(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

    चालली स्पर्धा साऱ्यांची, प्रभूची सेवा करण्याची....।।धृ।।

    निशाराणी संचारी

    निद्रीत जाई पहारेकरी

    खट्याळ वारे धावूनी

    दारे दिली उघडूनी

    विज चमकूनी आकाशी मदत होई वसुदेवाची....१

    चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची

    पावसाच्या पडती सरी

    पक्षी नाचती तालावरी

    कोकीळेचे सुरेल गान

    आनंदाने वातावरण

    नागराजा फना काढूनी काळजी घेई नव बाळाची....२

    चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची

    स्पर्श होता पायाचे

    पाणी दुभंगले यमुनेचे

    वाट त्याची करूनी

    काढूनी साऱ्या अडचणी

    नंदाघरची कन्या माया दाखवी रूपे चमत्काराची...३

    चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 24, 2019


  • अशी कशी तुझ्या प्रेमात मी पडले

    अशी कशी तुझ्या प्रेमात मी पडले
    व्याकुळ आठवणीत काहूर उठले
    येते तुझी आठवण रोज क्षणोक्षणी
    डोळे ओले होतात तुझ्या साठवणीत
    अशी कशी तुझ्यात मी हलकेच गुंतले
    तुझ्या मिठीचे चांदणे अलगद मज लुटले
    असे कसे मन तुझ्यासाठी आतुर होते
    तुला नाही कळले ते भाव ओले हळवे
    असा कसा तू मोह सांडून दूर गेला
    अलवार तुझ्या मिठीचा स्पर्श मागे उरला
    असे कसे बंध तुझ्यात रडवून मज गेले
    सोड रे अबोला सारा तुझ्यात भाव गुंतले
    असा कसा रे तू मज तोडून गेला
    घट्ट मिठीत तुझ्या आठवणी गुंतल्या
    अशी कशी राधा बासरीत धुंद झाली
    आठवण तुझी छळते रोज सांज कातरवेळी
    सोड रे हा दुरावा आठवण तुझी येते
    तुझ्यात रोज मी आल्हाद अबोल तुटते
    अशी कशी चांदणी अलवार लोपली
    तुझ्या ओढीत वाट मी कितीक पाहिली
    आकाश चांदण्यांत चंद्रकोर सजली
    वाट तुझी पाहते एक अबोल चांदणी
    -- स्वाती ठोंबरे.

      April 28, 2022


  • एक होता शशी

    एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!

      March 2, 2012


  • समाधानी वृत्ती

    कशांत दडले समाधान ते,

    शोधत असतो सदैव आम्ही,

    धडपड सारी व्यर्थ होऊनी,

    प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।

    बाह्य जगातील वस्तू पासूनी,

    देह मिळवितो सदैव सुख,

    क्षणीकतेच्या गुणधर्माने,

    निराशपणाचे राहते दुःख ।।२।।

    'समाधान' ही वृत्ती असूनी,

    सुख दुःखातही दिसून येती,

    चित्त तुमचे जागृत असतां,

    समाधान ते सदैव मिळते ।।३।।

    सावधतेने प्रसंग टिपता,

    समाधान ते येईल हाती,

    सुख दुःखाला दूर सारता,

    अंतरभागी समाधान दिसती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 2, 2017


  • व्यथेच्या कथा

    घराघरातील व्यथा सांगते तुमची नि माझी कथा.,
    व्यथा लहान असो वा कितीही मोठी.
    एकमेकांना देऊ या सांत्वनाची आधार काठी
    सगळ्यांचीच अर्जुनासारखी झाली आहे मनस्थिती
    कुणाचीही चालेनाशी झाली आहे कोणतीही मती.
    देऊ या मायेचे आपुलकीचे पंखातील बळ.
    तेव्हा नक्कीच. निराशेचे विचार काढतील पळ
    एक विनंती करते सर्वांना हात जोडून.
    चेहर्यावरचा खोटा मुखवटा द्या दूर फेकून
    खरं बोलून मोकळेपणाने घ्या मोकळा श्वास.
    फिटे व्यथेच्या अंधाराचे जाळे मोकळे होईल आकाश
    -- सौ कुमुद ढवळेकर.

      December 17, 2021


  • तुला पाहताना

    https://youtu.be/UpXfirUuSHE

    मित्रांनो, "तुला पाहताना " ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
    मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
    "माझी डायरी " या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा.
    "माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

      July 9, 2018


  • रंग पहा नभांगणात

    रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात,
    एकत्र येऊन फिरतात,
    पंचमी साजरी करतात,--!!

    निळेशार राखाडी पांढरे,
    मेघांची लगीनघाई,
    इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,--!!!

    प्रभात काळी एकेक रंग,
    उषा क्षितिजावर उधळते,
    पिवळे निळे काळे तांबडे,
    त्यात सोनसळी भर असे,--!!!

    कुठून येई,लख्ख प्रकाश ,
    खजिनाच वर वर येई,
    ढगांआडून प्रकाशदाता,
    सगळ्यांना आपुले दर्शन देई,--!!!

    सकाळ होता राज्य त्याचे,
    सम्राटाची सारी जादू ,
    रंग पिवळसर सोनेरी,
    लागतो पसारा मांडू,--!!!

    श्यामल संध्या गगनी येतां,
    पुन्हा रंगांचीच लीला,
    तांबडे निळे राखाडी सोनेरी,
    क्षितिजावर पखरण होतां,--!!!

    वसुंधरेवर तम टाकते,
    आपले पहिले पाऊल,
    जसा सूर्या घरी निघतो,
    होता तांबूस संधिकाल,--!!!

    काळा रंग आता पसरे,
    महत्त्व त्याचे येता रजनी,
    नभी दुधी चांदणे,उगवता,
    काळ्या ढगांस कडा रुपेरी,--!!!

    हिमगौरी कर्वे ©

      May 11, 2019


  • चरण रज

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

      May 14, 2012


  • खूर्चीसाठी काय पण…

     

      February 25, 2014


  • बीजाचे समर्पण पहावे

    बीजाचे समर्पण पहावे,स्वतःला देऊन टाकते,
    एक तरु जन्माला यावे,
    म्हणूनच स्वतःला गाडते,---!!

    पुन्हा मातीत रूजून,
    एकदम कात टाकते,
    अंकुराचा स्वरूपाने ,
    मातीच्या कुशीत येते,--!!!

    काळी आई कुरवाळते ,
    सर्व संगोपन करते,
    बघता बघता नजरेत भरते,
    अंकुराचे फोफावणे, --!!!

    अंकुराचा त्याग करून,
    बीज वाढीस लागते,
    रोपट्याच्या स्वरूपात,
    सानुले झाड उगवते ,--!!!

    रोपट्याला फुटती पाने,
    त्यांचेही वर जाणे,
    करता करतां झाड वाढते,
    हिरवेगार, डौलदार दिसते,--!!!

    हळूहळू संपन्न होते,
    घोंस लागती फुलाफळांचे,
    झाड होते मोठे,
    कधी रूप घेते वृक्षाचे,--!!!

    फळे-फुले भरलेले,
    वृक्ष घनदाट डंवरलेले,
    कोसळती किती फळेफुले,
    शेवट पुन्हा बीजरुपे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      April 24, 2019