विश्वास नांगरे पाटील म्हणतात,
परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , "मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ." चहा कडवट लागला .
नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे . काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार.
सैराट करमणूक म्हणून पहा पण आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .
केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत 1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले.
आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!
February 6, 2017
जेव्हा नाकातोंडात पाणी जाऊ लागते तेव्हा माकडीण आपल्याच पिलाला पायाखाली घेते. डॉ. सिंग वेगळे काय करीत आहेत? त्यांचे सरकार आता अधिक काळ टिकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी देशाच्या हिताचाच बळी देण्याचा निर्णय घेतला आहे. या देशात सरकार कोणत्या पक्षाचे असावे, पंतप्रधान कोणत्या पक्षाचा असावा हे जरी या देशातील लोक मतदानाच्या माध्यमातून ठरवित असले तरी या देशाची आर्थिक नीती काय असावी, हे मात्र अमेरिका ठरवित असते. हे दुर्दैवी सत्य अजून एकदा अधोरेखित होत आहे.
September 26, 2012
रस्त्याने प्रवास करताना बरेचदा एक सूचना वाचायला मिळते, ‘शॉर्ट कट मे कट शॉर्ट युअर लाइफ’. ही सूचना खूपच अर्थगर्भ आहे. रस्त्यावर लिहिलेली सूचना जरी केवळ वाहन चालकांशी संबंधित असली तरी इतर संदर्भातही ही सूचना तशी खूप मौलिक आहे.
February 18, 2007
याहूनही अधिक मूलभूत एक प्रश्न आहे. कायदा हा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात असतो. उदा. – स्त्रियांना मंदिर-प्रवेश, मुस्लिमांमधील ‘ट्रिपल् तलाक’ची पद्धत. पण, स्वतःचा गर्भ ठेवणें किंवा गर्भपात करणें या बाबीचा समाजाशी संबंध कसा ? आपला गर्भ ठेवावा की गर्भपात करावा, हा अधिकार खरें तर त्या त्या स्त्रीलाच असला पाहिजे. हा तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे. समाजानें किंवा समाजाचा प्रतिनिधी म्हणून, सरकारनें, त्या स्त्रीच्या जीवनात किती हस्तक्षेप करावा, हें ठरवायला नको कां ?
March 9, 2019
भारताचा इतिहास चाळतो म्हटले तर इतिहासात ठिकठिकाणी, पानापानावर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. लढाईचे मैदान असो अथवा साहित्याची मुलूखगिरी, मराठी माणसाचा आदराने उल्लेख केल्याशिवाय इतिहास पुढे सरकूच शकत नाही. अगदी अलीकडील काळापर्यंत ‘मराठी पाऊल’ सगळ्याच क्षेत्रात पुढेच होते.
October 30, 2005
अर्थमंत्र्यांनीच सादर केलेल्या आकडेवारीनुसार विविध करांद्वारे सरकारला मिळणारे अंदाजे ढोबळ उत्पन्न 7 लाख 46 हजार 656 कोटी राहिल. करांव्यतिरित्त* इतर स्त्रोतांपासून मिळणारे उत्पन्न 1 लाख 48 हजार 118 कोटींचे असेल. या एकूण उत्पन्नापैकी कृषीक्षेत्राच्या विकासासाठी किती तरतूद करण्यात आली आहे?
March 7, 2010
प्रकाशन दिनांक :- 20/02/2005
र्ीकाम करून घेणे’ ही संकल्पना अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. एवढेच नव्हे तर काम करून घेण्याची कला आत्मसात करणे हीच यशाची एकमेव गुरुकिल्ली ठरू पाहात आहे. अर्थात केवळ वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात वावगे असे काहीच दिसत नाही, परंतु ‘काम करून घेणे’ या संकल्पनेमागील लक्षार्थ मात्र बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जातो.
February 20, 2005
आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?
April 15, 2010
25 रविवार, नोव्हेंबर 2007
देशाची फाळणी धार्मिक आधारावर झाली. मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. त्या परिस्थितीत उर्वरित देश ‘हिंदुस्थान’ म्हणून ओळखला जाणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही.
November 25, 2007
राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.
August 19, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti