(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले

    नागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.

      April 18, 2022


  • मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार सतीश दुभाषी

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एके काळचे नामवंत नाव म्हणजे सतीश दुभाषी. पु लं चे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे

      September 12, 2017


  • ज्येष्ठ जादूगार विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर

    इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर त्यांनी जादूमध्ये आणला. ते त्या काळी एलईडी दिव्यांचा कोट वापरीत. भूत व ड्रॅगन यांची फाईट हा त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे. ‘डोळे बांधून मोटारसायकल चालविणे’ हा गाजलेला प्रयोग, ही त्यांची खासीयत होती.

      March 9, 2022


  • किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खाँ

    अब्दुल करीम खाँ साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ कर्नाटकी संगीतातील अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खाँ साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत.

      May 9, 2019


  • रामदास भटकळ

    पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्‍या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एल.एल.बी त्यानंतर मुंबई विद्यापीठून राज्यशास्त्र विषयातून एम.ए.पूर्ण केले.

    १९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील. १९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला.

    “बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.

    “द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 16, 2015


  • अमोल पालेकर

    अमोल पालेकर

    Amol Palelar is an Indian actor of the 1970s and a director of Hindi and Marathi cinema.

      April 13, 2010


  • दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज असलेले ओम पुरी

    रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या झंझावाती प्रवासाची सुरुवात १९७६ मध्ये एका मराठी सिनेमापासून - 'घाशीराम कोतवाल'पासून झाली होती. या सिनेमात घाशीरामची मध्यवर्ती भूमिका साकारल्यानंतर, अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.

    पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर १९७६ मध्ये त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.

    'घाशीराम कोतवाल' या मराठी चित्रपटातील घाशीराम, 'आक्रोश'मधील लहान्या भिकू, 'अर्धसत्य'मधील अनंत वेलणकर, 'घायल'मधील एसीपी जॉय डिसोझा, 'नरसिंह'मधील सूरज नारायण सिंह बापजी, 'माचिस'मधील सनातन, 'चाची ४२०'मधील बनवारीलाल, 'हेराफेरी'मधील खडकसिंग, 'रंग दे बसंती'मधील अमानुल्ला खान, 'दबंग'मधील पोलीस इन्स्पेक्टर या सगळ्या बहुरंगी-बहुढंगी, नायकी-खलनायकी-विनोदी भूमिका अत्यंत ताकदीनं साकारणारे ओम पुरी यांनी 'आरोहण' आणि 'अर्धसत्य'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल १९९० मध्ये त्यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होते. फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. ब्रिटिश सिनेसृष्टीतील कसदार कामगिरीबद्दल त्यांना मानद 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' ही पदवीही प्रदान करण्यात आली होती. ब्रिटिश विनोदी चित्रपट 'ईस्ट इज ईस्ट'मधील भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अॅटनबरो यांच्या गांधीमध्ये ओम पुरी हे पाहुणे कलाकार होते. सन ऑफ फॅनेटिक, सिटी ऑफ जॉय, वुल्फ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांचंही प्रचंड कौतुक झालं होते.

    ओम पुरी यांच्या विनोदी अभिनेत्याचं दर्शन घडलं होतं ते, काक्काजी कहीं आणि मिस्टर योगी या टीव्ही मालिकांमधून. त्यानंतर गोविंद निहलानी यांच्या 'तमस'मधील भूमिकेनं त्यांना दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. दूरदर्शनवरील 'भारत एक खोज' या कार्यक्रमातील त्यांचा आवाज आजही अनेकांच्या कानात तसाच कायम आहे. 'द जंगल बुक' या चित्रपटातील 'बघीरा'ला ओम पुरी यांनीच आवाज दिला होता. ओम पुरी यांचे निधन ६ जानेवारी २०१७ झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :-इंटरनेट

      November 2, 2017


  • ज्येष्ठ टाळ वादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर

    त्यांनी माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे पखवाजवादनही शिकले, पण खरे ते रमले ते टाळवादनात. ते बालगंधर्वांबरोबर साथ करायचे. माऊली टाकळकर यांनी पंडित भीमसेन जोशींना ४० वर्षे टाळांची साथ केली. त्यांच्यामुळेच त्यांनी जगभर दौरे केले. आपल्या टाळ वादनाने अनेक दिग्गज व आंतरराष्ट्रीय कलाकारांना त्यांनी गेली ४ दशकाहून अधिक साथ केली आहे.

      April 11, 2022


  • आकाशवाणी पुणे केंद्र

    २ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.

    गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी " बहुजन हिताय बहुजन सुखाय " ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे... !!!
    सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली.
    आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम आजही अनेक श्रोते ऐकत असतात. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक पुणे आकाशवाणीवर वर्षी येत असतात.

    मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असो, किंवा बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम जास्त ऐकले जात नाहीत असे वाटते,पण गृहीणी त्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, राष्ट्रीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. पुणे विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते.

    सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. पुणे आकाशवाणीवर ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६० च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला होता. पण आज काल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत,पालखीवर दरवर्षी "पायी वारी पंढरीची "ही कार्यक्रम मालिका प्रसारित करण्याची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं जपली आहे.

    या वर्षी पुणे आकाशवाणीने "निवेदक आपल्या भेटीला" या कार्यक्रमा अंतर्गत पुणे आकाशवाणीचे निवेदक श्रोत्यांच्या भेटीस आणले होते.
    यात मंगेश वाघमारे, गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी,डॉ.प्रतिमा जगताप, कैलास जगताप, संजय भुजबळ या निवेदकांनी आयोजित केलेल्या बहारदार रंजक कार्यक्रमाचा आस्वाद रसीकांनी घेतला.पुणे आकाशवाणीचा ब्लॉगदेखील आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 2, 2017


  • (डॉ.) एन. जे पवार

    शेतकरी कुटुंबातील मुलगा उच्चशिक्षण घेतल्यानंतर कशी कर्तृत्वभरारी घेऊ शकतो, याचा आदर्श कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव जगन्नाथ तथा एन. जे. पवार यांच्या कामगिरीतून महाराष्ट्राला मिळत आहे. भारतीय सायन्स काँग्रेसचा युवाशास्त्रज्ञ पुरस्कार, ब्रिटिश कौन्सिलची प्रतिष्ठित संशोधनवृत्ती सलग दोनदा पटकाविणारा अभ्यासू विद्यार्थी, पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आता कुलगुरू!

    सांगली जिल्हय़ातील ऐनवाडी या छोटय़ाशा गावात हे संशोधन बीज पेरले गेले. पवार यांच्या कुटुंबीयांपैकी महाविद्यालयाचा ‘कॅम्पस’ अनुभवणारे ते पहिलेच! कोल्हापूर विद्यापीठात विशेष श्रेणीने पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर भूशास्त्र, भूजलशास्त्र, पर्यावरणीय भू-रसायनशास्त्र आदी विषयांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले. प्रयोगशाळेतील संशोधनाची ‘काळय़ा आई’शी नाळ जोडण्यासाठी ते झटत राहिले. म्हणूनच ब्रिटन व जपानमधील ओसाका विद्यापीठात संशोधनाची संधी मिळूनही त्यांना ओढ होती ती मायभूमीचीच! पुणे विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून काम करताना भारतीय संशोधन संस्था, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आदींच्या माध्यमातून कोटय़वधींची अनुदाने मिळवीत डॉ. पवार यांनी सहकाऱ्यांनाही संशोधनासाठी प्रोत्साहित केले.

    भूशास्त्रातील या प्रगत प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक आरोग्य, बदलते पर्यावरण, जलसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अशा अत्यंत मूलभूत क्षेत्रांमध्ये पथदर्शी कार्य केले. ‘जनतेची विज्ञान काँग्रेस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या पुण्यातील अधिवेशनात भूशास्त्रीय संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात डॉ. पवार यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या श्रमशक्ती प्रतिष्ठानचे वैज्ञानिक सल्लागार या नात्याने जलनियोजन, ग्रामविकासाकरिता काम करीत सामाजिक बांधिलकीचाही ते प्रत्यय देत आहेत. ‘कोल्हापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये,’ असा जाहिरातींमधील स्पष्ट उल्लेख सहन करीत या विद्यापीठाला एकेकाळी अवहेलना सोसावी लागत होती. त्याच मातीचा सुपुत्र आता कुलगुरुपदी विराजमान झाला आहे. ‘शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाचे महाद्वार मी खुले करून देणार आहे. तसेच कृषी-सहकार या स्थानिक बलस्थानांच्या माध्यमातून उच्चशिक्षणाची समाजाशी नाळ जोडणार आहे. हे प्रकल्प सिद्धीस गेल्यास विद्यापीठाचा लौकिक नक्कीच वाढेल,’ असा विश्वास डॉ. पवार व्यक्त करतात.

      August 4, 2017