क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १२- अल्लुरी सीताराम राजू

न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला.



न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला. सशस्त्र क्रांती ठप्प पडणार की काय असे वाटत असतानाच आंध्रमध्ये वासुदेव बळवंतांच्या पद्धतीनं आदिवासींना हाताशी घेऊन सरकारला अडीच वर्ष सळो की पळो करून सोडणारा एक रणसिंह पैदा झाला. त्याचं नाव अल्लुरी सीताराम राजू! आदिवासी भूमीवरच्या क्रांतीलढ्याची अमृतागाथा ऐकुया या भागात.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.