(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे

    तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९रोजी झाला. केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जात असत. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं.

    त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर भारतीय अध्यात्म या विषयावरही त्यांनी लेखन केलं होतं.

    सार्थ श्रीमत् दासबोध, अध्यात्म दर्शन, आनंद साधना, भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण, भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत, भावार्थ भागवत, ज्ञानेश्वरी, मनाची शक्ती, नामसाधना परमार्थ प्रदीप, प्रा. के. वि. (पू. बाबा) बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद, साधकांसाठी संतकथा, शरणागती, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अंतर्यात्रा, ईश्वरभक्ती दर्शन अथवा प्रेमयोग, श्रीचैतन्य गीता असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

    केशव विष्णू बेलसरे यांचे ३ जानेवारी १९९८ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 8, 2019


  • सुपर स्टार अभिनेते भरत जाधव

    मराठीतील किंग ऑफ कॉमेडी पर्सन व मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ रोजी झाला.

    भरत जाधव हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. भरत जाधवचा जन्म लालबाग – परळ परिसरात झाला. तिथेच भरत जाधवचं बालपण गेले. भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली.

    भरत जाधव यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत जवळपास ८५ चित्रपट, आठ दूरचित्रवाणी मालिका केल्या तरी नाटकांमुळे ते अधिक लक्षात राहिला आहेत. गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सीरियस ‘अधांतर’ नाटक असो किंवा ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘ढॅण्ट ढॅण’ आणि ‘सही रे सही’ ही कॉमेडी नाटके. भरत जाधव यांची भूमिका नेहमीच ‘फ्रेश’ वाटली. पूर्वीचे ‘सही रे सही’ आणि आताचे ‘पुन्हा सही रे सही’ नाटक त्याच्या नाटय़ कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. या नाटकाचे हजारो प्रयोग झालेत.

    तब्बल १५ वर्षे हे नाटक सलगपणे सुरू आहे. ‘सही रे सही’ या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती. गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते.

    ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती. भरत जाधव निर्मिती क्षेत्रात असून 'भरत जाधव एन्टरटेन्मेंट' या नावाने कार्यरत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बॉलीवूडइतकी श्रीमंत नसली तरी मराठीतला सुपस्टार भरत जाधवने सर्वप्रथम स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन विकत घेऊन आद्य नटाचा मान मिळवला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    भरत जाधव यांची प्रमुख नाटके- सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच
    भरत जाधव यांची चित्रपट- श्रीमंत दामोदर पंत, खो खो, फेकमफाक, नो एंट्री पुढे धोका आहे, डावपेच, क्षणभर विश्रांती, रिंगा रिंगा, शिक्षणाच्या आयचा घो, जावई बापू जिंदाबाद, गलगले निघाले, साडे माडे तीन, मुंबईचा डबेवाला, मुक्काम पोस्ट लंडन, हय़ांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, नाना मामा, माझा नवरा तुझी बायको, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, चालू नवरा भोळी बायको, जत्रा, खबरदार, पछाडलेला, सरीवर सरी, हाऊसफुल्ल, नव-याची कमाल, बायकोची धमाल, खतरनाक, वास्तव, हसा चकटफू.

      October 29, 2019


  • ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे

    चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.

      June 2, 2021


  • गायक नारायणराव व्यास

    नारायणराव व्यास हे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९०२ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. मा. नारायणराव व्यास यांचा जन्म संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी लाहोर येथे विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केलेल्या गंधर्व महाविद्यालयात 'गुरुकुल' पद्धतीत संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथे त्यांचे थोरले बंधूही संगीत शिकत होते. १९२२ मध्ये आपले संगीत शिक्षण संपवून दोन्ही बंधू अहमदाबाद येथे गंधर्व महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेत संगीत शिकवू लागले. १९३७ मध्ये नारायणराव आपले थोरले बंधू शंकरराव यांच्यासमवेत मुंबईला आले व दादर येथे त्यांनी 'व्यास संगीत विद्यालय' नावाने संगीत शिक्षण संस्था सुरु केली. नारायणरावांच्या थोरल्या बंधूंनी संगीत दिग्दर्शक म्हणून तेव्हाच्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. परंतु नारायणरावांनी तो मार्ग चोखाळला नाही. त्यांनी संगीत अध्यापन व गायकी कायम ठेवली. ते आकाशवाणीवरही गायचे. त्यांनी भारतातील अनेक संगीत मैफिली, महोत्सव आपल्या गायनाने गाजवले. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी भारतात खूप दौरे केले. रसिक श्रोत्यांना त्यांचे गाणे प्रचंड आवडत असे. त्यांच्या काळातील ते एक लोकप्रिय गायक होते. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन एच. एम. व्ही. ने त्यांना १९२९ मध्ये ध्वनिमुद्रणासाठी बोलावले. १९२९ ते १९५५ ह्या काळात त्यांनी ७८ आर.पी.एम. च्या १५० ध्वनिमुद्रिकांमध्ये साधारण प्रत्येकी तीन ते साडे-तीन मिनिटांचा कालावधी असलेली ३०० गाणी गायली. ही गाणी हिंदी भाषा, मराठी व गुजराती भाषांतील होती. नारायणरावांनी त्यांत हिंदुस्तानी रागांवर आधारित व वडील बंधू शंकररावांनी रचलेल्या मराठी बंदिशी आणि भजने गायली. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे व एच. एम. व्ही. कंपनीचे नाव सर्वदूर झाले. ठिकठिकाणच्या ध्वनिमुद्रिका वितरकांनी आपल्याकडील सूचीपत्रकांवर नारायणरावांचे फोटो छापले. त्यांना 'तान कप्तान', 'संगीत प्रवीण', 'आधुनिक तानसेन' अशा पदव्या देऊन लोकांनी त्यांचे सत्कार केले. वृद्ध वयातही नारायणराव व्यास संगीत क्षेत्रात कार्यरत राहिले.

    त्यांचे १९३४ मध्ये ध्वनिमुद्रित केलेले 'राधे कृष्ण बोल मुख से' हे मिश्र काफी रागातील भजन अतिशय लोकप्रिय झाले. त्यांनी राग मालगुंजी मधील आपले गुरुबंधू विनायकबुवा पटवर्धन यांच्या बरोबर केलेले ध्वनिमुद्रण इतर ध्वनिमुद्रिकांपेक्षा दीर्घ काळाचे आहे.

    भारत सरकारने मा.नारायणराव व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. तसेच मध्य प्रदेश शासनाने त्यांचा तानसेन पुरस्कार देऊन सन्मान केला होता. नारायणराव व्यास यांचे निधन १ एप्रिल १९८४ रोजी झाले. आपल्या समुहा तर्फे नारायणराव व्यास यांना आदरांजली.

    नारायणराव व्यास यांची काही लोकप्रिय ध्वनिमुद्रणे
    सखी मोरी रुम झूम (राग दुर्गा), नीर भरन कैसे जाऊं (तिलक कामोद), तुम जागो मोहन प्यारे (भैरव), नीर भरन मैं चली जात हूँ (मालकंस), बलम मोरी सुनी हो (मांड), बहुत सही तोरी सांवरिया (भैरवी).

    https://www.youtube.com/watch?v=1vJ8hF3UFvw
    https://www.youtube.com/watch?v=Y0SZnY-DxxI
    https://www.youtube.com/watch?v=K7w_KvGYxio
    https://www.youtube.com/watch?v=xa6k64cBQ6I
    https://www.youtube.com/watch?v=WAhnX5PMKDY

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NarayanraoVyas

      May 5, 2022


  • कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश – अनंत धोंडू उर्फ अण्णा शिरगावकर

    कोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन करणारे  ‘श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ अण्णा शिरगावकर म्हणजे कोकणचा चालताबोलता ज्ञानकोश आहेत.

      February 17, 2024


  • एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

    जुन्या काळातील एक मराठी कवी. 

      November 4, 2016


  • प्रा. बा. र. देवधर

    संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत.

      July 8, 2022


  • सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी

    जन्म: १९ जानेवारी १८९२

    'सुधारक' या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला.निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग.

    बडोद्याच्या 'सहविचारिणी सभे' च्या विद्यमाने निघणा-या 'सहविचार' ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि' (संपादन), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी... (१९३०)', 'शाक्यमुनि गौतम' (१९३५), 'बुध्दसंप्रदाय व शिकवण' (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.

    विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गु-हाळ... (१९३२)' मधील लेखन व 'चिमणरावांचे च-हाट... (१९३३)', मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

    पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा' (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. 'चिमराव स्टेट गेस्ट' ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला 'सरकारी पाहुण' हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. चिं.वी.जोशी यांचे निधन २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२२३०१७३३
    संदर्भ. ग्लोबल मराठी

      November 21, 2018


  • मराठी कादंबरीकार रणजित देसाई

    देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या.

      March 14, 2022


  • निशिगंधा वाड

    निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे.

      November 18, 2015