जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश – विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे. जे अजूनही अविरत चालू आहे. गेले अनेक वर्षे ते विद्यादान करत असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी संगीतातील उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठीसृष्टी
January 2, 2017
जवळ जवळ १७ वर्षे तो वेस्ट इंडिंजसाठी क्रिकेट खेळत होता आणि एक यष्टीरक्षक म्हणून हा कालखंड निश्चित मोठा आहे . डेरेक मरे याने ६२ कसोटी सामन्यामध्ये १९९३ धावा केल्या त्यामध्ये त्याची ११ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९१ धावा . त्याने यष्टिरक्षण करताना १८१ झेल घेतले आणि ८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे १८९ जणांना बाद केले.
May 28, 2021
कलाक्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राजू फुलकर यांच्याकडे पाहिले जात होते. एकांकिकेतून त्यांनी विविधांगी विषय मांडले. राजू फुलकर यांनी चाळीस वर्षे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम केले. ‘लोकधारा’ कार्यक्रमात हृदयस्पर्शी लोकगीते गाणारे गायक, अनेक वाद्ये वाजवणारे वादक ही त्यांची ओळख होती.
March 4, 2025
अमेय जोग हे मराठी संगीतपटलावर चमचमणार्या युवा तार्यांपैकी एक आघाडीच नाव असून तो प्रसिध्द व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचा सुपुत्र आहे. सारेगम या झी मराठी वरील कार्यक्रमातून असंख्य रसिकांच्या मनावर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरलेल्या अमेयने आजगायत मराठी शास्त्रीय रागांपासून ते नवीन युगाचे व तरूणाईचे प्रतिनिधीत्व करणार्या भावगीतं व रॉक गाण्यांपर्यन्त सर्वच गायनप्रकारांना सारख्याच तन्मयतेने व सचोटीने न्याय दिला आहे व पुण्या मुंबईमध्ये चाललेल्या बहुतांशी सांस्कृतिक संवर्धक गायन कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेल व गोड गळ्याचे प्रतिबिंब, उपस्थितांवर पाडणारी गाणी म्हणायला त्याला आवर्जुन आमंत्रित केले जाते.
August 16, 2011
महाराष्ट्रातील आघाडीच्या “स्त्री पत्रकार” आणि “स्त्री विषयक लेखन” करणार्या शीतल करदेकर यांनी वार्ताहार, वृत्तमानस अशा वृत्तपत्रांमधून राजकीय चित्रपट तसंच नाटकांशी संबंधित सातत्याने लेख तसंच बातमीदारी केली आहे.
August 23, 2013
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
June 8, 2017
जयशंकर दानवे हे खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.
February 27, 2017
आपल्याच तोऱ्यात मिरवणारी खाष्ट सासू आठवली की इंदिरा चिटणीस यांचा ठसका आपल्या मनात उभा राहतो. नऊवारी साडी, अस्ताव्यस्त सुटलेले केस, ठेंगणी-ठुसकी अंगकाठी आणि अचूक संवादफेक यामुळे इंदिरा चिटणीस यांच्या अनेक व्यक्तिरेखा मराठी चित्रपटातून चांगल्याच उठून दिसल्या.
September 17, 2021
नेहाने झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी ह्या मालिकेत काम करून अभिनयाची सुरूवात केली. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. मराठी तारका आता स्वतःची स्पेस व इमेज प्रमाणेच आपल्या 'लुक' बाबतही विशेष काळजी घेऊ लागल्या आहेत. नेहा पेंडसेही त्याला अपवाद नाही.
खंर तर, मराठीतील हॉट व बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते पण त्या प्रकारची कोणतीही भूमिका न साकारताही तिची तशी इमेज तर झाली आहे, असे तिला वाटते आणि त्याबाबत कसलीही तक्रार न करता ती ही इमेज अॅक्सेप्टदेखील करते. आपण व्हिज्युअल मिडियामध्ये असल्याने, येथे 'दिसणे' खूपच महत्वाचे आहे, त्यामुळे आपले लुक, फ्रेशनेस, कपड्यांची काळजी, आपली इमेज, हे सगळंच तितकेच महत्वाचे आहे, असे तिचे मत आहे.
चित्रीकरणाच्या एकूणच धावपळीतून, 'जिम'मध्ये जायला मिळणे खूप गरजेचे आहे. एकंदरीतच प्रेझेंटेबल राहण्याकडे नेहा पेंडसेचे विशेष लक्ष आहे हे ठळकपणे स्पष्ट होते. तिने आजवर मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 22, 2019
उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर
June 3, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti