महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:
पाव ४
कांदा १ बारीक चिरलेला
शिमला मिरची १ बारीक चिरलेली
टोमॅटो १ बारीक चिरलेला
आले लसूण पेस्ट १ चमचा
लाल तिखट १/२ चमचा
पावभाजी मसाला ३ चमचे
अमूल बटर ५ चमचे
मेयाँनिस २ चमचे (आवडीनुसार)
मिठ चवीनुसार
कृतीः
खोलगट तव्यावर १ चमचा अमूल बटर गरम करून आल लसूण पेस्ट परतून घ्या मग चिरलेला कांदा घालून परतून घ्या मग त्यात शिमला मिरची टोमॅटो घालून परतावे पावभाजी मसाला लाल तिखट घाला चवीनुसार मिठ घाला व परतून घ्या हलकेच स्मँश करा तयार सारण बाजूला काढून ठेवा.
मग त्याच तव्यावर १ चमचा अमूल बटर गरम करून पाव मधे चिरून भाजा पावाच्या मधे आवश्यक सारण भरून पाव बंद करून दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या मग पावाच्या ३ उघडया बाजूला मेयाँनीस लावा बाकी सर्व पाव असेच भाजून घ्या आणी गरम सर्व करा.
साहित्य: ३ दळदार टोमॅटो, १ अगदी लहानसा कांदा किंवा कांद्याच्या ३ मोठ्या फोडी, २ लहान लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे, लहान पाव कप दूध, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर.
कृती: टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी दाणे एकत्र करून कुकरला अगदी मऊ शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरला वाटून, गाळून घ्या. उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि दूध, साखर घालून मंद गॅसवर उकळा.
साहित्य : १ मोठे लिंबू, पाच चहाचे चमचे भरून साखर, अर्धा चहाचा चमचा मीठ, चिमूटभर जिरे पावडर, दोन ग्लासभर थंड पाणी, बर्फाचे ४-५ तुकडे.
कृती : लिंबू हाताने स्वयंपाकाच्या ओट्यावर गोलगोल फिरवून हाताने दाबून मऊ करावे म्हणजे त्याचा रस काढणे सोपे जाते. मग सुरीने त्याचे दोन तुकडे करून एका स्टीलच्या पातेल्यात फोडींचा रस पिळावा. त्यातील बिया काढून टाकाव्यात, त्यात साखर, मीठ व जिरेपूड घालून आधी थोडेसे पाणी घालून ते ढवळावे साखर विरघळेपर्यंत हलवावे, ग्लासात ओतावे आणि वर बर्फाचे खडे टाकून हे सरबत द्यावे.
साहित्य:- दोन वाट्या बासमती वा दिल्ली राइस, एक वाटी ते दीड वाटी मटार, पाव वाटी काजू, धने - जिरे पूड, लाल तिखट पाव चमचा हळद, तेल, मीठ, फोडणीचे साहित्य तूप, खोबरे - कोथिंबीर, कढीलिंब, एक चमचा साखर वा गूळ.
कृती:- प्रथम कढईत वा पातेल्यात तेल घालावे. दिल्ली राइस स्वच्छ धुऊन अर्धा तास निथळत ठेवावा. तेलात मोहरी - जिरे - हिंग - हळद घालावी व त्यावर तांदूळ व मटार घालून ४-५ मिनिटे घालून परतून घ्यावे. कढीपत्ता, काजू, तिखट पाव चमचा, धने जिरे पूड १-१चमचा मीठ साखर घालून तांदूळ चांगला परतावा. अंदाजे ५ वाट्या पाणी उकळवून ते तांदळावर घालावे. भात मसालेदार हवा असल्यास 1 चमचा गोडा मसाला घालावा व मंद गॅसवर ढवळून झाकण घालून भात शिजवावा. १-२ चमचे तूप वरतून सोडावे. भात वाढल्यावर वर कोथिंबीर व खोबरे घालून वाढावा. भात मऊ आवडत असल्यास आंबेमोहोर वापरावा. टोमॅटोचे सार वा कढीबरोबर हा भात छान लागतो. आवडत असल्यास जिरे व कोरडे खोबरे भाजून व मिक्सऊरमध्ये बारीक करून तेही मसाले भातात घालावे. अंदाजे एक ते दीड चमचा, त्यामुळे भाताला खमंगपणा येतो. याच पद्धतीने आपल्या आवडीची भाजी घालून मसालेभात करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चकोल्या खेडेगावातील आषाढ-श्रावणातील खास पदार्थ. पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत. हवा थंड. त्याकरिता एक खमंग पदार्थ. उपास सोडण्याकरितासुद्धा हा पदार्थ करतात.
साहित्य- १ वाटी शिजवलेली तुरीची डाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, चिंच, गूळ, जिरे, व सुके खोबरे भाजून कुटलेले, ओवा, २ वाटय़ा कणीक, तेल इ.
कृती- प्रथम पातेल्यात तेलाची हिंग, मोहरी, मेथी घालून खमंग फोडणी करणे. त्यात शिजवलेली तुरीची डाळ घालून पाणी घालणे. नंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, जिरे, खोबरं घालून पातळ आमटी करणे.
नंतर कणकेत तिखट, मीठ, ओवा, हळद, गोडा मसाला, तीळ २ चमचे मोहन घालून घट्ट कणीक भिजवणे. ते मळून त्याच्या पोळ्या लाटणे, त्याचे शंकरपाळे कापणे. आता आमटी ठेवलेला गॅस मंद ठेवून त्यात ते शंकरपाळे घालणे मधूनमधून हलक्या हाताने हालवणे, चांगल्या शिजल्या की गॅस बंद करणे. (साधारण घट्टच करणे) खायला देताना त्यावर साजूक तूप, बाजूला लसूण चटणी, कांदा उभा चिरलेला व भाजलेल्या भातवडय़ाबरोबर देणे.
- सुमन सांबारे, दादर, मुंबई.
साहित्य :- पाव पेला तांदळाचे पीठ, अर्धा पेला बेसन, 1 कच्चे वाफवलेले केळे, 2 चमचे आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ, तेल.
कृती :- तांदळाचे पीठ, बेसन व सोडा एकत्र चाळणीने चाळून घ्या. त्यात उकडलेले केळे सोलून मिसळा. आले-लसूण-मिरची पेस्ट, मीठ व एक चमचा तेल टाकून मिसळा. कढईत तेल गरम करा. शेव गाळण्याच्या यंत्राने बारीक शेव पाडून तळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
एका छोट्या ट्रे वर गरम (निमुळती) लाकडी प्लेट ठेवण्यात येते. लाकडी प्लेट गडद चॉकलेटी रंगाची असल्याने त्यावर टाकण्यात आलेली चॉकलेट ब्राऊनी मिळून प्लेट अत्यंत आकर्षक दिसते. चॉकलेट ब्राऊनीवर उकळतं चॉकलेट सॉस सोडण्यात येतं. चॉकलेट सॉस व ब्राऊनी मिळून लाकडाची प्लेट भरून जाते.
सीकेपी कुटुंबांमध्ये अगदी नियमितपणे.. कोणत्याही खास प्रसंगी केला जाणारा प्रकार म्हणजे वालाचं बिरडं…
सुरण चिरून बाजूला ठेवावा. पातेलीत तेलावर लाल मिरच्यांचे तुकडे, काळी मिरी पावडर, उडदाची डाळ आणि ओले खोबरे टाकून परतावे. गार झाल्यावर मिक्सरवर वाटावे. सुरणाच्या फोडी हळद व थोडे पाणी घालून शिजवाव्यात. फोडी शिजल्या की वाटण मिक्स करावे. चांगले ढवळावे व एक उकळी आणावी. बारक्या कढईत मोहरीची फोडणी करून ती या भाजीवर वरून घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी.
Copyright © 2025 | Marathisrushti