(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सार्थकी जीवन

    सारे जीवन जाते,
    आपले अन्न शोधण्याकडे,
    काय उरते आमच्या हाती,
    विचार करा थोडे ।।१।।

    जीवनाची मर्यादा ठरली,
    आयुष्य रेखेमुळे,
    आज वा उद्या संपवू यात्रा,
    हेच आम्हांस कळे ।।२।।

    धडपड करी आम्ही,
    सारी देह सुखासाठी,
    विचार ही मनांत नसतो,
    इतरांच्या करिता ।।३।।

    वेळ काढावा जीवनातुनी,
    इतरांसाठी थोडा,
    सार्थकी लावा आयुष्य तुम्ही,
    जीवन शिकवी धडा ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 20, 2017


  • यत्र तत्र सर्वत्र

    तू पहाटेचा सोहळा
    तिमिरातील किरण..
    घंटेचा निनाद
    आभाळाच तोरणं..

    तू सागराची गाज
    शांततेची लाट..
    क्षितीजाच टोक
    नदीवरचा घाट..

    तू वाऱ्याचा वेग
    समतोल पृथा..
    निसर्गाचे दान
    नियमांची प्रथा

    तू अग्नीच्या ज्वाळा
    ऊर्जेचे वरदान..
    जल पृथ्वी वायू
    अग्नी आकाशाची खाण..

    तू यत्र तंत्र सर्वत्र
    भविष्य भूत वर्तमान
    सखोल अंतर्मनातले
    समाधानाचे मूळ ज्ञान..

    तू गतीची परिक्रमा
    परमोच्च बिंदू अमृत
    आत्मकेंद्रित क्षूद्रांचे
    परिघ वलय छेदीत

    -- काव्य प्रतिभा
    सौ. प्रतिभा महादेव चौगले
    कोल्हापूर

      December 27, 2025


  • हळव्या होतात भावना

    हळव्या होतात भावना
    तेव्हाच मनाला मोह होतो रे,
    साद नसेल तुझी काही
    तरी भावनेचा बहर खुलतो रे..
    मोकळी वाट अनामिक
    तुझा अंतरी भास होतो रे,
    न भेट मुग्ध तुझी होणार कधी
    मन स्पर्शी तुझा भास मोहरतो रे..
    दरवळे मोगरा गंधित
    फुलं इवले ते नाजूक रे,
    तुझ्या शब्दांचे चांदणे
    सख्या तुझ्यात मी गंधाळून रे..
    आल्हाद रवी अस्तास जातो
    कातरवेळ ती काहूर मनी रे,
    गुंतले भाव नाजूक तुझ्यात
    हृदयात तू हलकेच बंदिस्त रे..
    कातरेवळ सरते जरा
    चांद रात्री आकाश सजले रे,
    घे मिठीत अलवार मजला
    लाजते मी तेव्हा तुझ्या बाहुत रे..
    किती मनोहर धुंद चित्र हे
    स्वप्न हे एक आभास रे,
    न तू भेटशी कधी मला
    वेडे वाटे तुला हे मोह जाल रे..
    भाव गुलाबी क्षण सोनेरी,
    मी दूर दूर लांब जाई रे,
    एक वेडी अबोध बावरी मी
    हृदय अंतरी अबोल मी रे..

    -- स्वाती ठोंबरे.

      December 7, 2021


  • कृतज्ञता

    आज मागे वळून पाहताना मला उमगतेय की
    मला माझं अस्तित्व नाही... किंबहुना नव्हतेच कधीही
    कारण मी अंश आहे- तुमचाच वंश आहे
    तुमचाच मी भाग आहे- थोडा आईचा थोडा माझ्या पप्पांचा

    मग इतक्या उशिरा का या जाणीवांची जाण यावी
    अर्ध आयुष्य उलटल्यावर- स्पंदने का तीव्र व्हावी

    शक्तींच्या माझ्या उगम तुम्ही नि स्त्रोतही माझ्या न्यूनत्वाला
    निर्मीती तुमचीच मी; भास माझ्या आकृतीला नि रंग आहे प्रकृतीला .
    अश्रू माझ्या अपयशाचे नि दुदुंभीही यशाची तुमचीच आहे
    वेदना-संवेदनांना आपल्या तारही तर एकच आहे

    आयुष्याच्या खडतर चढणीवर होता मला तुमच्या बोटांचा आधार
    माझ्या वाढल्या हातांनी मग का न जपावा आता तुमचा उतार
    मला माझा ध्यास आहे, ध्येय आहे, आशा नि महत्वाकांक्षाही
    पण अभिलाषा त्या यशोशिखरांची मला यत्किंचितही नाही
    जेथे हाक तुमची मला ऐकू येणार नाही
    जमलंच तर आभाळात झेपावण्याचं वेड मला जरुर असावं
    पण इतकंही नाही की सावलीला तुम्हा झाकायचं धाडस व्हावं

    छातीचा कोट उभारला तुम्ही डेरेदार वृक्षाच्या निष्ठांनी
    जपली उभारी उमलत्या मनांची रणरणत्या मध्यान्ही
    मग त्या थकल्या भागल्या पारंब्यांना तजेला शिंपडावया
    आमच्या मायेचा ओलावा आतूर का नसावा!
    हुडहुडल्या शाखा जर, हळूवार शाल का आम्ही न पांघरावी
    विसावण्यास त्यांना निवांत आमच्या खांद्यांचा निवारा
    वावरण्यास अन्‌ ऐसपैस का नसावा मनाचा गाभारा

    रचल्या होत्या उन्हांत तुम्ही विटा घराच्या या वेड्यासाठी
    त्या श्रमांची झाली लेणी बनून काळजातल्या मर्मबंधांच्या नर्म गाठी
    वाटते तुम्ही विसावे अन्‌ धराव्या आम्ही कमानी सावलीला
    आपुलकीची लावू बिछायत पखरुन स्नेहाचा सौम्य परिमळ
    चित्तवृत्तींच्या करुन वाती, उजळावी प्रसन्न संध्याकाळ
    आठवणींचे उठवावे मोहोळ, नेमक्या टिचक्या मारुन
    फुलवावा चहुअंगी मोहोर, स्पंदनांना साक्षी ठेवून
    ओंजळीत साठवावे, निसटते क्षण, आयुष्यभर हुंगण्यासाठी
    उचंबळत्या भावनांत भिजावे, करावे बंदिस्त आवेगाची घालून मिठी

    संध्याछायांनाही करावे मोहक, लोभसवाणं
    वीणेच्या हृदय छेडणाऱ्या झंकाराप्रमाण॑
    झुंजुमुंजुचा घेत कानोसा, करीत जयकार रामाचा
    निश्‍चिंत व्हावे शांत सोबतीने दूरच्या चंद्राच्या

    ज्यांनी शिंपली माती आपली उभं आयुष्य खर्ची घालून
    त्यांना जीवनवृक्षाची करावी बहाल किमान काही फुले मनापासून
    कधी वाटतं उधळाव्या आपल्या आयुष्याच्या करुन कगाठी
    लख्ख उजळावे त्यांनी क्षण दोन क्षण केवळ तुमच्यासाठी

    अज्ञानापासून ते अज्ञाताच्या प्रवासापर्यंत, अविरत
    एका मानवाची आपल्या मनुला कृतकृत्य कृतज्ञता ॥

    -अंत:करणपूर्वक

    --यतीन सामंत

      November 6, 2022


  • यशोगाथा

    Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात,
    रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!!

    तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त,
    जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!!

    संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी,
    कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!!

    अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले,
    आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी चिंब न्हाले!!

    पुरे झाले कष्ट पप्पा, निवृत्तीची वेळ आली,
    निवृत्ती नव्हे हो ही, जगण्याची नवी आवृत्ती आली!!

    इंद्रधनुचे सप्तरंग, तुमच्यासमोर ते नग्ण्य,
    तुमच्या या यशकिर्तीने जन्मदात्रीची कुसही झाली धन्य!!

    – श्र्वेता काशिनाथ संकपाळ.

      August 22, 2018


  • मेघ- गर्वहरण

    अंहकाराचा पेटून वणवा,
    थैमान घातिले त्या मेघांनी ।
    तांडव नृत्यापरि भासली,
    पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।।

    अक्राळ विक्राळ घन दाट,
    नी रंग काळाभोर दिसला ।
    सूर्यालाही लपवित असता,
    गर्वाचा भाव चमकला ।।२।।

    पृथ्वीवरती छाया पसरवूनी,
    चाहूल देई आगमनाची ।
    तोफेसम गडगडाट करूनी,
    चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।।

    मानवप्राणी तसेच जीवाणे,
    टक लावती नभाकडे ।
    रूप भयानक बघून सारे,
    कंपीत त्यांची मने धडधडे ।।४।।

    त्याच वेळी वादळ सुटूनी,
    देह घनाचा टाकी विखरूनी ।
    गर्व हरण होऊन जाता,
    अश्रू पडती नयनामधूनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 8, 2015


  • सुप्त चेतना

    दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना

    जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना,

    जळत असते तेल, देवूनी प्रकाश सारा

    आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा

    बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते

    आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते

    कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी

    गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 13, 2019


  • डिस्पोझेबल मॉम आणि डॅड

      May 20, 2011


  • चित्र

    मी एक चित्र काढले होते माझ्या भविष्याचे...
    त्यात रंग ही भरणार होतो मनासारखे...
    पण ते चित्र नियतीने फाडले...
    मग मी चित्रच काढणे सोडले...
    रंग सारे माझ्यासाठी बेरंग झाले...
    आता फाटलेले चित्र जोडायचे आहे...
    पण कोणाला ? ज्यांनी ते फाडले आहे...
    आता ते चित्र जोडून काय कामाचे...
    ते चित्रही आता भूतकाळ झाले आहे...
    माझ्या भविष्याचे चित्र आता फक्त तिच्या हातात आहे ...

    कवी - निलेश बामणे

      June 3, 2017


  • काजळ गाली

    सख्या, तुझ्या आठवात
    मी, चालते संथ पाऊली
    सांजवर्खी या सांजवेळी
    ओघळले, काजळ गाली....

    संगती तीच वाट निरंतरी
    तुझ्याच स्पर्शात नाहलेली
    नेत्री दाटता अस्तिव तुझे
    ओघळले, काजळ गाली....

    ही नित्याची साक्ष अंतरी
    पाहता, उमललेली कळी
    अनवट मोहक वाटेवरचा
    तूच नटखट माझ्या भाळी....

    तुज मी स्मरता वेळोवेळी
    ओघळले, काजळ गाली
    तुझा असा असह्य दुरावा
    ओघळते, काजळ गाली....

    –वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १८९

    ५/८/२०२२

      September 7, 2022