महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य :
सारण- १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, मीठ, साखर.
कव्हरसाठीचे साहित्य - २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, थोडेसे मीठ.
कृती :
रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.
पदार्थ : गाजर १, फ्लॉवर चिरलेला अर्धा (छोट्या आकाराचा), श्रावण घेवडा ६ शेंगा, टोफू अर्धा कप, उकडलेला बटाटा १, लेमन ग्रास ४ इंच, उस अर्धा, कॉर्नफ्लोअर १ टेबलस्पून, आले १ टिस्पून, लसूण १ टिस्पून, कढीपत्ता २ पाने, कांदापात १ स्प्रिंग, मीठ आणि मिरपूड चवीपुरते, तेल परतण्यासाठी, हानी चिली सॉस
कृती :- ऊस सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करून पीठ मळावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. त्यामध्ये उसाचे काप घालावेत. हे लॉलिपॉप तेलावर खरपूस तळून घ्यावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.
साहित्य: एक वाटी टोफूचे तुकडे, १/२ वाटी बारीक चिरलेली मेथीची पानं, एक चमचा आलं-लसूण मिरची ठेचा, चवीला मीठ, एक चमचा तेल, कणीक.
कृती: टोफू, मेथी, ठेचा, मीठ, तेल एकत्र करून कुस्करावं, मावेल तितकी कणीक मिसळून पराठे करावे. वाटल्यास पराठे भाजताना तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडावं.
* मेथीऐवजी पालक किंवा माठाची पानं वापरता येतील.
* आलं-लसणीऐवजी थोडा कच्छी दाबेली मसाला आणि मीठ घातलं तरी चालेल.
* टोफूतच मावेल तेवढी कणीक भिजवून साध्या पोळ्या किंवा पुऱ्या कराव्या. चव किंवा पोत बदलत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हे लाडू श्रावण सोमवारी, नैवेद्याला गणपतीला, गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला मुद्दाम करतात.
कृती- १ वाटी तूप, १ वाटी पीठीसाखर आणि १ वाटी कणीक कपडय़ात सैल पुरचुंडी बांधून चाळणीवर ठेवून, दहा मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर पुरचुंडी सोडून आतला गोळा कणकेच्या हातांनी चुरडून घ्यावा. खसखशीत पीठ होईल त्यात तूप, पिठीसाखर, १ चमचा खसखस भाजून घालावी. त्यात लाडू वळावे.
शोभना माने, सी.बी.डी., बेलापूर.
काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार.
गरम पाण्यात तांदळाचे पीठ, तूप आणि मीठ घाला. मळून त्याचे गोळे करून घ्या. इडियप्पम पात्रात किंवा शेवपात्रातून ते केळीच्या पानावर कुरडय़ांसारखे घाला. हलक्या हाताने उचलून इडली पात्रात ठेवा
साहित्य :- धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम.
कृती :- खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’
साहित्य:- दोन वाट्या बासमती वा दिल्ली राइस, एक वाटी ते दीड वाटी मटार, पाव वाटी काजू, धने - जिरे पूड, लाल तिखट पाव चमचा हळद, तेल, मीठ, फोडणीचे साहित्य तूप, खोबरे - कोथिंबीर, कढीलिंब, एक चमचा साखर वा गूळ.
कृती:- प्रथम कढईत वा पातेल्यात तेल घालावे. दिल्ली राइस स्वच्छ धुऊन अर्धा तास निथळत ठेवावा. तेलात मोहरी - जिरे - हिंग - हळद घालावी व त्यावर तांदूळ व मटार घालून ४-५ मिनिटे घालून परतून घ्यावे. कढीपत्ता, काजू, तिखट पाव चमचा, धने जिरे पूड १-१चमचा मीठ साखर घालून तांदूळ चांगला परतावा. अंदाजे ५ वाट्या पाणी उकळवून ते तांदळावर घालावे. भात मसालेदार हवा असल्यास 1 चमचा गोडा मसाला घालावा व मंद गॅसवर ढवळून झाकण घालून भात शिजवावा. १-२ चमचे तूप वरतून सोडावे. भात वाढल्यावर वर कोथिंबीर व खोबरे घालून वाढावा. भात मऊ आवडत असल्यास आंबेमोहोर वापरावा. टोमॅटोचे सार वा कढीबरोबर हा भात छान लागतो. आवडत असल्यास जिरे व कोरडे खोबरे भाजून व मिक्सऊरमध्ये बारीक करून तेही मसाले भातात घालावे. अंदाजे एक ते दीड चमचा, त्यामुळे भाताला खमंगपणा येतो. याच पद्धतीने आपल्या आवडीची भाजी घालून मसालेभात करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti