महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- १ मोठी जुडी शेपू, २-३ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथी दाणे, ८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून १/४ कप भिजवलेले शेंगदाणे, २ टेस्पून भिजवलेली तूर डाळ, १/२ ते ३/४ कप थालीपीठाची भाजणी, २ टिस्पून गूळ (ऐच्छिक), चवीपुरते मीठ.
कृती- शेपू निवडून घ्यावा. खोल भांड्यात पाणी घ्यावे व स्वच्छ करावा. नंतर चिरून घ्यावा. कुकरच्या डब्यात शेपू व मिरच्या मोडून घालाव्यात. कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून भाजी शिजवावी. भाजीच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर भिजवलेले शेंगदाणे ठेवून तेही शिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालावी. लालसर होईस्तोवर परतावे. मेथीदाणे घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी आणि हळद घालून फोडणी करावी. फोडणीत भिजवलेली तूरडाळ घालून मंद आचेवर वाफ काढावी. डाळ अर्धवट शिजली कि शिजवलेले शेंगदाणे घालावेत. मिनिटभर परतावेत. यात शिजवलेली शेपूची भाजी घालून नीट मिक्स करून घ्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून मिनिटभर शिजवावे. नंतर थालीपीठाची भाजणी पेरून मिक्स करावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. झाकण ठेवून २ वाफा येउ द्याव्यात. भाजी गरमच भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बटाटे उकडून घ्या. ते कुस्करून घ्या, ताजा कुटलेला गरम मसाला, चवीप्रमाणे आलं, लसूण, मिरची यांचे एकजीव मिश्रण करा. हे मिश्रण कुस्करलेल्या बटाटयांत चांगले मिसळा. एक चवदार व एकजीव मिश्रण तयार होईल याची काळजी घ्या. वेगवेगळया आकाराचे पॅटिसचे साचे बाजारात मिळतात. शंकरपाळी, बदाम यासारखा आकार या मिश्रणाला द्या. पॅटिसचा साचा नसेल तर घरी देखील आपण निरनिराळे आकार देऊ शकतो. मिश्रणाला आकार दिल्यावर सुक्या पावाचा कुस्करा करा. त्यात थोडा रवा देखील मिसळला तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे रव्याचाच लेप कच्च्या पॅटिसला बाहेरून द्या.
गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा... आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी असतील, तर आपला स्वत-चा खाद्यपदार्थाचा डबा उघडताच "चाखों ना थेपला न् अथनु (लोणचं)‘ असं म्हणून त्यांच्या डब्यातील खाऊ आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की. गुजराती जेवणखाण म्हटलं, की सर्वप्रथम सुरत शहराचं नाव आठवतं. गुजराती लोकांमध्ये तर म्हणच आहे, की "सुरतनू जमण (जेवण) अने काशीनो मरण.
गुजराती लोकांच्या जेवणात एकूणच "फरसाण‘ या प्रकाराला फार महत्त्व आहे. फरसाण म्हणजे आपण बाजारातून आणतो ते शेव, गाठियावालं फरसाण नव्हे, तर फरसाण म्हणजे जेवणातील साईड डिश वा नाश्त्या चे पदार्थ; मग ती कधी मुगाची भजी असतात, कधी मेथीचे गोटे, कधी इदडा, तर कधी खाटा ढोकळा वा पापडी चाट.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही कृती गुजराथी पदार्थांच्या.
ओसामण
इदडा
पोंक वडा (पोंक म्हणजे हुरडा)
पोंक पॅटिस
मुठिया
मेथी ठेपला
चवळी उसळ करण्याआधी आठ- दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे.
पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा. चार ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे. हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.

दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंठेची पूड घालावी यामुळे दहीवडे चविष्ट बनतात. भोपळ्याच्या भाजीला वरून मेथी दाण्याचा तडका दिल्यानं भाजीला वेगळी चव येते.
सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.
साहित्य:- दोन वाटी मैदा, चवीला मीठ, चार मोठे चमचे तेलाचे मोहन, साटा ः अर्धी वाटी कोणतेही वनस्पती तूप, पाउण वाटी कॉर्नफ्लोअर.
सारण:- एक वाटी सुक्याा खोबऱ्याचा कीस, अडीच वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी खसखस, एक वाटी कणीक, सात ते आठ पिस्ते, दोन मोठे चमचे चारोळी, थोडे बेदाणे, वेलचीपूड.
कृती:- मैदा व मीठ एकत्र करून त्यात मोहन घालावे व साधारण तीन तास घट्ट भिजवून ठेवावे. नंतर पीठ कुटावे व त्या पिठाचे गोळे करून ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावे.
साठा ताटात तूप खूप फेसून घ्यावे. तुपाची कणी मोडली, की त्यात थोडे थोडे कॉर्नफ्लोअर घालून गोळा करावा.
सारण कृती:- थोड्या तुपावर कणीक खमंग भाजावी, खोबऱ्याचा कीस मंद आचेवर बदामी रंगावर भाजून, कोमट असताना चुरावे. खसखस भाजून पूड करावी. त्यात पिठीसाखर, चारोळी, पिस्तेकाप, बेदाणे व वेलचीपूड घालून सारण तयार करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : एक कैरी, एक कांदा मोठा, एक गड्डी पुदिना, कोरडय़ा खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी मीठ, गूळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, हिंग, मोहरी.
कृती : पुदिना (नुसती पाने) स्वच्छ धुऊन निवडून घ्यावी. कैरी किसून घ्यावी. कांदा बारीक चिरावा. त्यात तिखट, मीठ, गूळ, कोिथबीर, मिरची सर्व एक करून बारीक वाटावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. वरून खमंग अशी तेलाची फोडणी घालावी.
Copyright © 2025 | Marathisrushti