महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.
काकड्यांची साले काढून घ्या व त्या किसणीवर किसून घेऊन त्या किसात दही, चवीनुसार मीठ व साखर घालून कालवून १० मिनिटे एका बाजूला ठेवा. काकडीच्या किसाला चांगले पाणी सुटेल. मग तो कीस हाताने पिळून त्यातील पाणी एका बाउलमध्ये काढा.
साहित्य:
२५० ग्रॅम स्ट्रॉबेरी
४०० ग्रॅम पिठीसाखर
कृती:
स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे. मंदाग्नीवर असू द्यावे. झाकण ठेवावे. नंतर हलक्या हाताने ढवळत राहावे. जाडसर पाक झाला की उतरावा. हा जॅम जास्त दिवस टिकत नाही.
मुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.
उन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटला, तरी आपल्या खाद्यसंस्कृतीत त्याचं मोठं योगदान आहे. कुरकुरीत खाद्यसंस्कृतीचा वाळवण संस्कृतीत मोठे वैविध्य आहे. पापडाचा उल्लेख थेट बौद्ध काळापासून आढळतात. १३व्या शतकातील कानडी तसेच मराठी साहित्यात ठायी ठायी सांडगे व पापडाची वर्णने आहेत. १४व्या शतकातील मुहोम्मद जायसीने लिहिलेल्या ‘पद्मावत’ या काव्यात चित्तोडच्या सम्राटाने अल्लाउद्दीन खिलजीला दिलेल्या मेजवानीत मेंथौरी किंवा कुम्हरौरी म्हणजे कोहळ्याचे सांडगे होते, असे वर्णन आहे. म्हणजे तेव्हापासून कोहळ्याच्या सांडग्यात उडदाची डाळ घालून सांडगे करण्याची पद्धत होती, अडीअडचणीला उपयोगी पडावेत म्हणून खाद्यपदार्थाची बेगमी करण्याची पद्धत आपण आपल्या पूर्वजांकडून, असं म्हणायला हरकत नाही. मिठाचे गुणधर्म लक्षात आल्यावर तो पदार्थ खारवू लागला. पुढे तेल, साखर, मीठ, लवंग, मोहरी, काळेमिरे या सर्वाचा वापर तो पदार्थ संरक्षित ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्याची चव वाढवण्यासाठीही करू लागला. तेव्हापासून ते आजतागायत या प्रथेचे आपण पालन करत आहोत. वाळवणाचे पदार्थ म्हणजे निव्वळ बेगमीचे, पावसाळ्यात उपयोगी पडणारे पदार्थ नव्हेत. त्यांना आपल्या संस्कृतीत खास स्थान आहे. घरात लग्नकार्य असले की सुरुवात वाळवणाच्या पदार्थापासून होते. त्यातही सांडग्यापासून. सोहळ्याच्या सांडग्यांना गणपतीचा आकार देऊन पाच सवाष्णांकडून पूजला की, बाकीची तयारी करायला मोकळे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वाळवणाच्या काही कृती मराठवाडा भागातील
बाजरीच्या खारुडय़ा
साहित्य - १ किलो बाजरी, तीळ पावशेर, कोथिंबीर, लसूण, आवडीनुसार लाल तिखट, मीठ, जिरे, तेल.
कृती - बाजरी गिरणीतून जाडसर म्हणजेच रवाळ भरडून आणा. नंतर भरड चाळणीने चाळून रवा आणि बारीक पीठ वेगवेगळं करा. लसूण, लाल तिखट यांची बारीक पेस्ट करा. एका मोठय़ा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी करा. त्यात लसणाची पेस्ट घाला. पीठ शिजल्यानंतर ही घट्टसर राहील या अंदाजाने पाणी घाला. मिश्रण पातळ होता कामा नये. पण घट्टही नको. म्हणून थोडे उकळलेले पाणी बाजूला काढून ठेवा. मग त्यात बाजरीचा जाड रवा टाकून मीठ घालून शिजू द्या. रवा अर्धवट शिजला की त्यात, बारीक चाळलेले पीठ पाण्यात कालवून घाला. एकत्र शिजू द्या. मिश्रण जास्तच घट्ट वाटत असेल तर त्यात अगोदरच काढून ठेवलेले पाणी घालून चांगलं शिजवा. हे मिश्रण एका मोठय़ा ताटात काढून पसरवा. त्यात चिरलेली कोथिंबीर व तीळ घाला. त्याचे वडे तोडा किंवा गोल गोल पापडय़ा थापा. पापडय़ा आंबट आवडत असतील तर त्यात कैरीचा किस घालता येतो. व उन्हात वाळवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ज्वारीची पापड
साहित्य - एक किलो ज्वारी, मीठ, पापडखार (२० ग्रॅम), जिरे, एक छोटा चमचा सोडा, तीळ, साधारण ३ लिटर पाणी.
कृती - ज्वारी दोन दिवस भिजत घाला. तिस:या दिवशी ज्वारी पाण्यातून काढायची. सावलीतच वाळवायची. वाळल्यानंतर ज्वारी गिरणीतून बारीक दळून आणा. ज्वारीचे पीठ चाळून घ्या. सकाळी मोठय़ा पातेल्यात थोडंसं तेल घालून त्यात जि:याची फोडणी करून पाणी घाला. पाण्यात चवीनुसार मीठ, पापडखार, सोडा, तीळ घालून पाणी उकळू द्या. थोडसं पाणी बाजूला काढून ठेवा. त्यात पीठ घालून चांगलं हलवा. गाठी राहता कामा नये. झाकण ठेवून तांदळाची खिशी घेतो त्याप्रमाणो खिशी घ्या. वाफ आल्यावर गॅस बंद करा. पीठ चांगलं नरम झालेलं असेल. मग पापड करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजीचे वडे
साहित्य - कोहळ्याचा कीस, हरबरा डाळ २ वाटी, दीड वाटी मटकीची डाळ, मूगडाळ १ वाटी, कोथिंबीर, हिंग, जिरे, लसूण, तिखट व मीठ चवीनुसार.
कृती - सर्व डाळी चार तास पाण्यात वेगवेगळ्या भिजत घाला. कोहळा किसून त्याचा किस दाबून घ्यावा, पाणी काढून टाका. लसूण, तिखट, जिरे घालून चांगलं एकजीव करा. त्याचे बारीक वडे घाला. वाळवून डब्यात भरून ठेवा. कोहळ्याऐवजी मेथीची भाजीदेखील बारीक चिरून घालू शकता. या वडय़ांची मराठवाडय़ात मसालेदार भाजी करतात. म्हणून तर याला भाजीचे वडे म्हणतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
रव्याच्या चकल्या
साहित्य - रवा १ किलो, मीठ, तीळ चवीनुसार, पापडखार, तुरटी चिमूटभर.
कृती - रवा दोन ते तीन दिवस भिजत घाला. तिस:या दिवशी किंवा चौथ्या दिवशी वरचं पाणी काढून टाका. गॅसवर मोठय़ा पातेल्यात उकळी साठी अंदाजे पाणी ठेवा. त्यात मीठ, पापडखार, तुरटी, तीळ टाकून हलवा. भिजवलेला रवा हळूहळू पाण्यात टाकून चांगलं हाटून घ्या. चकल्या पाडता येतील इतपत घट्ट ठेवा. मंद आचेवर झाकण ठेवून चांगली वाफ काढा. मग चकल्या घाला. व उन्हात वाळवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साबुदाणा पापड
साहित्य- १ भांडे साबुदाणा, काळं मीठ, पाणी.
कृती - साबुदाणा सकाळी भिजत घाला. रात्री सात भांडी पाणी पातेल्यात उकळून घ्या. त्यात मीठ टाकून गॅस बंद करा. खाली उतरवून त्यात भिजवलेला साबुदाणा टाकून चांगलं हलवा. रात्रभर झाकून ठेवा. सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून काढा. ह्या मिश्रणाचे मग गोलगोल पळी पापड घाला. या पापडांसाठी प्लॅस्टिक शक्यतोवर जाडच वापरावं म्हणजे पापडय़ा सहज निघतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पोह्याचे वडे
साहित्य - एक किलो नांदेडी, मुरमुरे, अर्धा कि लो पातळ पोहे, एक किलो गावरान लाल टमाटे, मीठ, जिरे, लाल तिखट, कोथिंबीर, लसूण.
कृती - प्रथम एका मोठय़ा पातेल्यात मुरमुरे, पोहे घ्या. त्यात टोमॅटो बारीक चिरून टाका. नंतर त्यात तिखट, मीठ, लसूण, जिरे पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. टोमॅटोमुळे पाणी सुटतं. मिश्रण ओलसर होतं. त्याचे हातावर छोटे-छोटे गोळे थापून घ्या, व ते वाळवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भरडीच्या ज्वारीच्या धापोडय़ा
साहित्य - ज्वारी एक किलो, मीठ, लाल तिखट, तीळ (१०० ग्रॅम), जिरे थोडेसे, पाणी.
कृती - ज्वारी धुवून चाळणीत नितरा. मिक्सरमध्ये फिरवून कोंडा काढून घ्या. काढलेली भरड तीन दिवस भिजत घालायची नंतर चाळणीत नितरून थोडंसं वाळवा. मग मिक्सरमधून खाळ काढून घ्या. हा काढलेला रवा रात्रभर पाण्यात भिजवा. पळीपापड घालता येईल इतकं पाणी सकाळी पातेल्यात घेऊन त्यात जिरे, मीठ, लाल तिखट, तीळ घाला. हळूहळू उकळत्या पाण्यात पीठ घालून हाटून घ्या. पळीने पापड घाला व ते वाळवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कारवारी मसाला
साहित्य: १०० ग्रॅम लाल मिरची, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी मेथी, एक वाटी मिरी, चार-पाच चमचे हळद पावडर, २०० ग्रॅम धणे, अर्धा वाटी मोहरी, एक वाटी तीळ, अर्धा वाटी चण्याची डाळ.
कृती : एका भांडय़ात हे सर्व पदार्थ टाकून मंद आचेवर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्यावी. हा मसाला ड्राय भाजीत किंवा कुठच्याही डाळीत खूप चांगला लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सुकरुंडे
साहित्य: १ वाटी मूग, १ वाटी ओलं खोबरं, दीड वाटी गूळ, वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी मैदा, तळण्यासाठी तेल.
कृती: मूग थोडे भाजून मऊ शिजवून घ्यावेत. शिजलेले मूग पाणी काढून कोरडे करुन घ्यावेत. मूगामध्ये ओलं खोबरं, गूळ घालून हे पुरणासारखे वाटून घ्यावे व त्यात वेलदोड्याची पूड घालावी. मैदा भज्याच्या पिठाप्रमाणे पाण्यात भिजवून घ्यावे. मूगाच्या मिश्रणाचे लहान गोळे या पिठामध्ये भिजवून घ्यावेत व भज्याप्रमाणे तेलामध्ये तळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाच्या रव्याचे थालिपीठ
साहित्य: १ वाटी तांदळाचा रवा, अर्धी वाटी खवलेले खोबरे, १ कांदा बारीक चिरुन, दोन हिरव्या मिरच्या व थोडं आलं यांची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ व साखर चवीनुसार, तेल
कृती: तांदळाच्या रव्यात वरील सर्व पदार्थ घालून ते पाणी घालून मळून घ्यावे. तव्याला तेल लावून त्यावर या मिश्रणाचे थालिपीठ थापून घ्यावे. मंद आचेवर थालिपीठ खरपूस भाजून घ्यावे व सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दूधीभोपळा खीर
साहित्य: अर्धा किलो दूधी साल काढून बरीक किसलेला, चणाडाळ अर्धा तास पाण्यात भिजवून २ चमचे, १ वाटी खवलेले खोबरे, १ वाटी गूळ, वेलदोड्याची पूड, काजूचे तुकडे
कृती: दूध आणि चणाडाळ मऊसर शिजवून घ्या व घोटून घ्या. यात गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत शिजवा, नंतर त्यामध्ये नारळाचा चव किंवा दूध घाला. वेलदोड्याची पूड व काजूचे तुकडे घालून ही गरमागरम खीर सर्व्ह करा
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वाटाणा उसळीचे मसाला पोहे
साहित्य: १ वाटी पांढरे वाटाणे रात्रभर भिजवलेले, १ कांदा, २ हिरव्या मिरच्या, पातळ वाट्या २ वाट्या, अर्धी वाटी खवलेलं खोबरं, २ चमचे तिखट, १ चमचा गरम मसाला, बारीक शेव, मीठ व साखर चवीनुसार.
कृती: वाटाणे, बारीक चिरलेला कांदा आणि मिरच्या घालून मऊ शिजवून घ्या. पातळ पोहे, तिखट, गरम मसाला, साखर व मीठ घालून हाताने कुस्करुन एकत्र करा. खोलगड डीशमध्ये पहिल्यांदा पोहो त्यावर वाटाण्याची उसळ घाला. त्यावर शेव भुरभुरून हे मसाला पोहे सर्व्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हिरव्या वाटाण्याचा कारवारी रस्सा
साहित्य - हिरवे वाटाणे - १ वाटी, उभा चिरलेला भाजलेला कांदा - १ वाटी, भाजलेला खोबरे खीस - १/२ वाटी,ठेचलेल्या लसून पाकळ्या - ५-६ नग, धने पूड - २ चमचे, कोकम - २ साले, ठेचलेले आले - १/२ चमचा,भाजलेले जिरे - १ चमचा, लाल मिरची पूड – चवीनुसार, मीठ – चवीनुसार, फोडणीचे साहित्य - गरजेनुसार.
कृती - वाटाणे ७-८ तास भिजवून ठेवावेत. कुकर मध्ये वाफवून घ्यावेत. कांदा, खोबरे, लसून, धने पूड, कोकम, आले, जिरे एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. कढई मध्ये २ चमचे तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात मिरची पूड, मीठ कालवावे. शिजलेले वाटाणे घालून १ वाटी पाणी घालून एक उकळी आणावी. गरमागरम भातासोबत झणझणीत रस्सा मजा आणेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं केवळ पाणीच नाही तर इतरही गोष्टी लाभदायक असतात. कोवळ्या अवस्थेत असताना नारळ ताजा आणि हिरवा असतो. सामान्यत: या फळामध्ये ९० टक्के पाणीच असतं. ताज्या, हिरव्या नारळाचं पाणी पोषक असतंच, पण त्याहीपेक्षा पोषक असते ती मलईच! नारळाची मलईही परिपक्व होत जाते. पण पूर्णावस्थेला पोहोचलेल्या नारळातल्या मलईपेक्षा ताज्या, हिरव्या नारळातल्या मलईत जास्त गुणधर्म असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत भरपूर खनिजं असतात, पण फॅटस्, शर्करा आणि कोलेस्टेरॉल अत्यंत कमी असतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या ११ औन्स मलईत केवळ ६५ कॅलरीज असतात. पण त्याहीपेक्षा त्यात पोषक घटकच अधिक असतात. एका ताज्या, हिरव्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. हे खनिज रक्त साकळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं, जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत आणखी एक महत्त्वाचं खनिज असतं, ते म्हणजे मॅग्नेशिअम. हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी तसेच मूत्रिपडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. नारळाच्या घट्ट खोबऱ्यापेक्षा मऊ असणारी मलई खायला अत्यंत सोपी असते. त्यामुळे ती पोषणाचा उत्तम स्रोत ठरते. रोगप्रतिकार यंत्रणा तसेच प्रदाहक घटकांना अवरोध करणाऱ्या घटकांना अधिक सक्षम बनवण्यात ही मलई कामी येते. मलईतून निघणाऱ्या तेलामध्येही भरपूर पोषक घटक असतात, जे केसांच्या पोषणासाठी उपयुक्त असतात. ताज्या, हिरव्या नारळाल्या मलईचे गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्याच्याही पलीकडे जाणारे आहेत. हे तेल अत्यंत शुद्ध आणि हलकं असतं. त्यामुळे या तेलातून आजच्या जगतातल्या केसांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादनं बनवता येतात. हा कोवळा नारळ अत्यंत श्रमहारक आहे. शहाळ्यातील पाणी हे स्वादिष्ट, क्षारयुक्त व पचण्यास हलके असते. त्यामुळे आजारी व्यक्तीला पोटावर ताण न येता, त्वरित तरतरी देण्याचा हा एक सोपा उपाय आहे. शहाळ्याचे पाणी जुलाब, उलटी, उच्चरक्तदाब, ऍसिडिटी, अल्सर, पायात गोळे येणे, लघवीला कमी होणे, मुतखडा अशा सर्व तक्रारींवर उपयोगी ठरते. उन्हात कष्टाची कामे करणारे, नर्तक, क्रीडापटू या सर्वांना इन्स्टंट एनर्जी देणारे हे फळ आहे. १०० मिली.शहाळ्यातील पाण्यात निव्वळ २४ उष्मांक असतात व ०.१ ग्रॅम फॅट्स असतात. शहाळ्यातील मलईमध्येही १०० ग्रॅम मागे फक्त ४१ उष्मांक आणि १.४ ग्रॅम फॅट्स असतात. चहा, कॉफी, सिगारेट, दारू यांच्या व्यसनांनी बिघडलेला रक्ताचा पी.एच. नारळाच्या पाण्याने पूर्ववत आणता येतो. केसांच्या देखभालीसाठीची उत्पादनं विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य तेलांपासून बनवली जातात. त्यांच्यातल्या फॅटी अॅचसिड घटकांमुळे ती एकमेकांपेक्षा वेगळी असतात. काही तेलं सॅच्युरेटड फॅटी अॅकसिड्सनी समृद्ध असतात, पण त्यांच्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅॅसिडस् कमी असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या तेलामध्ये अत्यंत अभिनव आणि संतुलित ट्रायग्लिसराइड रचना असते, जी केसांना पूर्ण पोषण पुरवते. हे तेल हलकं असल्याने ते सहजपणे पसरतं आणि केसांमध्ये लवकर शोषलं जातं. त्यामुळे केसांना आवश्यक ते पोषण मिळतं. त्याचा सौम्य आणि ताजा सुगंध तेल लावण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतो. एकंदरीतच, ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईचं तेल असं एक आधुनिक तेल आहे जे निसर्गत:च हलकं आहे आणि पोषकही आहे.
काही पदार्थ शहाळ्याचे.
लाल भोपळा-शहाळ्याचे तोंडाल
साहित्य. १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, १ वाटी शहाळ्याचे तुकडे, ओले काजू २ वाटी, भिजवलेली चानाडाळ /४ वाटी मटार उभा चिरलेला कांदा बारिक चिरलेला कांदा-२ दालचिनी, २-३ लवंग-२ काळी मिरी टेबलस्पून अख्खे धने टेबलस्पून ओले खोबरे, ३ टेबलस्पून नारळाचे दूध टेबलस्पून हळद टेबलस्पून लाल तिखट टेबलस्पून मोहरी, हिंग, चिमुटभर,मीठ चवीनुसार.
कृती. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, उभे चिरलेले कांदे, धने टाका. कांदा लाल होईपर्यंत भाजा. त्यात ओले खोबरे टाका. एका प्लेटमध्ये हे काढून घ्या. त्यात हळद घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घ्या. भाजी बनविण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, काळी मिरी, कोथिंबीर, कांदा टाका. यात आता हळद, लाल मिरची पावडर, चनाडाळ, पाणी घाला. यात लाल भोपळ्याचे तुकडे आणि वाफवलेले मटार घाला. थोडे पाणी घालून ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर त्यात शहाळ्याचे तुकडे, ओलो काजू, कांदा-खोबऱ्याचे वाटण घाला. थोड्या वेळानंतर यात नारळाचे दूध आणि मीठ घाला. उकळी आली की गॅस बंद करा. गरमागरम शहाळे-भोपळ्याचे तोंडक तयार.
शहाळ्याचे सरबत
साहित्य.एका शहाळ्याचे पाणी, २ बाटल्या सिट्रा, साखर, मीठ, लिंबाचा रस, बर्फाचा चुरा
कृती. शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.
शहाळे आणि काजुची भाजी
साहित्य. ३ कप शहाळयातील कोवळे खोबरे, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, ४ टेबलस्पून तेल, ३ कप पातीचा कांदा बारीक चिरलेला, १ मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, १ टीस्पून
आले-लसूण पेस्ट, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून गरम मसाला पावडर, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, २ टेबलस्पून कोथिंबीर चवीनुसार मीठ.
कृती. शहाळयातील खोब-याच्या दोन इंच लांबीच्या पट्टया (तुकडे) कापून बाजूला ठेवाव्या. काजू पाण्यात भिजत घालावे. एक कढईत तेल गरम करून पातीचा कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवावा.खोब-याच्या पट्टया (तुकडे) व काजू घालून दोन मिनिटे परतावे. आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट व गरम मसाला आणि अर्धा कप पाणी घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. नंतर मीठ व टोमॅटो केचप घालून नीट ढवळावे. कोथिंबीर घालून भाजी सजवावी व गरम गरम खायला द्यावी.
शहाळ्याचे आइस्क्रीम
साहित्य.अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.
कृती. प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी. मिक्स रमधून फिरवावे. नंतर फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.
* फणसाच्या आठळ्या, काजू, शहाळ्याची भाजी*
साहित्य. २ वाट्या फणसाच्या आठळ्या, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, अर्धा कप कोवळे खोबरे पातळ काप करून, १ बारीक चिरलेला कांदा, २ छोटे स्पून गोड घट्ट दही, १ चमचा साय, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, ७-८ कढीपत्ता, २ चमचे तूप, जिरे, हळद
वाटण. २ ते ३ टेबलस्पून मलईचं खोबरं, १ छोटा कांदा उकडून, २-३ लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, १ चमचा लाल तिखट, पाव कप टोमॅटो हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या.
कृती. आठळ्या मीठ घालून उकडून घ्या. त्याची सालं काढून टाकून पातळ काप करा. कोवळ्या नारळाचंही काप करून ठेवा. २ तास काजू पाण्यात भिजवून ठेवा. कढईत २ चमचे साजूक तूप घाला. त्यात जिरं, कढीपत्ता घाला. कांदा परतून घ्या. हळद घाला. आता वाटलेलं वाटण घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात शहाळे काप, आठळ्याचे काप व काजू घाला. थोडं परता. त्यात दही व साय घाला. थोडे परतून त्यात १ वाटी गरम पाणी घाला. मीठ, साखर घाला. २-३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर, खोबरं, काजू घालून सजवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल स्पून पिठी साखर.
तेल न घालता शेवया कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्याव्यात. त्या बाजूला काढून ठेवून त्याच कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्यावी. त्यातच मिरची घालावी.
छोले
साहित्य : १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला.
फोडणीसाठी : १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून आले पेस्ट, ३ लसूण पाकळ्यांची पेस्ट, १ टिस्पून आमचूर पावडर, १ टिस्पून धणेपूड, २-३ टिस्पून तेल, कोथिंबीर, लिंबू, मीठ.
कृती : चणे ९-१० तास भिजत घालावे. नंतर कूकरमध्ये ४ शिट्या करून चणे शिजवून घ्यावे, शिजवताना पाण्यात थोडे मिठ घालावे. चणे मऊसर शिजवावे. अगदी जास्त शिट्ट्या केल्या तर चणे फुटतात. त्यामुळे प्रत्येकाने घरातील कूकरचा अंदाज घेउन चणे शिजवावेत. कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरावेत. चणे शिजले कि कढईत २-३ टिस्पून तेल गरम करावे. जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी, आले-लसूण पेस्ट घालून परतावे, कांदा परतावा. कांदा परतला कि त्यात टोमॅटो घालावा. थोडी धणेपूड घालावी. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. टोमॅटो अगदी नरम झाला कि शिजलेले चणे घालावेत, चवीपुरते मीठ घालावे म्हणजे चणे शिजताना मीठ आत मुरते. आवश्यक तेवढे पाणी घालावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. २-३ मिनीटांनी छोले मसाला आणि आमचूर पावडर घालून ढवळावे. जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घालावे. थोडावेळ मंद आचेवर उकळू द्यावे.
भटुरे
साहित्य: १ वाटी दही, २ वाटी मैदा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ भिजवावे. दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे १-२ चमचे मैदा अधिक लागू शकतो. थोडे तेल घालावे. पिठ मळून घ्यावे. पिठ ४-५ तास झाकून ठेवून द्यावे. ४-५ तासांनंतर परत एकदा पिठ मळून घ्यावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करावे (२ ते अडीच इंच आकाराचे). तेल तापत ठेवावे. पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पुर्या लाटाव्यात. खुप पातळ लाटू नये.
हे भटूरे तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. छोल्यांबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
Copyright © 2025 | Marathisrushti