(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कोडं

    काळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय…

      February 4, 2026


  • उगाच काहीतरी -३०

    चहा, कॉफी आणि आम्ही
    चहा हे आम्हा पती पत्नीचा वीक पॉईंट आहे. आमचे गुण जर जुळवले असतील तर इतर ३६ गुण जुळो न जुळो चहा नावाचा सदतिसावा गुण नक्की जुळला असणार. ती शिक्षिका आणि मी इंजिनियर या मुळे बहुतेक तो नैसर्गिकरित्या आला असेल. चहाला नाही म्हणायचं नसतं हा आमचा पासवर्ड. मी कधी कधी मॅनेज करून घेतो पण हिला तुम्ही रात्री २-३ वाजता झोपेतून उठवून सहज जरी विचारलं -चहा घेणार का? ती हो म्हणेल आणि झोपून जाईल…. आणि मग पंधरा मिनिटांनी डोळे न उघडता विचारेल ” चहा झाला का?” आणि मग अलार्म जसा वाजतो तशी ती दर पंधरा मिनिटाने विचारत राहील – “चहा झाला का ?” तोपर्यंत जो पर्यंत तुम्ही तिला चहा बनवून देत नाहीत. आणि मग तो घेऊन ती पुन्हा तेवढीच गाढ झोपून जाईल. आम्हाला आपला साधा चहा आवडतो. बाहेर गेलो तरी तो स्वर्गीय आनंद देणारे अमृततुल्य वगैरे चहा जास्त चालत नाहीत. आपण पृथ्वीवर आहोत ना, मग साधा चहा सारखा चहा हवा. साधा टपरीवरचा चहा.

      December 17, 2022


  • खारीचा वाटा

    मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा“ आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा“ हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ??

      February 4, 2026


  • बाई आली पणात

    सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती.

      June 11, 2022


  • शेतातील धन

    एक शेतकरी होता. तो फारच गरीब परंतु मनाने फार सज्जन होता. दररोज शेतीत राबणे व काम करताना हरिनाम घेणे हेच त्याने आपले मुख्य काम मानले होते. त्याला तशी फार मोठी शेती नव्हती परंतु शेतीचे उत्पन्न जेवढे येईल त्यात तो समाधानी होता. त्याला एकूण चार मुले होती. परंतु ती सर्वच कामचुकार व आळशी होती. त्याची शेतकर्‍याला चिंता होती.

    एके दिवशी शेतकरी आजारी पडला व त्याचा आजार वाढतच गेला. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले. त्या वर्षी पीक फार आले नाही. शेवटी आता आपण यातून वाचणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने चारही मुलांना जवळ बोलावले व अस्पष्ट आवाजात आपल्या शेतात धन आहे असे सांगून प्राण सोडला. शेतात गुप्त धन असल्याचे चारही मुलांना कळल्यानंतर ती चारही मुले शेतावर गेली व त्यांनी
    सगळीकडून शेत उकरायला सुरुवात केली. परंतु त्यांना कोठेही धन सापडले नाही. त्यामुळे सर्वजण हताश झाले. मात्र शेत उकरून झाले होते. त्यामुळे त्यात निदान बी तरी टाकावे, असा विचार थोरल्या मुलाच्या मनात आला व त्याने ती कल्पना आपल्या इतर तीन भावांना सांगितली. त्यांनाही ती पटली. त्याप्रमाणे चौघा भावांनी एकत्र येऊन ज्वारीची पेरणी केली. त्या वर्षी वेळेवर पाऊस आला त्यामुळे बी
    शेतात चांगले रुजले व ज्वारीचे पीक येऊ लागले. त्यानंतर पुन्हा चौघांनी आता पीक आलेच आहे तर त्याची योग्य निगरानी करण्याचे ठरविले. पिकाला योग्य वेळी खत पाणी देऊन त्यांनी शेतीची मशागत केली. त्यामुळे शेतात ज्वारीची कणसे डोलू लागली. गावातील जो तो पीक चांगले आले म्हणून शेतकर्यांच्या मुलांचे कोतुक करू लागला. चौघा मुलांनी योग्य वेळी ज्वारीची कणसे खुडली. त्यातून दहा-बारा पोती ज्वारीचे उत्पन्न झाले. ती ज्वारी विकून चौघाही मुलांना भरपूर पैसे मिळाले. पैसे हातात पडल्यानंतर चौघांनाही विलक्षण आनंद झाला व आपल्या वडिलांनी शेतात ठेवलेले गुप्तधन हेच होते, अशी त्यांची धारणा झाली.

    त्यानंतर चौघांनी मिळून भरपूर मेहनत करून दरवर्षी आपल्या शेतातून असेच धन गोळा करण्याचा निश्चय केला.

      December 29, 2017


  • प्रॉपर्टीचे कागद.. (तो आणि ती)

    गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले.

      July 7, 2021


  • अजब न्याय नियतीचा – भाग १३

    दी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती.

      September 28, 2019


  • निश्चय’ (कथा)

    “छ्या! बाबांनी नुसता वैताग आणलाय. किती सारखं हे केलंस का? ते घेतलंस का? बॅग जागेवर ठेव. मला डॉक्टर कडे घेऊन चल. माझी औषधं आण वगैरे वगैरे…

      November 11, 2022


  • पिंपळ

    १) कुलकर्ण्यांचा प्रशस्त वाडा. पंधरा वर्षांची कुमुद आजीला शोधत बागेत आली . आजी नेहमीप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली शांत बसली होती. कुमुदला माहीत होतं. आजी औदुंबराच्या झाडाकडेच असणार. आजोबा गेल्याचं दुःख ती पचवू शकत नव्हती. हा औदुंबर आजोबांना प्रिय होता. कुमुदला आजीची अवस्था पहावत नव्हती. तिला पूर्वीसारखी हसीमजाक करणारी हरहुन्नरी आजी हवी होती. कुमुद आजीला म्हणाली, “ आजी ग घरांत चल. आजोबा म्हणायचे, दिवेलागणीला असं घराबाहेर राहू नये. ” आजी म्हणाली, ” तेच तर .. आता काही म्हणायला ते आहेत कुठे ? हसत खेळत हार्टॲटॅकने निघून गेले.

      January 15, 2024


  • ओडीसा राज्यातून इटालीयन पर्यटकाचे अपहरण (कथा ७)

    ‘तुम्हाला ताज महाल पेक्षा दुसरा भारत अनुभवायचा असेल,तर आदिवासी वस्ती पर्यंत पोहचा,जे अजूनही धनुष्यबाण व इतर प्राचीन आयुधे वापरतात, फोटो काढण्यांसं तयार होत नाहीत.घनदाट जंगलात जंगली श्वापदा बरोबर मुकाबला करतात,हे पाहण्यासाठी भरपूर पायी प्रवास करावा लागेल,प्रवास सुरक्षित असेल याची हमी,तर जरूर या भेटीला ओडीसा राज्यात.

      February 20, 2022