मतदानच कमी होत असल्याने पैसे देऊन आवश्यक तेवढी मते खरेदी करण्याचे प्रस्थ अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा पैसा नंतर अर्थातच भ्रष्ट मार्गाने वसूल केला जातो. ही दुष्ट साखळी तोडायची असेल आणि खर्या अर्थाने योग्य उमेदवार निवडला जायचा असेल, तर मतदान शंभर टक्के अनिवार्य करायलाच हवे. न.पा, मनपा, जिल्हा परिषदापासून तरी ही सुरुवात व्हायला हवी. जे मतदान करणार नाहीत किमान त्याच्या घरचे नळाचे कनेक्शन आणि इतर नागरी हक्क तरी नाकारल्या गेलेच पाहिजेत. लोकसभा आणि विधानसभेत तरी कोणताही उमेदवार केवळ पैशाच्या जोरावर निवडून येण्याची हिंमत त्यामुळे करू शकणार नाही.
February 4, 2012

जन्म झाल्यापासून आपल्याला कसे जगावे हे शिकवले जाते. वय वाढेल तसं जगण्याचं शिक्षण वाढत जातं. सगळी धडपड जगण्यासाठी चालू रहाते. जीवन इतके चिवट बनते की मृत्यूचा विचारही शिवत नाही. हा विचारही आपल्या मनात का यावा हे सांगत आहेत निरेन आपटे.
कधीतरी, कोणीतरी मृत्यू पावतो. आज एक जातो, उद्या दुसरा जातो. पण आपण गेलेले नसतो. त्यामुळे मीही एक दिवशी जाईन हा विचार मनाला शिवत नाही. तरुण वयात तर मुळीच नाही. पण आपण कुठपर्यंत जगणार आहोत हे कोणालाही माहित नसतं. म्हणून जगता जगता मृत्यूही शिकायला हवा. मृत्यू शाश्वत आहे, आज ना उद्या येणारच! मग तो शिकून घेतलेला बरा. हा विचार सहसा आपण करत नाही, पण ह्याचा विचार खूप प्राचीन काळापासून झालेला आहे.
March 29, 2026


भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.
दैनिक देशोन्नती मध्ये पूर्वप्रकाशित हा लेख ४ ऑगस्ट २००२ रोजी मराठीसृष्टीवर अपलोड करण्यात आला.
August 4, 2002
शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल.
November 1, 2009
सरासरी दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. हे सगळे नियोजन चुकते कशामुळे? उत्तर स्पष्ट आहे.
December 6, 2009
वैज्ञानिक अभ्यासाला सक्रिय मदत करण्याचें हल्लीच्या काळातलें उदाहरण म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष रेगन यांचें . रेगन यांना ‘अल्झायमर’ हा दुर्धर रोग झाला होता. या रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल फारच थोडी माहिती जगास उपलब्ध आहे व रोगमुक्तीसाठी एकही रामबाण औषध नाही. अल्झायमर हा मेंदूचा रोग असल्यामुळे रोग्याची आकलनशक्ति कमी कमी होत जाते, मेंदूचे शरीरावरील नियंत्रणही कमी होत जाते. या रोगातून सुटण्याचा एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे मृत्यू .
पण रेगन यांनी आपल्याला हा रोग झाल्याचे लपवलें नाही. उलट त्यांनी तें जगासमोर उघड केले व स्वतःला या रोगाच्या अभ्यासासाठी डॉक्टरांपुढे उपलब्ध करून दिले. विज्ञानाची किती मोठी सेवा रेगन यांनी केली ! आजचे ‘बुवा’ किंवा ‘सिद्ध’ अशा अभ्यासाची संधी वैज्ञानिकांना कधी देणार ?
मात्र, बुद्धिवादी लोकांनीही एक अभ्यास म्हणून हा विषय हाताळला पाहिजे. कांहीं ‘गुरु’, ‘बुवा’ व ‘स्वामी’ चमत्कारांच्या व सिद्धींच्या झगमगाटाने भोळ्या भक्तांची दिशाभूल करतही असतील. त्यांचें थोडा वेळ बाजूला ठेवूं. पण यूरी गेलर या इस्त्रायली व्यक्तीच्या ‘टेलिकायनेसिस’ शक्तीचे काय ? एडगर कायसी (Cayce) या अमेरिकन माणसाने संमोहनावस्थेत दिलेल्या ‘डेड सी स्क्रोलस्’ बद्दलच्या पूर्वसूचनांचे काय , ज्यानुसार नंतर खरोखरच कांहीं उपयुक्त माहिती उजेडात आली. टेलीपथी किंवा उत्स्फूर्तपणे भविष्यकथन करणार्या व्यक्तींची उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो. त्यातली कित्येक तर साधीसाधी माणसे असतात. त्यांना व्यक्तिशः कुठलाही धनलाभ होत नाही. ते कुठलेही मठ वा पंथ स्थापत नाहीत. मग तिथें बुवाबाजीचा प्रश्न कुठें येतो ?
माझ्या स्वत:च्या ओळखीच्या एक वृद्ध आजीबाई पुण्याला रहात असत. त्यांना काहीतरी आगळी अशी ‘शक्ती’ प्राप्त आहे असे अनेक परिचित सांगत. बाई संसारी होत्या. या शक्तीपासून कसलाही व्यक्तिगत लाभ त्यांनी होऊ दिला नाही. आर्थिक लाभ तर दूरच, पण त्यांनी आपल्या शक्तीचें कसलेही भांडवल केलें नाही, स्तोम माजवलें नाही. स्वतःच्या सिद्धीचा त्यांनी कधी उल्लेखही केला नाही. ‘ते म्हणतात’ अशा शब्दांनी सुरुवात करून त्या काय तें सांगत. ‘ते’ म्हणजे त्या वृद्ध बाईंचे दिवंगत गुरु. अशी कुठलीही वेळ ठरवलेली नव्हती ( उदा. , गुरुवार संध्याकाळीं ) , की ज्या वेळी बाईंना भेटायला येऊन लोक त्यांना कांहीं प्रश्न विचारताहेत, पायाशी फूल-नारळ वगैरे ठेवताहेत . छे: ! त्या आजी तर कुणालाही असें भेटतच नसत. अगदी जवळच्या परिचितांनाच त्या काय तें सांगत असत, अन् तेंही आधी ठरवून असें नव्हेंच . आपण प्रश्न विचारायचेच नाहींत. पण अगदी अचानक, उत्स्फूर्तपणें त्यांना जें कांहीं सुचे, व त्या तें सांगत .
त्या आजींच्या सिद्धीचा मला स्वतःला एकदा नव्हे तर दोन वेळा अनुभव आलेला आहे. पण त्यामागील वैज्ञानिक स्पष्टीकरण मात्र मला माहीत नाही. जर इतर कुणी मला अशा प्रकारचा अनुभव सांगितला असता, तर त्यावर विश्वास ठेवणें मला स्वत:लाही जड गेलें असतें. असा अनुभव फक्त ‘प्रत्यक्षप्रमाण’ च्या सूत्राप्रमाणेंच पटूं शकतो.
मी अंधश्रद्ध नाहीं, रूढिवादी नाहीं. कसलीही अंधश्रद्धा न बाळगतां, मला असें वाटतें की अशा प्रकारच्या कांहीं शक्ती माणसाच्या मेंदूत सुप्त स्थितीत असतात आणि फक्त काही व्यक्तींच्या ठिकाणीच त्या जागृत होत असतात. त्यांचा पद्धतशीर अभ्यास झाला , व त्यांचें रहस्य थोडें जरी उलगडलें तर , न जाणो, त्यातून मानवाच्या प्रगतीसाठी कांहीं नवीन सूत्र सापडूंही शकेल.
अखेरीस एक विचार मांडावासा वाटतो, आणि तो म्हणजे, ‘खरा महात्मा’ व एखादा ‘ढोंगी बुवा’ यांच्यातील फरक.
आज अनेक लोक ‘बुवाबाजी’ करत आहेत ही गोष्ट नाकबूल करता येणार नाही. अंधश्रद्धेचे उच्चाटन झालेले नाही व तथाकथित ‘बुवा’ वा ‘स्वामी’ त्याचा फायदा घेतात, हे स्वाभाविकच आहे. म्हणून ‘खरा महात्मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्यात फरक करायला एकच कसोटी लावायला हवी. अतींद्रिय शक्ति अथवा सिद्धि किंवा चमत्कार, ही ती कसोटी नव्हेच ! ती कसोटी आहे ‘प्रत्यक्ष आचरण’ . ज्या व्यक्ती स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता, निःस्वार्थ बुद्धीनें निरलसपणें परहितासाठी झटतात, तेच खरे महात्मे ; मग ते चमत्कार दाखवोत वा न दाखवोत, त्यांना सिद्धी प्राप्त असो वा नसो. आणि जे खर्याखोट्या चमत्कारांनी लोकांना भुलवून स्वतःची तुंबडी भरतात, ते बुवाबाजी करतात, असेंच म्हणायला हवें . समजा, त्यांच्या अतींद्रिय शक्ती पुढेमागे अगदी सिद्ध झाल्याच , तरीही ते ढोंगी बुवाच !
+ + +
[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०७.१९७६.
बदल : दि. १५.०२.२०१८ ]
+ + +
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
मुंबई.
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snaehalatanaik.com
February 19, 2018
आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. तर कुणी ६० प्लस मध्ये असले तरी मान्य करते.
August 5, 2023
चंदू चॅम्पियन या नावाने मुरलीधर पेटकर यांचा बायोपिक तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, फक्त त्यांनी तो पाहायला हवा.कर्तुत्वाला आशेची झालंर असली की कुठल्या कुठे झेप घेता येते. व्यंगालाही स्वप्नं असतात. स्वप्नांना फुलवतां आलं की आयुष्य सुंदरच आहे.
June 12, 2025
आंतरजालच्या जाळ्यात तरुण पिढी कोळ्याप्रमाणे अडकली आहे. सध्या स्क्रीन टाईमने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. देश केवळ वैधानिक इशाऱ्यांनी चालत नाही, तर शिस्तीने चालतो. वैधानिक इशारा म्हणजे स्वैराचाराला दिलेलं प्रमाणपत्रआहे. अश्लीलता संस्कृतीस घातक आहे, हा वैधानिक इशारा अजून आला नाही. नैतिकता जेव्हा दगिन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवलेली असते तेव्हा ती असून नसल्यासारखी असते.
July 3, 2026
आदर्शवत भारतीय संस्कृतीला लागलेला एक काळपट डाग म्हणजे “हुंडा पद्धती” असे म्हणता येईल. परंपरेने चालत आलेला हा प्रकार आज २१व्या शतकात देखील तेवढ्याच भयानतेने भारतीय संस्कृतीवर आघात करतो आहे.कारण आज सद्यस्तिथीचे सामाजिक चित्रण पाहता आजदेखिल बऱ्याच ठिकाणी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष पणे हुंडा पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
June 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti