जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीतकार रोशन यांचा पुत्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांची ही ओळख. घरात संगीताचे वातावरण. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे विनोदवीर मेहमूद यांनी राजेश यांना ‘कुंवारा बाप’ मध्ये संधी दिली. त्यांचा जन्म २४ मे १९५५ रोजी झाला. स्वतंत्र संगीतकार म्हणून राजेश यांचा हा पहिलाच चित्रपट. यातील गाणी चांगलीच गाजली. यातले ‘आ री निंदिया आ’ हे गीत आजही रसिकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘ज्युली ’मध्ये मात्र राजेश रोशन यांनी कमाल केली. यातले ‘भूल गया सब कुछ, याद नहीं अब कु छ ’ हे किशोर-लताचे गाणे आजही भान हरवायला लावते, तर ‘माय हार्ट इज बीटिंग’ ऐेकल्यानंतर मन प्रसन्न होते. रसिकांचा ‘मूड’ एकदम फ्रेश करणारे संगीत हा राजेश रोशन यांचा विशेष पैलू. एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर ), परदेसिया (मि. नटवरलाल ), अंग्रेजी में कहते हैं कि (खुद्दार), सारा जमाना (याराना ), बाहें तेरी खुशबू के (काला पत्थर), तुज संग प्रीत लगाई (कामचोर), दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यों ), घर से निकलते ही (पापा कहते हैं ), जाती हूं मैं (करन अर्जुन ), हंसते हंसते (खून भरी मांग ), कहो ना प्यार है ही त्यांच्या प्रसन्न शैलीतील गाण्यांची काही उदाहरणे.
गायकाच्या प्रतिभेचा समर्पक वापर करण्यात राजेश रोशन नेहमीच यशस्वी ठरले आहेत. ‘दो और दो पांच’ मध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातील ‘तूने अभी देखा नहीं’ हे गाणे राजेश रोशन यांच्या संगीतप्रतिभेची चुणूक दाखवणारे आहे. ‘खेल’मध्ये आशा भोसले यांच्याकडून ‘इडली डू’ हे कॅब्रे साँग आणि तेच गाणे भजन स्वरूपात गाऊन घेण्याचा अफलातून प्रयोग केवळ राजेश रोशनच करू जाणे. ‘इन्कार’ मधले त्यांचे ‘मुंगडा मुंगडा’ हे कॅब्रे साँगही असेच आपल्याला रिफ्रेश करणारे, ठेका धरायला लावणारे. ‘लूटमार’ मधले आशातार्इंच्या आवाजातले ‘जब छाये मेरा जादू’ हे गाणेही असेच. ‘कामचोर’ मधल्या त्यांच्या संगीताने नटलेल्या ‘तुमसे बढकर दुनिया में’ या गाण्यातला गोडवा तर मधाहून मधुर. ‘दूसरा आदमी’ मधल्या ‘चल कहीं दूर’ या साडेसहा मिनिटांच्या गाण्यात लता- किशोर- रफीच्या आवाजाचा वापर एकदम कर्णमधुर. ‘याराना’ मधल्या ‘भोले ओ भोले’ मधला निरागसपणा त्यांच्या संगीताने अधिकच खुलतो, तर ‘छूकर मेरे मन को’ मधला भाव मनाला चांगलाच भावतो. ‘खट्टा मीठा’ मधले ‘थोडा है थोडे की जरूरत है’ असेच काळजाला भिडणारे. ‘जुर्म’ मधले ‘जब कोई बात’ हे गाणेही मनाला वेगळा आधार देणारे. ‘खेल’ मधल्या ‘खत लिखना है’ गाण्यातून तिची आणि त्याची अगतिकता राजेश रोशनच्या संगीतामुळे आपल्यालाही अगतिक करते. बासरी, तबला, दिलरुबा, सारंगी, बोंगो, कोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आदी वाद्यांचा उत्कृष्ट मेळ, त्यातून निर्माण होणारी उत्तम सुरावट, सहज ओठावर येतील अशा चाली, पार्श्वगायकांच्या आवाजाचा योग्य वापर ही राजेश रोशन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये. अलीकडच्या काळात कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काइट्स या चित्रपटांतील संगीताने तरुणाईची मने जिंकणारा राजेश रोशन हा एक विरळाच संगीतकार. काळानुरूप परंतु अभिरुचिपूर्ण, सातत्याने फ्रेश करणारे संगीत देण्यात राजेश रोशन यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजेश रोशन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=rU0PCK5mFbU
May 24, 2017
आज बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमच्या नावाची गणना होते. जॉन अब्राहम इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.
May 27, 2019
December 15, 2010
‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
July 21, 2017
आज ५ नोव्हेंबर.. आज मराठी रंगभुमी दिवस
१८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'संगीत सीतास्वयंवर ' नाटकाचा प्रयोग सदर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. १५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले ,आणि आजही अनेक नवे प्रयोग सातत्याने होत आहेत मा.विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. मराठी रंगभूमी स्थापनादिन प्रतिवर्षी ठिकठिकाणी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्यार ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, दिलीप प्रभावळकर,रामदास कामत, शं.ना. नवरे , फय्याज इमाम शेख, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, महेश एलकुंचवार, डॉ.जब्बार पटेल आदींना मिळाला आहे. या वर्षीचा पुरस्कार मा. अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते मा. जयंत सावरकर यांना मिळाला आहे. छोट्या मोठ्या कोणत्याही भूमिकेत असले तरी आपली अभिनयाची स्मृती रसिकांच्या मनात उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सर्वांनाच झाला, यातच या व्रतस्थाला मिळालेली सन्मानाची पावती आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, आज पाच नोव्हेंबरला सांगलीत वितरण होत आहे.या पुरस्काराने अभिनयाची साठी गाठलेले आणि सहस्रचंद्रदर्शनांकित अभिनेते असलेल्या सावरकर यांना त्यांच्या आयुष्यभराच्या भूमिकांना मिळालेली दाद आहे. त्यांचा हा नित्यनूतन उत्साह असाच राहो, हीच या पुरस्काराच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 5, 2016
साधारण २००० साली ‘निर्धार’या संस्थेच्या श्रीमती शीला पद्मनाभन यांनी नागरिकांना एक आवाहन केले की, त्यांना स्कूल गेट व्हॉलेंटियर हवेत. कल्पना अशी होती की, शाळा भरताना आणि सुटताना शाळेसमोरील रस्त्यावर हे कार्यकर्ते विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळतील आणि ट्राफिक कंट्रोल करतील. प्रभा नेने या आजींनी आपले नाव त्यासाठी नोंदवले आणि त्यांनी ह्या सेवेस सुरवात केली. सकाळी ७-७.३० वाजता सिंबायोसिस शाळेबाहेर उभ्या राहून बेशिस्त वाहतुकीतून मुलांना सुखरूप शाळेत वा रिक्षेपर्यंत पोहचवणे. प्रसंगी वाहतूक थाबवून मुलांना रस्ता करून देणे हे सुरु झाले.
May 30, 2022
१९६० नंतरच्या काळात, आपल्या मोजक्या पण प्रभावी लेखनाने ज्या मराठी कथालेखकांनी कथालेखनाकडे लक्ष वेधून घेतले त्यात श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांची प्रामुख्याने गणना होते.
February 13, 2024
संगीताच्या क्षेत्रात भावगीत या प्रकाराला अमाप लोकप्रियता मिळवून देणारे भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचे २०१७ हे जन्मशताब्दी वर्ष.त्यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला.‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले. गजानन वाटवे यांच खास वैशिष्टय़ म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड व पुस्तकांतून त्यांनी घराघरांत व गल्लोगली लोकप्रिय केल्या. गजानन वाटवे यांच्या भावगीतांना कवितांतून जन्म मिळाला. प्रथमच कवितांना चाल लावली जाते व ती गोड गळ्याने म्हटली जाते हे रसिकांच्या ध्यानात आले. वाटवे यांचा हा प्रयत्न सुरुवातीलाच एवढा गाजला व त्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याकाळी गजानन वाटवेंचे भावगीत गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले गजानन वाटवेंची भावगीतातील कारकीर्द म्हणजे भावगीतांचा सुवर्णकाळ होता. ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘राधे तुझा सल अंबाडा’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘गेला दर्यापार घरधनी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘गर्जा जयजयकार’, ‘ती पाहा ती पाहा बापूजींची प्राणज्योती..’ अशा अनेक रचनांतून ‘वाटवे-युग’ निर्माण झाले, गाजले. अनेक नामवंत कवींच्या कविता त्यांनी अत्यंत आत्मीयतेने गायल्या. भावाविष्काराचा परमोच्च बिंदू ते साधत आणि त्याचमुळे अनेक वर्षे रसिकांच्या मनावर या साऱ्या गीतांचा पगडा होता. आपल्या कार्यक्रमात ते स्वत: लावलेल्या चालीच बहुधा ते म्हणत. त्यामुळे प्रत्यक्ष गाताना हवे ते बदल ते करून घेत. त्यामुळे त्यात ठराविकपणा येत नसे. प्रत्येक वेळी ते काव्य नवीनच वाटे.
लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधी लावण्या, नाटय़संगीत, सिनेसंगीत इतर काही प्रकार त्यांच्या कार्यक्रमात आणले नाहीत. द्वंद्वगीते नाहीत. साधेसुधे शब्द, साध्यासुलभ चाली यांचं जणू मनोमीलन त्यावेळच्या भावगीतात झालं आहे. दुधात साखर पडावी अशी भावगीतं पानफुटीसारखी जमून गेली आहेत की या भावगीतातील शब्दासाठी चाल जन्माला आली की चालीसाठी शब्द जन्माला आले, अशा गोड संभ्रमात भावगीतांचे रसिक पडतात, मनात घर करणारी व ओठावर रेंगाळणारी ही गोड गोड भावगीते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ झाले. हा सांस्कृतिक ठेवा अवीट आहे. खरं तर या साध्या कविता होत्या, त्यांना गजानन वाटवेंनी सहज सुलभ चाली लावल्या. आश्चर्य म्हणजे गजानन वाटवे कवितेतील एकाही शब्दाचा बदल न करता त्यांना सुंदर चाली लावलेल्या आहेत. मात्र एक काळ गजानन वाटवे यांनी गाजवला होता, हे मात्र नक्की. कवी मनमोहन यांच्या ‘राधे तुझा सैल अंबाडा’ आणि राजा बडे लिखित ‘नका मारू खडा शिरी भरला घडा’ या गीतांनी पुण्या-मुंबईत खळबळ उडवून दिली. दोन्ही गीतं अश्लील असल्याचं शिक्कामोर्तब संस्कृतीरक्षकांनी केले होते. रेडिओने दोन्ही गाण्यांवर बॅन टाकला. त्याकाळच्या लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डस्पेक्षाही अधिक विक्री या दोन प्रायव्हेट गाण्यांच्या रेकॉर्ड्सने केली. गजानन वाटवे यांच्या स्वरातलं भावदर्शन ही त्याकाळच्या तरुण पिढीची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेट साठच्या दशकातील सुरुवातीपर्यंत गजाननरावांच्या भावगीतांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गांधी हत्येनंतर महंमद रफीचं‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की अमर कहानी’ ऐकून गजाननरावांनी कवी मनमोहन यांना गांधीजींच्या जीवनावर कविता लिहिण्याची विनंती केली. तुफान लोकप्रियता हे ‘गजानन वाटवे’ या नावासरशी जणू घट्ट चिकटलं होतं. गजानन वाटवे यांचे २ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गजानन वाटवे यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=pYqBj-cduu8
https://www.youtube.com/watch?v=u8LD6_Q4OKQ
https://www.youtube.com/watch?v=C316cQP3EYI
https://www.youtube.com/watch?v=Zdfh5gVMA60
https://www.youtube.com/watch?v=8EJxW0rNF7k
June 8, 2017
तिच्या ‘ धाडसी ‘धडपडीच्या कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा !
December 27, 2017
काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं.
August 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti