बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।
सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।
दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
बहुतां जनालागी जीवी भजावे ।
भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।
प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
बहु सज्जला नेटका साज केला ।
विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।
भला रे भला बोलती ते करावे ।
बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।
Post Views: 16