महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: २ वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, ३ मोठे उकडलेले बटाटे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या वाटून, १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर, चवीनूसार पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप.
कृती: कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.
किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा.
भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.
कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा.
जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.
दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या.
साबुदाणा वड्याची पाककृती..
हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली.
साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक, तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे) शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे. मीठ चवीनुसार.
कृती: गाजर आणि बीट किसून घेणे, मटार मिक्सर मधून वाटून घेणे. मिश्रण एका ताटात काढून त्यात हळद , तिखट, गरम मसाला, कसूरीमेथी , गरम मसाला मिसळावे. कसूरी मेथीचा ही एक वेगळा स्वाद येतो. (घरात कोथिंबीर नसेल तरी ही त्या एवजी कसूरी मेथी वापरता येते). मीठ सर्वात शेवटी अर्थात परांठे बनविण्याच्या वेळी टाकावे. कणकीची परी लाटून त्यात मिश्रण भरून परांठा गोल आकारात लाटून घ्या. तव्यावर पराठा भाजून घ्या (बिना तेल आणि तूप वापरता) . गरमागरम परांठा सर्व करताना त्यावर लोणी किंवा तूप घाला. अत्यंत स्वादिष्ट लागेल. ज्यांना तेल आणि तूप टाकून परांठा खरपूस भाजायचा असेल ते तसे करू शकतात. (अस्मादिकांना तेल/ तूप कमी खाण्यास सांगितले आहे, काय करणार)
गरमागरम परांठा त्यावर गायीचे तूप, हिरवी चटणी, टमाटो साॅस व काळी मिरी टाकलेल्या दही सोबत परांठा खायला मिळाला. हा मिश्र परांठ खाताना खरंच मजा आली.
साहित्य : कुरमुरे, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली), ४ हिरव्या मिरच्या, खारे शेंगदाणे, कैरीचे बारिक तुकडे, फरसाण, बारीक शेव, लिंबाचा रस, चवीपुरते मीठ,बारिक चिरलेला टोमॅटो.
कृती ः कुरमुरे २-४ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे म्हणजे कुरकुरीत राहतील. परतताना चमच्याने ढवळत राहावे म्हणजे कुरमुरे जळणार नाहीत. परतलेले कुरमुरे मोठ्या परातीत काढावे.
कुरमुरे जरा गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
प्रथम चिकन साफ करून त्याचे बारीक चौकोनी तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यात वर सांगितलेल्या प्रमाणानुसार अंड्यातला पांढरा भाग, वाईन, मीठ, साखर, कॉर्नफ्लोअर, अजिनोमोटो व सोयासॉस एकत्र करावे. नंतर हे मिश्रण चिकनला लावून अर्धा तास बाजूला ठेवावे.
दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. भाज्या, फळे यांचंही तसंच आहे… चांगलं वाटतं, गोड असतं, चविष्ट लागतं तेवढंच घ्यायचं आणि फळांच्या साली, बिया, त्याची पानं किंवा कोथिंबिरीसारख्या पानांचे देठ फेकून द्यायचे. चुकतं ते इथंच… खरं तर गंमत असते ती ‘साली’तच… साली, बिया, पाने किंवा देठातच प्रथिने आणि जीवनसत्वे असतात.
तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे. ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.

कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे करून ते गुळाच्या पाकात टाकणे (जिलबी तळल्यावर जशी पाकात टाकतात त्याप्रमाणे). ते लगेच पाकातून काढून खावेत. पटकन करायचं आणि गटकन गिळायचं असं हे गडगिळं.
- पद्मा कऱ्हाडे, जोगेश्वरी, मुंबई.
Copyright © 2025 | Marathisrushti