नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.
December 25, 2024
तुम्हाला कितीही मित्र असले तरी प्रत्येक क्षणी त्यांची सोबत असतेच असे नाही. विशेषतः तुम्ही एकटे असल्यावर आणि त्याच वेळेला एखादे अवघड काम तुम्हाला करावयाचे असेल किंवा एखादी अवघड जबाबदारी पार पाडायची असेल तर अशा वेळी तुम्हाला सोबतीची गरज नक्कीच भासते. अशा स्थितीत तुम्ही कोणालाही 'सोबती' करू शकता ज्याच्यामुळे तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडू शकते. शहरात राहणार्या सदानंदला आई खूप आजारी असल्याचा निरोप आला. त्यामुळे तो लगेच गावी निघाला. कशीबशी एसटी मिळवून तो गावाजवळच्या फाट्यावर उतरला. तोवर सायंकाळ उलटून चांगलाच अंधार पडला होता. त्याचे गाव चार-पाच किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे फाट्यावर थांबून गावाकडे जायला कोणते वाहन मिळते का, याचा त्याने अंदाज घेतला. मात्र त्याला कोणतेही वाहन मिळाले नाही. आई आजारी असल्यामुळे घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. लवकर पोहचावे म्हणून सुरुवातीपासूनच त्याने वेग वाढविला होता. मात्र रस्ता खराब होता. वेडीवाकडी वळणे आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता पाहून त्याला प्रारंभी राग आला. आपण कधी सुधारणार, असा प्रश्र त्याच्या मनात आला. आता तर तो रड्यालाच दोष देत पुढे निघाला. त्यामुळे साहजिकच त्याची चाल मंदावली. एकटाच असल्यामुळे रस्ता त्याला खायला उठला होता. सवयीचा असूनही तो कधी एकदा संपतो असे त्याला झाले होते. मात्र रस्ता संपता संपत नव्हता. थोड्या वेळाने त्याच्या मनातील विचार बदलले. लहानपणचे दिवस त्याला आठवले. शेजारच्या गावी शाळेत जाताना याच रस्त्यावरून आपण जायचो. त्यावेळी मित्रांबरोबर केलेल्या गमतीजमती त्याला आठवल्या. तो रस्ता त्याला एकदम जवळचा वाटू लागला. त्या रड्याशी आधी असणार्या मैत्रीचा साक्षात्कार त्याला झाला होता. त्यामुळे त्याने आता त्या रस्त्यालाच 'सोबती' केले होते. आता तो आनंदाने गावाकडे जात होता. त्यामुळे त्याचा चालण्याचा वेगही वाढला होता. रस्ताची ' सोबत' करीत करीत सदानंद केव्हा गावात आला हे त्याचे त्यालाच कळले नाही आणि घरी आल्यानंतर तर त्याला पाहून त्याच्या आईचा आजार कधी बरा झाला हेही अनेकांना कळले नाही.
March 7, 2017
हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.
January 28, 2022
डॉ. कर्णिक, साठीच्या आसपास वय असलेले, नावाजलेले गायनीक होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्भवती महिलांची गर्दी असायची. आजचा दिवसहि त्याला अपवाद नव्हता. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शेवटचा पेशंट तपासला कि, मॅटर्निटी वॉर्डातून राऊंड आणि मग ते या कामाच्या रगाड्यातून मोकळे होणार होते.
December 5, 2020

आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते.
September 29, 2019
‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’
नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर मारून आणायचा. तेवढाच त्यांना विरंगुळा. बाकी सर्व बेडवरच होते. बाबू नावाचा माणूस खास सेवेसाठी ठेवलेला होता. सकाळी सात ते संध्याकाळी सात तो सेवा द्यायचा.
July 8, 2024
संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.
May 1, 2022
(गढवाली लोककथा)
वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!
November 15, 2025
एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.
October 22, 2025

निवडणूक जवळ आलीय. निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, एक वातावरण तयार करतेच. प्रत्येक निवडणुकीची आपली अशी खास वैशिष्ट्य असतात. लोकसभेच्या निवडणुकीचा पसारा खूप मोठा असतो. विशेषतः उमेदवाराच्या दृष्टीकोनांतून हा पसारा मोठा असतो. जेवढी मोठी निवडणूक तितका उमेदवाराचा खर्च जास्त.
March 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti