गाईचे सैन्य
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितएके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.
October 22, 2025