १/२ चमचा, वेलची पावडर – १/४ चमचा, लसुण पेस्ट – १ चमचा, आल्याची पेस्ट – २ चमचे, जीरा पावडर – १/२ चमचा, हिरव्या मिरची ची पेस्ट – दीड चमचा, आमचूर पावडर – १/४ चमचा, आवश्यकतेनुसार चाट मसाला, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : चिकन नीट धुवून घेणे. आता एका मोठ्या बाऊल मध्ये दही, क्रिम, कॉर्न फ्लोअर एकत्रित करुन घेणे. आता त्यात आलं-लसुण पेस्ट, वेलची पावडर, गरम मसाला पावडर, मिरपुड, जीरा पावडर, हिरव्या मिरचीची पेस्ट, आमचूर पावडर, मीठ घालून एकत्रित करुन घेणे. आता या मिश्रणात चिकन चे पिसेस घालून १ तासासाठी फ्रीज मध्ये ठेवा.
आता हे चिकन चे पिसेस स्टीक वर एक एक करुन लावा. त्यांच्या मध्ये भोपळी मिरची, टोमॅटो, कांदा चिरून लावू शकता. आता चिकन ला ओवन मध्ये १५ मिनिटे ग्रिल करावे किंवा एका पॅन मध्ये बटर/तेल/तूप घालून त्यावर शिजवावे. त्यानंतर त्यावर चाट मसाला घालून चिकन मलाई टिक्का सर्व्ह करावा.
बटाटे व लसूण वाटून घ्यावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ व लिंवृरस घालावा व तेल घालून डबव्यवे.
दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते, उरलेल्या फराळाचं करायचं तरी काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, एक दही-भाताबरोबर चकली होईल, एक दिवस नाष्ट्याला उरलेला चिवडा,शंकर पाळी. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं, ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत.
अशावेळेस फराळापासून काही नवीन पदार्थ बनवून बघा.
चिवडा मिसळ
साहित्य- मोड आलेली मटकी २ वाट्या, बटाटा १, आले लसूण पेस्ट १ चमचा, जाडे पोहे भिजवलेले १ वाटी, तेल आवश्यकतेनुसार, मोहरी अर्धा चमचा,जिरे अर्धा चमचा, १ लिंबू,३ कांदे, १ टोमाटो, फराळातील तयार चिवडा १ वाटी, फरसाण १ वाटी, सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी, तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, गरम मसाला पाव चमचा,कोथिंबीर अर्धी वाटी, हळद पाव चमचा, पाणी आवश्यकतेनुसार
कृती:- मटकीची उसळ बनवण्यासाठी एका भांड्यात मटकी व ६ कप पाणी घेऊन १० मिनिटे उकळावे. मटकी दाबून पहावी. शिजली असल्यास मग त्याचे पाणी काढून बाजूला ठेवावे. एका पातेल्यात ३ चमचे तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग १ कांदा बारीक चिरून टाकावा. कांदा शिजल्यावर थोडीशी हळद, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट टाकून थोडेसे परतावे. टोमाटो टाकून तिखट टाकावे. २ मिनिटे परतावे. मोड आलेली मटकी, मीठ टाकून त्यात उकडलेला बटाटा अर्धवट कुस्करून टाकावा. उसळ पूर्ण कोरडी होऊ द्यावी. कट (तिखट रस्सा) बनवण्यासाठी प्रथम एक कांदा चिरून घ्यावा. तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून त्यावर खरपूस परतावा. त्याच तव्यावर खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. खोबरे व कांदा एकत्र करून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे. आता एका भांड्यात ७-८ चमचे तेल घ्यावे. त्यात वाटलेले मिश्रण, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला टाकून बारीक गॅस वर ५ मिनिटे परतत राहावे. मग त्यात मटकी शिजवलेले पाणी टाकून कट पातळ करून घ्यावा. हवे असल्यास अजून पाणी टाकून पातळ करावे. सर्व्ह करताना एका बाऊल मध्ये प्रथम चिवडा, त्यावर उसळ, मग कट, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, व कोथिंबीर असे सर्व्ह करतात. हवे असल्यास कट अजून एका बाऊल मध्ये बाजूला द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चकली टिक्की
साहित्य:- ७-८ चकल्या, २ मऊ उकडलेले बटाटे, कोथिंबीर, मीठ, अर्धी वाटी फ्रेश ब्रेडक्रम्स, तेल.
कृती : बटाटे किसून घ्या. चकल्यांचा मिक्सरवर व्यवस्थित चुरा करून घ्यावा. बटाटे, चकल्यांचा चुरा, कोथिंबीर आणि मीठ एक करून व्यवस्थित गोळा करून घ्यावा. त्याच्या आवडीच्या आकाराच्या टिक्की वळून घ्याव्या. ब्रेडक्रम्समध्ये घोळवून थोड्याशा तेलावर फ्राय करून घ्याव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लाडवाची खमंग साटोरी
साहित्य : ५-६ रव्याचे लाडू, पाव टी स्पून वेलची पावडर, दूध, प्रत्येकी अर्धी वाटी कणीक, बारीक रवा आणि मैदा, ३ चमचे तुपाचं मोहन, किंचित मीठ, परतण्यासाठी तूप, २-३ चमचे पिठी. कृती : रव्याचे लाडू बारीक करून त्यात २ चमचे दूध आणि वेलची पावडर मिक्स करून ठेवावी. कणीक, रवा आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ घालावं. ३ चमचे तूप चांगलं गरम करून पिठावर घालून व्यवस्थित चोळून घ्यावं. लागेल तसं दूध किंवा पाणी घालून मऊसर पीठ भिजवून झाकून ठेवावं. साधारण अर्ध्या तासाने पिठाचे तुकडे करून मिक्सरवर बारीक करून घ्यावं. पीठ मिक्सरबाहेर काढून व्यवस्थित मळून घ्यावं. पिठाच्या पुरीहून थोड्या मोठ्या लाट्या घेऊन थोडं लाटून घ्यावं. त्याची वाटी बनवून त्यात तयार सारण भरून वाटी व्यवस्थित बंद करून घ्यावी. साधारण पुरीएवढ्या आकाराची जाडसर साटोरी लाटून घ्यावी. जाड तव्यावर आधी कोरडी साटोरी दोन्ही बाजूंनी भाजावी. नंतर त्याला थोडं तूप लावून छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकमत.
(चकलीची भाजणीचे प्रमाण हे एक जनरल कृती दिली आहे.आपले सभासद सुगरण आहेत.आपल्या चवी प्रमाणे थोडे बदल करुन घ्यावेत.)
चकली म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. दिवाळी ला तर हमखास सगळ्यांच्या घरी चकली केली जाते.
चकली भाजणी पद्धत १
साहित्य:- भाजणीसाठी एक किलो तांदूळ, अर्धा किलो मूगडाळ, पाव किलो उडीद डाळ व पाव किलो हरबरा डाळ, धने १०० ग्रॅम, २५ ग्रॅ. जिरे.
कृती-तांदूळ धुवून घ्यावे. सुकल्यावर गुलाबी रंगावर भाजावे. त्याचा रूचकर वास यावा. तसेच डाळी स्वतंत्र भाजून घ्याव्यात. त्यात धने १०० ग्रॅम, २५ ग्रॅ. जिरे खमंग भाजून मिसळावे. अशी एकत्रित भाजणी दळून आणावी.
चकली भाजणी पद्धत २
साहित्य- ४ वाटय़ा तांदूळ, २ वाटय़ा हरभरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी धने, पाव वाटी जिरे, कृती- धान्ये धुवून भाजावी. त्यात धने, जिरेही घालावे. गार झाल्यावर भाजणी दळून आणावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चकलीचे प्रकार
चकली
साहित्य:- ५ भांडी चकलीची भाजणी, ३ भांडी पाणी, ५ टीस्पून घरचं लोणी किंवा तेल, २-३ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, २ टेबलस्पून तीळ, १-२ टीस्पून ओवा, मीठ चवीनुसार. तळण्यासाठी तेल.
कृती:- एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यात लोणी किंवा तेल, तिखट, मीठ, हळद, तीळ आणि ओवा घाला. गॅस बंद करा. आता त्यात भाजणी घाला आणि चमच्यानं एकत्र करून घ्या. गरम असताना नीट एकत्र होणार नाही तेव्हा जसं जमेल तसं एकत्र करा. झाकून ठेवून द्या. २-३ तासांनी किंवा पीठ थंड झाल्यावर ते परातीत काढून घ्या. चांगलं मळून घ्या. मळताना लागेल तसं साधं पाणी घाला. चकलीचं पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरासं घट्ट हवं.
मळलेलं पीठ चकलीच्या सो-यात घाला. चकल्या पाडा. कढईत तेल कडकडीत गरम करा. नंतर आच मध्यम ठेवा. चकल्या लाल रंगावर तळा. तेलाचं तापमान सतत एकसारखं राह्यला हवं. म्हणून तेल जरा थंड झालंय असं वाटलं तर आच वाढवा. पण गरम झाल्यावर परत मध्यम ठेवा. चकल्या फार लाल करू नका.
टिप्स:-चकल्यांना हळद कमीच घालावी म्हणजे रंग छान येतो. मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ.
कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. पीठ खूप घट्ट वा पातळ नको, अशा अंदाजाने तांदूळ पीठ व बेसन घालावे. चपट्या टिक्क्या रव्यात घोळवून शॅलो फ्राय कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti