(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – काकडी

    किचन क्लिनीक – काकडी

    हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
    हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.

    हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.

    आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:

    १)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.

    २)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.

    ३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.

    ४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.

    ५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.

    ६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.

    अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 11, 2016


  • आहारातील बदल भाग ६९ – चवदार आहार भाग ३१

    आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ?
    एक.

    दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर....
    दोन अडीज मोसंबी.
    यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत.
    आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही !

    पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ?
    एक ग्लास अगदी सहज.

    आग्रहाने, स्पेशल कोणी आणून दिला तर...
    दोन ग्लास पण नक्कीच पिऊ....

    मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गझलेच्या भाषेत सांगायचे तर ....

    मला तर तो "रस" नकोच होता
    मला तर तो "रस" नकोच होता,
    पण
    तू दिलेला रस
    रस घेऊन
    घेतला नाही तर....
    .
    ..
    ...

    तुझा विरस होणार होता
    आणि नंतर तुझा,
    माझ्यातला "रस" कमी होणार होता....
    म्हणून प्यावा लागला.

    मोसंब्याचा दोन ग्लास रस येण्यासाठी किती मोसंबी लागतात ?
    तब्बल सात ते आठ.
    माझी रसनेंद्रियांची तृप्ती फक्त एक नाहीतर दोन मोसंबी खाऊन होणारी होती, तिथे सात आठ मोसंब्यांचा ऐवज जर पोटात ओतला गेला तर ?

    पचेल का तो ?

    नाही ना.
    मग ??

    आधीच आहे अप्सरा
    बटेने झाकला चेहरा
    केसात माळला गजरा
    चेहराही मंद हसरा
    त्यात जरासा नखरा
    हाऽय हाऽय्ऽ
    काय हा नजारा

    फेसाळलेला रस काढलेला
    ग्लास समोर भरलेला
    त्यात आल्यालिंबाचा रस पिळला
    पुनः वरून चाट मसाला भुरभुरवला
    गरज नसताना स्ट्राॅ ही घातलेला
    एवढासा ग्लास तो किती नटवला
    बाकी चवींनी एवढा का सजवला ?
    पचायला जड होणारा पचवायला.

    स्नेहन, प्रीणन, तर्पण, बृंहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकासी, आणि ह्रद्य
    असे सारे गुण एकाच वेळी, एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजीर्णच व्हायचे. !

    फळे हवीत चावून खायला
    एवढंस मर्म सांगायला
    एवढं हवं होतं का घोळवायला.

    असं ज्युस पिणे म्हणजे, स्वतःचा बंगला असताना, बंगल्यात अप्सरा असताना, बंगला अप्सरा सोडून, झोपडीतील खत्रूड मड्डमेवर प्रेम केल्यासारखंच नाही का ?

    तोंडात स्वतःचे बत्तीस दात समोर हयात असताना, आणि तिला फसवून (जीभेला) डायरेक्ट घश्यात ज्युस ओतणे, हा शुद्ध अन्याय आहे.
    चव निर्माण करणाऱ्यावर,
    चव घेण्यासाठी "मी" आहे,
    असे सांगणाऱ्या "मी" वर !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    01.12.2016

      December 1, 2016


  • आहाररहस्य १३

    लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
    हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
    याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
    मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
    एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
    एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
    मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.

      September 3, 2016


  • आहारातील बदल भाग ६७ – चवदार आहार -भाग २९

    रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात.

    कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या तरतम भावामुळे, पदार्थातील चवी मधे थोडा थोडा बदल होत जातो. आणि अनुरसांची निर्मिती होते.

    जसे हिरवा रंग बघितला तरी त्यात अनेक सूक्ष्म छटा असतात. साडीला योग्य मॅचिंग ब्लाऊजपीस शोधताना, हे पाच पन्नास रंग आपल्याला सहज दिसतात. तसे, चवींमधे देखील एका चवीत आणखी दुसरी चव मिसळत गेली कि वेगळी वेगळी चव बनत जाते. घरात साखर, चहा पावडर, दूध, पाणी तेच असले तरी चार माणसांनी बनवलेल्या चार चहाच्या चवीमधे फरक पडतोच ना ! यातील साखर पावडरचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले किंवा गॅस लहान मोठा ठेवला गेला तरी बनणारा चहा हा वेगवेगळ्या चवींचा बनतो, हे आपण व्यवहारात पाहातो, तसेच आहे.

    हिरड्यांचा तुरटपणा, सुपारीचा तुरटपणा यात फरक आहे. साखरेचा गोड पणा आणि गुळाचा गोडपणा यातही फरक आहे. तसेच कारले आणि मेथीच्या कडूपणातही फरक दिसतो. त्यामुळे प्रत्येक चवीचे वेगवेगळे अनुभव येणे आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसणे, चुकीचे नाही.

    एखादे नवीन व्यंजन बनवताना त्यात कोणत्या चवी किती प्रमाणात मिसळल्या जात आहेत, त्यावर त्या पदार्थांचे औषधी गुण अवलंबून असतात.

    डाळीपासून गोड गुळ घालून खीर करता येते, आणि तिखट मसाला एकत्र केला की, आमटी बनते. आंबट घातले की, चटणी होईल.

    आता हेच बघा ना, खीर गोड आहेच, आणि पुरणपोळी पण गोडच आहे. हे दोन्ही गोड पदार्थ एकाच चणाडाळीपासून बनतात, म्हणजे यांचे गुण एकच असतील का ? कारण एक खीर शिजवली जातेय आणि दुसरी पुरणपोळी भाजली जातेय. जो पदार्थ पाणी घालून शिजवला जातो, तो पचायला जड बनतो, तर भाजून ज्याच्यातील पाणी कमी केले जाते, ती पुरणपोळी पचायला खीरीच्या तुलनेत हलकी होईल का ? असा विचार करायला हरकत नाही, पण पुरणपोळी बनवण्यासाठी आणखी एक मधुर रस वापरला जातो, तो म्हणजे गहू. म्हणजे पुनः ती पचायला जड झाली. यासाठी
    पुरणपोळी खाताना ती तुपाबरोबर किंवा कोकणात नारळाच्या दुधाबरोबर इतरत्र गाईच्या दुधाबरोबर खाल्ली जाते. सोबत डाळीची मसालेदार तिखट आमटी (ज्याला कट असेही म्हणतात.) पुरणपोळी पचवायला मदत करायला हजर असतेच.

    यासाठी आहार बनवताना किंवा खाताना, चवींच्या मिलाफाचा संगम करण्यासाठी, युक्ती वापरणे महत्वाचे असते. जी ओरीजिनली भारतीयांकडे आहे.

    एखादा पदार्थ सहजपणे पचावा, यासाठी त्या पदार्थामधे अन्य काही पदार्थ युक्तीने मिसळले जात होते. आता सर्वच बदलले. दोन भिन्न चवीचे पदार्थ बिनधास्त एकत्र केले जात आहेत. जसे मधुर रसाच्या दुधात आंबट फळे घालणे, किंवा दूध घातलेल्या चहामध्ये खारट चवीची खारी मारी बुचकळून खाणे हे रस विरूद्ध आहे.

    हे विरूद्ध एखादा दिवस खाल्ले म्हणजे लगेच रोगाची लक्षणे दिसतील असे नाही. पण वारंवार असे रस विरूद्ध पदार्थ खाल्ले गेले तर मात्र असात्म्यता अहणजे अॅलर्जी निर्माण होते, हे नक्की !

    वेगवेगळ्या फूड चॅनेल्सवर रंगसंगती, फॅशन, ट्रेंड, व्हरायटी, न्यू इन्व्हेंशन इ. च्या नावाखाली आरोग्यदायी आहाराचा पार बट्ट्याबोळ चाललेला आहे. त्यात डाएटीशियन या पदवीधारकांकडून आयुर्वेदातील मूलतत्वे बरोबर विरूद्ध करून सांगितली जात आहेत. वैद्य मंडळीदेखील पाश्चात्य बुद्धीची बनत चालली आहेत, अनेक डाॅक्टरांचे देखील आहाराबाबत एकमत होत नाही, आणि नेमकं आपण कसं वागायचं, हे समाजाला समजतच नाहीये.

    किती किती ठिकाणी दुरूस्ती करणार ? आभाळच फाटले आहे, ठिगळे तरी किती लावणार ? बघू, अच्छे दिन आनेवाले है, असं ऐकायला येतंय !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    29.11.2016

      November 29, 2016


  • किचन क्लिनीक – हळद

    पी हळद हो गोरी' ही म्हण मराठी मध्ये रूढ आहे.म्हणूनच तर भारतीय संस्क्रूती मध्ये हळदीला एक वेगळे स्थान आहे.अगदी आपल्या हिंदू धर्मात देवकार्या पासून ते लग्ना पर्यंत हिचा वापर होतो.बहुधा हिच्या मधल्या रक्षोघ्न ह्या गुणांमुळे अर्थात वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी हिचा वापर भोजना व्यतिरिक्त ब-याच अन्य कार्यात देखील केला जात असावा.

    देवपूजेत देवाला हळद कुंकू वहातात,नव्या नवरा नवरीला हळदीच्या दिवशी हळद लावतात,तसेच लग्नामध्ये नवरा नवरीच्या हातालाहळदीचे गाठवळ बांधतात कारण त्यांना कोणतीही दुष्ट शक्तीच्या बाधा होऊ नयेत म्हणून.तसेच सुवासीनीची ओटी भरताना अथवा मानपान करताना तिच्या कपाळाला हळद कुंकू लावले जाते.

    हे झाले हळदीचे बाह्य उपयोग पण हिच हळद जेवणात वापरली असता जेवण दिसायला सुंदर,रूचीकर,सुपाच् बनविते.उसळ,वरण,भाजी,आमटी,फोडणीचा भात,मासे,चिकन,मटण असे नानाविध पदार्थ बनवताना हळद हि लागतेच.थोडक्यात काय तर ह्या हळदी शिवाय आपल्या स्वयंपाक घराला देखील पूर्णत्व येणार नाही.

    अशी हि बहूगुणी,बहूउपयोगी हळद.अहो प्रत्यक्ष महादेवाला देखील प्रिय असणारी अर्थात जेजूरीच्या खंडेरायांच्या भालमस्तकी भंडारा म्हणून मिरवणारी ही हळद,बरेच जण घरगुती औषधांमध्ये हिचा वापर करत असतातच.अहो घरच्या ग्रूहलक्ष्मीचे बोट स्वयंपाक करताना कापले तर ती प्रथम कापलेल्या बोटावर हळद दाबून धरते.

    चला तर हिची थोडक्यात माहिती आणी घरगुती औषधांमध्ये वापर ह्या बद्दल जाणून घ्यायचे ना?
    हळदीचे बहुवर्षायू क्षुप असते.आणी आपण वापरत असलेली हळद हा त्याचा कंद होय.हि चवीला कडू,गोड असते,आणि उष्ण असते.हि शरीरातील वात आणि पित्तदोष कमी करते.

    उपयोग:

    १)खरूज आली असता हळद+ आवळकाठी+ कडूनिंबाचा काढा घ्यावा.

    २)हळद लोण्यात खलून त्वचेला लेप केल्यास त्वचा मऊ मुलायम होते.

    ३)ब-याच बायकांना अंगावर पांढरे जाण्याची सवय असते त्यांनी हळदीचा काढा मधासोबत घ्यावा.

    ४)मुळव्याधी मध्ये हळदकुंड भाजूनतिची पूड करावी आणी हि पूड १/२ चमचा + कोरफडीचा गर १/२ चमचा असे मिश्रण दिवसातून दोन वेळेस असे सलग सात दिवस घ्यावे.

    ५)आंघोळ करताना साबणा एवजी हळद+ बेसन+ कापूर हे मिश्रण वापरल्यास त्वचा नितळ व सतेज होते.

    ६)पायाला भेगा पडण्याची सवय असणा-यांनी हळद एरंड तेलात कालवून भेगांवर लावावी.

    ७)डोक्यात ज्यांना वारंवार कोंडा होतो त्यांनी हळद+रिठे +शिकेकाई घालून काढा बनवावा व ह्या काढ्याने केस धुवावेत.

    ८)मधुमेहामुळे जर फार लघ्वी होत असेल तर हळद १ चमचा+ काळेतीळ २ चमचे /हळद १चमचा+बेल पानांचा रस ४ चमचे घ्यावा.

    हळदीच्या अतिसेवनाने संडासला पातळ होणे,तसेच स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 16, 2016


  • आजचा आरोग्य विचार – भाग पंधरा

    उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.

      February 15, 2018


  • नमस्कार – भाग ४

    नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.

      July 18, 2017


  • जेवणाची बैठक कोणती ?भाग १

    ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार

    पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात.

    ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात केली. ज्याला आपण आज भारतीय बैठक म्हणतो.

    गावाकडे अजूनही पुरूष मंडळी पंगतीमधे जेवताना, उकीडवे बसूनच जेवतात. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून बसणे, म्हणजे ऊकीडवे बसणे.
    उकीडवे बसल्याने दोन्ही मांड्या पोटावर दाबल्या जातात. जेवतानाच पोट दाबून जेवले गेल्याने अनावश्यक जेवण जात नाही. त्यामुळे तब्येत सडसडीत रहाते. पोट सुटत नाही. पोटात वात साठून रहात नाही. तयार झालेला गॅस लगेच बाहेर पडून जातो. पोट हलके होते.
    हा पोटातील गॅसचा दाब इतर अवयवांवर न पडल्यामुळे तेही खुश.

    समजा, दाटीवाटीने एका कोचवर (बाकावर) चार माणसे बसली आहेत. त्याच बाकावर आणखी दोघांना बसायला सांगितले तर ? कोंबून ठोसून बसलेच, तर पहिले चार जण, जे आरामात बसले होते, त्यांना आपल्या हालचालींवर निर्बंध आणावे लागतील. त्यांच्या हालचाली मर्यादित होतील.

    अगदी तसेच पोटातील अवयवांचे होते. यकृत, प्लीहा, अग्न्याशय, किडनी, आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर रहाणारे ह्रदय, फुफ्फुसे, यांच्यावर आतड्यातील गॅसचा अतिरिक्त दाब सतत पडत रहातो.

    हा गॅस तयार होता होता जर बाहेर पडला तर त्रास होणार नाही. पण जर ही हवा आतच साठून राहीली तर, या सर्व अवयवावर अतिरीक्त दाब पडतो. आणि त्यांचे आयुष्य कमी होते.

    हा दाब किती असतो, कल्पना आहे ?
    अहो, याच दाबून ठेवलेल्या वाताच्या जोरावर, त्या जेम्स वॅटने म्हणे वाफेचे इंजीन चालवले होते.

    आता हा वाताचा दाब आत जर वाढला तर, या पैकी एका अवयवांवर दाब येणार हे निश्चित. मग त्या अवयवाने कधीतरी अचानक संप करून, त्याच्यावर पडणारा अतिरीक्त ताण कमी करण्याची मागणी केली तर, चुक आहे का ?

    अवयवांनी ही अशी मागणी करणे, म्हणजेच विशिष्ट रोगाची लक्षणे होत.
    म्हणजेच हा ताण अतिरिक्तरीत्या वाढू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अवयवांना संपावर जाण्यापासून रोखणे.

    हे सर्व एका आसनामुळे शक्य आहे, ते म्हणजे उकिडवे बसून जेवणे.

    आताच्या काळात जरा "मॅनरसलेस" वाटेल, पण त्याला पर्याय नाही.

    जसे आसन तसे मलविसर्जन.

    टेबलखुर्ची घेऊन जेवायला काटकोनात बसले की, मलविसर्जन पण काटकोनातच केले जाते ना ! कमोडवर बसून हो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    17.09.2016

      September 17, 2016


  • आहारातील बदल – भाग २

    जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.

    आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.

    जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
    जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
    जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
    तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.

    म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.

    वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.

    हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.

    जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.

    पण कोणाला ?
    ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
    दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021.

      May 26, 2017


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तीन

    स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त "हर हर महादेव" म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.

    ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.

    मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.

    (काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही "मॅनर्स" पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच "सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.

    तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.

    शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.

    एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
    हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
    जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.

    पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह...

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    18.03.2017

      March 18, 2017