महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
बटाटे उकडून घ्या. ते कुस्करून घ्या, ताजा कुटलेला गरम मसाला, चवीप्रमाणे आलं, लसूण, मिरची यांचे एकजीव मिश्रण करा. हे मिश्रण कुस्करलेल्या बटाटयांत चांगले मिसळा. एक चवदार व एकजीव मिश्रण तयार होईल याची काळजी घ्या. वेगवेगळया आकाराचे पॅटिसचे साचे बाजारात मिळतात. शंकरपाळी, बदाम यासारखा आकार या मिश्रणाला द्या. पॅटिसचा साचा नसेल तर घरी देखील आपण निरनिराळे आकार देऊ शकतो. मिश्रणाला आकार दिल्यावर सुक्या पावाचा कुस्करा करा. त्यात थोडा रवा देखील मिसळला तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे रव्याचाच लेप कच्च्या पॅटिसला बाहेरून द्या.
March 7, 2017
फ्रेंच फ्राईज – Recipe
September 11, 2026
बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू म्हणजे मेजवानीच.
March 2, 2012
साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूङ
कृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा यांचे पातळ पातळ तुकडे करा. ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येते. आता त्यावर काकडीचे तुकडे ठेवा व अगदी थोडे मीठ वरून घाला. नंतर टोमॅटोचे तुकडे ठेवा व त्यावर बटाटयाच्या चकत्या ठेवा पुन्हा अगदी थोडे मीठ वरून टाका आणि मिरपूडही टाका, त्यावर दूसरा ब्रेडच्या स्लाइस घालून दोन्ही हातात मिळून ते जरा दाबा. सुरीने सॅडविचचे एकसारखे दोन किंवा दोन त्रिकोण होतील अशारितीने तुकडे करा. याच पध्दतीने चारी सॅडविच तयार करा. खायला घेताना बरोबर टोमॅटो साँस घ्या.
August 3, 2018
साहित्य:-
चण्याची डाळ, दोन ते तीन लवंगा, एक तुकडा दालचिनी, एक मसाला वेलदोडा, तीन हिरव्या मिरच्या, मीठ, चिरलेला पालक किंवा मेथी, आले-लसूण पेस्ट, तेल.
कृती:-
चण्याची डाळ पुरणासाठी शिजवतात तशी शिजवून घ्या. शिजवताना त्यात सर्व मसाला घाला. शिजल्यानंतर मसाला काढून टाका. त्यात चिरलेला पालक किंवा मेथी घाला व पुन्हा शिजवा. कोरडे झाल्यावर वाटून घ्या. त्यात मीठ, आले-लसूण पेस्ट घाला. तयार सारण कणकेच्या पारीमध्ये भरून पराठे लाटून घ्या व तेलावर भाजून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 11, 2017
साहित्य : कणिक, दूध, साखर, वेलची पूड, केशर, बदाम, पिस्त्याचे काप
कृती : कणिक थोडे दूध घालून घट्ट भिजवावी. नंतर त्याला थोडा तूपाचा हात लावावा. एका ताटलीत थोडी कणिक भूरभूरावी व त्यावर बोटवी वळावी. थोडी थोडी कणिक घेऊन त्याची बारीक मोटवी वळावी. ती पंख्यावर वाळवून घ्यावी व तव्यावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. दूध थोडे आढळून घ्यावे व त्यांत बोटवी घालून चांगले उकळवावे नंतर त्यांत केशर वेलची पूड, बदाम पिस्त्याचे काप टाकावे. जशी गोड हवी असेल त्या प्रमाणांत साखर घालावी व गरम गरम खायला द्यावी.
-सौ. कामाक्षी कमलेश पालकर
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत. नंतर सोलून पातळसर काप करावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी.
June 7, 2017
साहित्य: ४-५ गाजरे.
१ लहान कांदा, ३ टे.स्पून तांदूळ, ५-६ कप पाणी, १ टे. स्पून बटर, वेळ: २० मिनिटे २ स्लाईस ब्रेडचे तुकडे चौकोनी करून तुपात तळलेले, मीठ, साखर चवीपुरते.
कृती: गाजर सोलून पातळ चिरून घ्यावे. कांदा बारीक चिरावा. थोडे बटर पातेल्यात घेऊन त्यावर कांदा व गाजर परतावे. त्यातच तांदूळ घालून पाणी ओतावे. साखर, मीठ घालून झाकण ठेवावे. सर्व नीट शिजवावे. गार झाल्यावर त्यातील थोड्या गाजराच्या चकत्या काढून ठेवाव्यात. नंतर सर्व मिक्सरवर फिरवून एकजीव करून घ्यावे आणि मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण गॅसवर ठेऊन एक उकळी आणावी. हे गरम सूप वाढताना त्यावर उरलेले बटर घालावे आणि वरून तळलेले ब्रेडचे तुकडे व गाजराच्या चकत्या घालाव्यात.
September 10, 2026
सर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी चटणीवर घालावी.
November 7, 2016
बटाटे किसून पाण्यात घाला. पाणी निथळून त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घाला. ब्रेडच्या कडा कापून टाका. प्रत्येक ब्रेडचा तुकडा एक-दोन सेकंद पाण्यात भिजवा व लगेच काढून त्यातील पाणी दाबून काढा.
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti