सीमा सुरक्षा दलाला १ महावीरचक्र, ४ कीर्तिचक्रे, ११ वीरचक्रे, १० शौर्यचक्रे आणि ५६ सेनापदके या वीरसन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक सन्मान त्याच्या अधिकारी आणि जवानांना व्यक्तिगत पातळीवर प्राप्त झाले आहेत.
December 1, 2021
सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं जीवनविश्वही वेगळंच असतं. इथं काम करणारे कलाकार हे स्वयंप्रेरणेन आलेले असतात. ते विविध प्रांतांतून, देशातून आलेले कलाकार म्हणजे ते एक कुटुंबच असतं. त्यामुळं त्यांच्यात एक कौटुंबिक ओलावा असतो. सर्वसाधारणपणं रशियन सर्कस जागतिक पातळीवर श्रेष्ठ म्हटली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे शोमॅन दिवंगत राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटानंच सर्कशीचं अंतरंग उलगडून दाखवताना ‘दुनिया एक सर्कस है’ हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवलं.
April 16, 2022
जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. ‘युनेस्को’च्या जगभर शांती प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टातून, संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला होता, त्याचाही हेतू सर्वसामान्यांना संगीताभिमुख करण्याचा होता. त्यानुसार, १ ऑक्टोबरला १९७५ रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय संगीत-दिन म्हणून साजरा झाला होता. जगभर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लुक्झेम्बर्ग, जर्मनी, स्वीत्झर्लंड, कोस्टा रिका, इस्त्रायल, चीन, भारत, लेबोनन, मलेशिया, मोरोक्को, पाकिस्तान, फिलिपिन्स, रोमानिया, कोलोम्बिया या १७ देशात संगीत-दिन साजरा होतो. अमेरिकेतदेखील २००७ पासून, त्याचा प्रारंभ झाला आहे. संगीताच्या माध्यमातून, जगभर शांती पसरावी हा या दिवशीच्या साजरीकरणाचा हेतू आहे. या सोहळ्यात जे उपक्रम हाती घेतले जातात त्यात, संगीतकारांची विविध प्रकारच्या संगीताची अंत:करणे उलगडवून दाखविणारी भाषणे, कलाकारांचे परिसंवाद, संगीत स्पर्धा व कोडी, संगीताचे रेकॉर्डिंग, संगीत वाद्यांचे प्रदर्शन तसेच तत्संबंधी पेन्टिंग्स्, फलक, शिल्प, व्यक्तीरेखा, छायाचित्रे यांची प्रदर्शने शिवाय विविध देशातल्या संगीततज्ज्ञांना आमंत्रणे देऊन त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 21, 2018
‘संगीत सौभद्र’मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी.
November 18, 2021
भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पार्श्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आर्थिक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही.
December 23, 2021
आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे.
March 27, 2018
चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती.
March 28, 2022
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.
April 21, 2021
स्वयंपाकघरात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी उपकरणं वापरतांना गृहिणी आपला अभियांत्रिकी मेंदू सहजच उपयोगात आणते.
May 13, 2023
साधारणतः पूर्वीच्या काळी ज्यांच्या घरी विनाइल रेकॉर्ड प्लेअर असायचे त्यांना खूप श्रीमंत मानलं जायचं. एक वेगळाच थाट असायचा अशा लोकांचा. सगळी काम आटोपून संध्याकाळी ग्रामोफोन वर गाणी ऐकणं म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळवून देण्याचा मार्गच होता त्यांच्यासाठी आणि त्यात भर म्हणून जर पाऊस पडत असेल व हातात वाफाळलेल्या चहाचा कप जर असेल तर दुग्धशर्करायोगच म्हणायचा. १८७७ मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचा शोध लावला त्या दिवसाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विनाइल रेकॉर्ड डेची स्थापना केली.
August 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti