महिमा कसा प्रभू तुझा आगळा,
पावन करसी तूं भक्ताला,
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।।
पुंडलीकाची महान भक्ती,
माता पित्याचे चरणी होती,
त्याची सेवा तुजसी खेचती,
कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।।
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला
पातिव्रत्य हे दैवत समजूनी,
पतिसेवेला घेई वाहुनी,
सावित्रीने दिले दाखवूनी,
प्रभू वाकती सती शब्दाला, ।।२।।
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला
कांहीं करीती सेवा गुरुची,
मानव सेवा हीच कुणाची,
शक्ती वाढवूनी सत्कर्माची,
पात्र ठरती प्रभू दर्शनाला, ।।३।।
नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 26, 2020
भगवान श्रीकृष्ण
September 21, 2010
चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा ।
झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।।
लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त ।
ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।।
वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले ।
आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।।
कोठून येते त्याला शक्ती, सटकून जाण्याची ही युक्ती ।
अन्न पाणी हे कसे घेई ते, पचनी सारे कसे पडते ।।
हटवादी हे असे केवढे, नको तिथेची जाय बापडे ।
देहाला त्या भोग देऊनी, भोग भोगण्या लावी तेवढे ।।
स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते ।
अवचित मिळता संत महात्मा, बंधनात ते अडकून पडते ।।
राज्य उलटते सारे आता, मनावरती ताबा बसता ।
माया जाते हारून जेथे, ब्रह्मरूप ते सारे होता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 28, 2020
अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई
जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई
गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई
रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई
करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई
तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई
शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई
खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई
कोंडू कोंडू मारीते …
March 6, 2017
अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम्
अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा
ध्यास एकची लागे सर्वां - तो विठ्ठल बरवा
भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले
अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले
देइ चैतन्य मनां पंढरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
समान असती विठुमार्गावर सारे वारकरी
कुणांशी न कोणांस करावी लागे बरोबरी
सर्वच हर्षद-शेज़ारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
वारकर्यांच्या वसतो हृदयीं पांडुरंग सांवळा
उभा विटेवर, हात कटीवर, तुलसीमाळ गळा
विठूमय झाले नरनारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ज़ातिपातिचें ना बंधन, ना लहानथोर इथें
शतकांपासुन अशीच वारी पंढरिला निघते
पाहुनी म्हणतो स्वत: हरी – ‘हॅटस् ऑऽऽफ् टु देम्’ ।।
- - -
हॅटस् ऑऽऽफ् टु देम् : Hats Off To Them
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 6, 2016
गायत्री मंत्रांबद्धल अनेक लोकांना कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेक लोकांना ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं’ ही सविता गायत्री म्हणजे सूर्य गायत्री माहिती असते. मूळ सूर्य गायत्री मंत्राशिवाय पण अशा खूप गायत्र्या आहेत. त्या या लेखात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. गायत्र्या वेगवेगळ्या देवतांच्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही.
June 9, 2022
मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर
November 5, 2021
नादावले सखीने
मन जडल्या नात्याचे
चंद्र पाकळ्यांची बरसात
फुलणार मग निशेने
भिजशिल गं प्रेमाने
सखी कोणता ऋतुमास
ओठावरी तुझा ध्यास
मन करुन वारुचे
ये प्रणयसखे वेगाने
भिजशिल गं प्रेमाने
भेटशील ना त्या ठिकाणी
दुसरे नसेल कोणी
क्षण तुझ्या भेटीचे
ये करुनि बहाणे
भिजशील गं प्रेमाने
-सौरभ दिघे
May 14, 2024
December 3, 2021
भरोसा नसला जरी श्वासांचा
जीवनखेळी सहजी खेळावी...
मनात असावा स्पर्श प्रीतीचा
भावशब्दातुनी नाती जपावी...
वाळवंटातही अंकुर फुटतो
भावनांना फुटावी शब्दपालवी...
गीतातुनी उमलावे हृद्य मनीचे
फुलांफुलांतुनी प्रीती फुलावी...
आलो मोकळे, जाणार मोकळे
जीवास वृथा आसक्ती नसावी...
सुखनैव जगावे अन जगवावे
अंतसमयी मनास खंत नसावी...
--वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र. २६५
१९/१०/२२
October 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti