जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.
August 16, 2011
खड्या आवाजातली पांढरी सहा ची अद्भुत गायकी असलेले भरत बलवल्ली यांचा जन्म २८ मार्च १९८८ रोजी झाला.
भरत बलवल्ली हे लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज; विलंबीत, मध्य आणि द्रुत अशा सर्व लयीत त्यांच्या आवाजातून व्यक्त होणा-या भावना ही सर्व भरत बलवल्ली यांची बलस्थानं आहेत. भरत भरत बलवल्ली यांचे वडील तबला वादक असल्याने त्यांच्या घरात गाण्याचं वातावरण होतंच, पंडीत यशवंतबुवा जोशी आणि पंडीत उल्हास कशाळकर अशा दिग्गजांकडून भरत बलवल्ली यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. पंडीत तुळशीदास बोरकर यांच्याकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचेही प्रशिक्षण घेतले. लहानपणी बालगंधर्वासह अनेक थोरामोठय़ा गायकांची गाणी ते ऐकत होते, मात्र त्यांनी मा.दीनानाथांची गाणी ऐकली आणि आतूनच त्यांना असं जाणवलं की हे गाणे तर मी गाऊ शकतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गाण्यांची पारायणं केली, भरत बलवल्ली आवाजातील दीनानाथांची गाणी श्रीनिवास खळे, यशवंत देव यांच्यासारख्या जेष्ठ संगीतकारांनी ऐकली, त्यांनी दीनानाथांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेलं. हा मुलगा हुबेहूब तसंच गातोय, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
भरत बलवल्ली यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ती गणपतराव मोहिते ऊर्फ मा. अविनाश यांच्याकडून. मा.मोहिते हे तर दीनानाथांचे स्नेही व सहकारी. भरत बलवल्ली यांनी आतापर्यंत देश विदेशात सुमारे १५० हून अधिक मैफीली सादर केल्या असून लंडन मधल्या लेसिस्टर आणि कॉलीनडेल, स्वितझर्लंडमधल्या झ्युरीक, बाझल या परदेशातल्या मैफीली आणि स्वरांकीत मल्हार महोत्सव, दिनानाथ मंगेशकर स्मृती समारोह, पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव, पं मल्लिकार्जून मन्सूर स्मृती समारोह, पं बसवराज राजगुरू स्मृती समारोह, सानरसखा संगीत महोत्सव या भारतातल्या मैफीलींचा त्यांनी गाजवलेल्या आहेत. देणे मंगेशाचे हा पं. दीनानाथ मंगेशकरांच्या गीतांवर आधारीत कार्यक्रम आणि भक्तीरस हा अभंग, भजने, निर्गुणी भजने, दोहे इत्यादींचा समावेश असलेला हे ही कार्यक्रम भरत सादर करतात. मा. दीनानाथ मंगेशकर ज्यापद्धतीने शास्रीय संगीत गायचे ती गायकी विलक्षण अवघड अशी गायकी आहे. भरत बलवल्ली यांनी या गायकीवर केवळ संशोधनच केलं नाही तर त्या गायकीचं शिवधनुष्य यथार्थपणे देणे मंगेशाचे या कार्यक्रमात पेलूनही दाखवलंय. याबद्दल मंगेशकर कुटंबातल्या पाचही भावंडानी याबद्दल त्यांचं खूप कौतुक केलंय आणि त्याचे विशेष आभारही मानले आहेत. भरत बलवल्ली यांना वयाच्या फक्त १९ व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगदगुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सुरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फ़े त्याला मिळली आहे. या व्यतिरीक्त भरत बलवल्ली यांना आतापर्यंत पंडीत विष्णू दिगंबर शास्त्री पुरस्कार, स्वर संस्कार, वाद्यसंगीतामध्ये पहिला क्रमांक आणि कै. विश्वनाथ पेंढारकर पुरस्कार, स्वरसाधना समिती लाईट क्लासिकल व्होकल्समध्ये प्रथम पारीतोषिक, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन स्पर्धेत प्रथम पारितोषिक, कवी वसंत बापट गीत गौरव पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत. भरत बलवल्ली यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मंगेश तेंडुलकर यांनी भरत बलवल्ली यांच्यावर लिहीलेला लेख
http://m.maharashtratimes.com/no/-/articleshow/6041852.cms
भरत बलवल्ली यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=nwgLHEoXa7w
https://www.youtube.com/watch?v=o9G4GdgCASc
https://www.youtube.com/watch?v=F55SMb1jYsc
https://www.youtube.com/watch?v=3qm38hHBC9M
March 28, 2017
१९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले.
October 31, 2017
अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.
November 19, 2021
सुप्रसिद्ध पटकथालेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अशी फरहान अख्तर ची ओळख करून देणे म्हणजे त्याच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी झाला. दिल चाहता है या पहिल्याच चित्रपटाने त्याने आपल्या आगमनाची द्वाही फिरवली. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाने अवघ्या तरूणाईला वेड लावले.त्यातील गाणी, तरूणांची जगण्याची पद्धत, त्यांच्या फॅशन यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले. आणि फरहान अख्तरचे नाव देशभरातील तरूणाईला तोंडपाठ झाले. वेग व वेळेला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आले. तरूणांची मानसिकता, त्यांच्या अंतर्मनात चालणारी वादळे, आधुनिकतेच्या रेट्यात होणारी संस्कृतीची गोची, त्यातून होणारी घुसमट, या सगळ्यांमुळे निर्माण झालेली जनरेशन गॅप. हे सगळं टिपून ते फरहानने दिल चाहता है मध्ये दाखवलं.तोपर्यंतचे चित्रपट केवळ वरवरचा बदल दाखवत होते. फरहानने याच्या आत घुसून ते विश्व लोकांपुढे आणले.
चाळीशीतील विधवेच्या प्रेमात पडणारा तरूण ही एरवी अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्याने त्यात दाखवली. विशेष म्हणजे ती पाहणाऱ्यांनाही खटकली नाही. अन्यथा चित्रपट एवढा चाललाच नसता.पहिलाच चित्रपट असूनही फरहानने दाखवलेली समज त्याच्यातील विचारी दिग्दर्शकाची ओळख करून देणारी आहे. त्याच्या 'लक्ष्य' या चित्रपटात त्याने आयुष्यात ध्येयाची जाणीव नसल्याने आळशीपणाने व्यर्थ जीवन घालणाऱ्या तरूणास ध्येयाची जाणीव झाल्यानंतर ते साध्य करतानापर्यंतचा प्रवास दाखविला आहे.त्यानंतर शाहरूख खानला घेऊन केलेला 'डॉन' या चित्रपटाचा रिमेकही त्याच्या वेगळेपणाने गाजला. एकूणात फरहान अख्तर हा वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे. त्याने आपल्या वेगळ्या हाताळणीने ठसा उमटविला आहे. त्यामुळे भविष्यात या सर्जनशील दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2018
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार' प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना पाय गमावावा लागला. त्यानंतरही त्यांनी जिद्दीने "झी टीव्ही'वरील ‘पवित्र रिश्ता' मालिकेत काम सुरू केले. 'झी' टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही त्यांची शेवटची मालिका होती.
अजय वढावकर यांचे २७ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 28, 2022
विभाग प्रमुख, कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई
December 15, 2010
जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.
September 21, 2021
आनंद बक्षी यांनी लिहीलेली गाणी आजून ही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी झाला.आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. भगवानदादांची भूमिका असलेला 'भला आदमी' हा चित्रपटापासून गीते लिहण्यास सुरवात केली. हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला मात्र त्यापूर्वीच 'शेर-ए-बगदाद आणि 'सिल्व्हर किंग' हे त्यांचे चित्रपट झळकले. शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकाराने अनेक निर्मात्यांकडे बक्षी यांच्यासाठी शब्द टाकला तर साहिरसारख्या प्रतिभावंताने बक्षींना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 'पारसमणी' आणि 'दोस्ती'च्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीसह 'मि. एक्स इन बॉम्बे' या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची संधी आनंद बक्षी यांना मिळाली. यातील 'मेरे मेहबूब कयामत होगी' आणि 'खूबसूरत हसीना' ही गाणी लोकप्रिय झाली. यानंतर 'हिमालय की गोद में' आणि 'जब जब फूल खिले' या कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटांतील बक्षींनी लिहिलेली गाणी कमालीची गाजली. आशय गर्भ, हलकीफुलकी शब्दकळा, प्रेमगीत, विरहगीत, भजन, कव्वाली, थीम साँग, क्लब डान्स.. सर्व प्रकारची गाणी झटपट लिहून देणारा गीतकार म्हणजे आनंद बक्षी असे समीकरण रूढ झाले! लक्ष्मी-प्यारे यांच्यासोबत त्यांची भट्टी जमली. या जोडीने 'मिलन, आसरा, लुटेरा, आए दिन बहार के, फर्ज, तकदीर, अंजाना, आया सावन झुम के, जीने की राह, जिगरी दोस्त' असे एकापेक्षा एक सुरेल चित्रपट देऊन ६० च्या दशकाची अखेर गाजवली. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना'ने घडवलेला इतिहास सर्वज्ञात आहे. या प्रतिभावान कवी-गीतकाराची सारी वैशिष्टय़े 'अमर प्रेम'मधील 'चिंगारी कोई भडके', 'कूछ तो लोग कहेंगे', 'ये क्या हुआ', 'रैना बिती जाए', 'बडा नटखट है रे', 'डोली मे बिठाके' या गाण्यांमध्ये होती. लक्ष्मी-प्यारेसोबत त्यांनी ३०२ तर पंचम सोबत ९९ चित्रपट केले. राज कपूर, शक्ति सामंता, मनमोहन देसाई, यश चोप्रा, राज खोसला, सुभाष घई या आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकांनी बक्षींकडून शेकडो गाणी लिहून घेतली. आर.के ने 'बॉबी'च्या गाण्यांसाठी स्वत: बक्षी यांच्या घरी जाऊन त्यांना करारबद्ध केले. १९७० चे दशकही बक्षींचेच होते. 'आन मिलो सजना, गीत, हमजोली, कटी पतंग, खिलौना, द ट्रेन, दुश्मन, हरे राम हरे कृष्ण, हाथी मेरे साथी, अपना देश, नमक हराम, शोले, ज्यूली, सरगम' 'कर्ज, एक दुजे के लिये, हीरो, आशा, रॉकी, बेताब, लव्ह स्टोरी, अलग अलग..' या चित्रपटांद्वारे १९८०च्या दशकातही बक्षी आघाडीवर राहिले. तरुण पिढी ला आवडणारी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिल तो पागल है', 'ताल', 'मोहब्बते', 'गदर' या चित्रपटांतील गाणी मा.आनंद बक्षी यांनी लिहलेली आहेत. नवीन पिढीतील संगीतकारांशीही त्यांचे सूर जुळले होते आनंद बक्षी यांनी साडेतीन हजार च्या वर गाणी लिहली. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली. मा.आनंद बक्षी यांचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आनंद बक्षी यांची काही गाणी.
आनेसे उसके आई बहार.
मेरे दिवाने भी दवा नही.
अच्छा तो हम चलते है.
चुपके से दिल दे.
दिल क्या करे.
हम तुम एक कमेरे मे बंद हो.
चिंगारी कोई धडके.
आज मोसम बडा.
मै शायर तो नही.
दो मसताने.
https://youtu.be/O10DveYR4TE
https://youtu.be/mXkHKmuSf1Q
March 31, 2017
इतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे.
April 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti