देवा, ह्याही देशात पाऊस पाड

(Gold)

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.



Please Login to view Prime Content.