दत्ता पाटील

पाटील, दत्ता

विधिमंडळाच्या कामकाजात संसदीय आयुधांचा वापर कोणत्या वेळी आणि कसा करावा, त्यासाठी कोणत्या नियमाचा आधार घ्यावा आणि तो घेताना आपला संदर्भ कोणालाही खोडता येणार नाही याची काळजी घेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांना त्यांची चूक मान्य करायला लावण्याचे कसब दत्ता पाटील यांच्या अंगी होते.

म्हणूनच १९८७ ते १९८९ या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या रूपाने सतत गाजत राहिले. रायगड जिल्ह्य़ामध्ये फुकटे वकील म्हणून ओळखले जाणारे दत्ता पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबांचा कळवळा असलेले व्यक्तिमत्व होते. नारायण नागू पाटील यांच्या या सुपुत्राने वडिलांनी केलेल्या समाजकार्यामध्ये आपल्याही कार्याची ओंजळ ओतली आणि रायगडमधील कष्टकरी आणि शेतकरी यांचे ते तारणहार झाले. वडिलांच्या आग्रहास्तव फौजदारी वकील झालेल्या दत्ता पाटील यांनी गरिबांचे अनेक खटले फुकटात लढविले, म्हणून त्यांना फुकटे वकील म्हणत ते आपुलकीने. रायगडमध्ये एक निष्णात फौजदारी वकील असलेल्या दत्ता पाटील यांनी अनेकांना खटल्यातून सोडविले, याचा उल्लेख शरद पवार यांनी एकदा विधिमंडळात केला होता. दत्ता पाटलांचे वाचन अफाट होते. विधिमंडळाच्या ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांचा अग्रक्रम होता. ज्येष्ठ सदस्य असूनही ते सभागृहात वेळेवर येत आणि सर्वाधिक काळ सभागृहात थांबत. प्रत्येक चर्चेत ते सहभागी होत. त्यांचे वक्तृत्व धारदार, हजरजबाबी होते. त्यांचा आवाज अत्यंत धारदार, मोठा होता. अनेकदा त्यांच्या नुसत्या आवाजानेच समोरच्या मंत्र्याची उत्तर देताना गाळण उडत असे. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एका चर्चेमध्ये उत्तर देण्यासाठी दोन्ही गृहराज्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते आणि मंत्रिमहोदय सभागृहात येईपर्यंत सभागृहाचे कामकाज एकटय़ा दत्ता पाटील यांनी बंद पाडले होते, ते संसदीय आयुधांचा आणि नियमांचा योग्य वापर करीत. स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यामुळे ते फटकळ वाटले तरी मनाने अत्यंत साधे होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा सीमा लढा, त्यांत दत्ता पाटील अग्रेसर होतेच; पण गेल्या वर्षी मुंबई मराठी पत्रकार संघाने केलेल्या सत्कार समारंभात आपण आजही सीमा लढा लढण्यासाठी तुरुंगात जायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. विधिमंडळाच्या सभागृहात असो वा बाहेर लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि तसाच पुढाकार त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे ते संस्थापक होते. मात्र १० वर्षांपूर्वी त्यांना पक्षाने बाहेर काढले तरी त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे टाळले. स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा दबदबा होता. गरीब मुलांसाठी त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटी सुरू केली. संस्थेच्या सर्व पसाऱ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. कुटुंबवत्सल, सार्वजनिक कामाविषयी आस्था असणारा आणि त्यासाठी विधिमंडळाचा योग्य वापर करून गरीब शेतकऱ्यांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा लढवय्या लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने आपण गमावला आहे.

Author