(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चरित्र अभिनेता ओमप्रकाश

    ओमप्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केली. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, ‘जूली’, ‘दस लाख’, ‘चुपके-चुपके’, ‘बैराग’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘प्यार किए जा’, ‘खानदान’, ‘चौकीदार’, ‘लावारिस’, ‘आंधी’, ‘लोफर’, ‘ज़ंजीर’ यांचा समावेश आहे ‘कोणीही’ वादळ ‘,’ भटक्या ‘,’ जंजीर ‘, त्यांचा ‘नौकर बीवी का’ थी हा चित्रपट होता.

      July 25, 2019


  • नाना पाटील (क्रांतिसिंह)

    जन्म- ३ ऑगस्ट, १९००
    मृत्यू- १९७६

    क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

    महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
    नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला.

    लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

    १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

    ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

    या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

    १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.

    यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी गांधी -विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

    स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे १९७६ मध्ये निधन झाले.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      December 15, 2010


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर

    लीना चंदावरकर यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५० रोजी धारवाड येथे झाला. सुरुवातीला जाहिरातीत काम केल्यावर मा. सुनील दत्त यांनी लीना चंदावरकर यांना पहिला ब्रेक दिला. तो चित्रपट होता मन की मित, १९६९ ते १९७९ या काळात त्यांनी अनेक चित्रपटात कामे केली. पण मेहबुब की मेहंदी या चित्रपटाने त्यांना नाव कमावून दिले. सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसांतच बांदोडकर यांचे निधन झाले.

    किशोर कुमार यांच्याशी १९७९ मध्ये भेट झाली. तू उत्तम कलावंत आहेस, अभिनय सुरू ठेव, असं सांगितलं. त्या वाक्यानेच त्यांना एकत्र आणलं. त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. मा. लीना चंदावरकर किशोर कुमार यांच्याबाबत म्हणतात, किशोर कुमार नावाचं व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं… आणि जीवनच बदलून गेलं… अवघा साडेसात वर्षांचा सहवास मला लाभला… मिळविलेला आनंद खूप काळ टिकत नाही, पण गमाविलेली गोष्ट आयुष्यभर आठवत राहते, असं माझ्या आयुष्यात झालं… प्रचंड हुशार, समोरच्याला आनंदी ठेवण्याची जबरदस्त ताकद आणि माणुसकी ही त्यांची वैशिष्ट्ये… त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच मी गाणी लिहू शकले.

    लीना चंदावरकर यांचे गाजलेले चित्रपट ‘हमजोली’, ‘मैं सुंदर हूं’, रखवाला’, ‘मनचली’, ‘हनीमून’, ‘बिदाई’, ‘कैद’. आपल्या समूहातर्फे लीना चंदावरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    https://www.youtube.com/watch?v=DOTO3pyU3ms
    लीना चंदावरकर यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=v3oJtE-sb5U
    https://www.youtube.com/watch?v=ria04eZ-q20
    https://www.youtube.com/watch?v=q7NgDq4Pm8w&list=PLXCoHsJ9oLedJWvUtNcPhocMHEvHnMKtu

      August 29, 2017


  • प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर

    केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली.

      July 13, 2017


  • यशवंत त्र्यंबक वैद्य

    भारतीय शास्त्रीय संगीत गायन परंपरेतील एक अग्रगण्य नाव. श्रीयुत यशवंत वैद्य यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी झाला. १९५३ ते १९६० दरम्यान त्यांचे गुरु कै. भास्करबुवा फाटक यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. १९७२ साली गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली.

      March 28, 2013


  • माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

    इंग्रजांच्या जोखडातून भारताची मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. अनेक चळवळीतील त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.

      July 13, 2025


  • जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर

    उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले. मा.१९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला .

    तीथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले.

    १९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली.

    जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले. न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ' संगीत नाटक अकादमी ' चा पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका ,रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.
    त्यांना दोन अपत्य ,आनंदशंकर व ममताशंकर.

    आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला.

    सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले.

    बहुदा ती पहिली भारतीय, हॉलीवुड चित्रपटात काम करणारी कलाकार असावी.

    उदयशंकर यांच्या कलेने भारतीय न्रुत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 5, 2017


  • वाणी जयराम

    वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. वाणी जयराम यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये 'गुड्डी' चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा.

    वाणी जयराम यांनी गायलेल्या "बोल रे पपीहरा" या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली 'मीरा' या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात.

    ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे.

    ‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते.

    ‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट. https://www.youtube.com/watch?v=SPAjRbHvobs https://www.youtube.com/watch?v=NbchuCfqBls

      November 24, 2019


  • चार्ली चॅप्लिन

    चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं.

    चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.

    पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’ आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू!

    चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 8, 2017


  • थोर देशभक्त, नामवंत नाटककार वामनराव जोशी

    त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षक अशी बहुविधता होती. म्हणूनच नाना क्षेत्रातील नाना प्रकारचे लोक त्यांच्या भोवती असायचे. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. राजकारणाच्या रणधुमाळीत ते अहर्निश उभे होते. त्यामुळे ललित लेखनासाठी फारशी फुरसत त्यांना मिळत नव्हती. तरीही वृत्तपत्रलेखन आणि नाट्यलेखन या दोन्हीमध्ये त्यांचा नावलौकिक मोठा होता. १९१२ साली त्यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बलवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३०च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 21, 2017