महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य -
एक वाटी खसखस, १५ ते १६ खारका, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, २० बदाम, ५० ग्रॅम अक्रोडाचा चुरा, एक वाटी सायीसकट दूध, दोन वाट्या साखर, थोडी पिठीसाखर, चंदेरी गोळ्या व तूप.
कृती -
खसखस, खारका व बदाम वेगवेगळ्या भिजत घालावे. साधारण तीन तासांनी खसखस गाळण्यावर ओतून पाणी निथळावे. खारकेतील बिया काढून तुकडे करावे. बदामाची साले काढून तुकडे करावे. नंतर खसखस व थोडे दूध एकत्र करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटून घ्यावे. खारका व बदामाचे तुकडे थोडे दूध घालून वेगवेगळे वाटून घ्यावे. अक्रोडाचा चुरा व खोबरे कीस मिक्सरवर वाटून घ्यावा.नंतर पिठी साखर व चंदेरी गोळ्याखेरीज इतर सर्व एकत्र करून गॅसवर ठेवावे. सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यावर कडेने थोडे तूप सोडावे व गॅसवरून उतरवावे. जरुरीप्रमाणे थोडी पिठी साखर घालावी.
छोट्या मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवून त्यात वरील मिश्रण थोडे थोडे घालून मोदक करावे. प्रत्येक मोदकावर एकेक चंदेरी गोळी लावावी.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
छायाचित्र : इंटरनेटवरुन
ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं केवळ पाणीच नाही तर इतरही गोष्टी लाभदायक असतात. कोवळ्या अवस्थेत असताना नारळ ताजा आणि हिरवा असतो. सामान्यत: या फळामध्ये ९० टक्के पाणीच असतं. ताज्या, हिरव्या नारळाचं पाणी पोषक असतंच, पण त्याहीपेक्षा पोषक असते ती मलईच! नारळाची मलईही परिपक्व होत जाते. पण पूर्णावस्थेला पोहोचलेल्या नारळातल्या मलईपेक्षा ताज्या, हिरव्या नारळातल्या मलईत जास्त गुणधर्म असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत भरपूर खनिजं असतात, पण फॅटस्, शर्करा आणि कोलेस्टेरॉल अत्यंत कमी असतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या ११ औन्स मलईत केवळ ६५ कॅलरीज असतात. पण त्याहीपेक्षा त्यात पोषक घटकच अधिक असतात. एका ताज्या, हिरव्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. हे खनिज रक्त साकळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं, जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत आणखी एक महत्त्वाचं खनिज असतं, ते म्हणजे मॅग्नेशिअम. हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी तसेच मूत्रिपडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. नारळाच्या घट्ट खोबऱ्यापेक्षा मऊ असणारी मलई खायला अत्यंत सोपी असते. त्यामुळे ती पोषणाचा उत्तम स्रोत ठरते. रोगप्रतिकार यंत्रणा तसेच प्रदाहक घटकांना अवरोध करणाऱ्या घटकांना अधिक सक्षम बनवण्यात ही मलई कामी येते. मलईतून निघणाऱ्या तेलामध्येही भरपूर पोषक घटक असतात, जे केसांच्या पोषणासाठी उपयुक्त असतात. ताज्या, हिरव्या नारळाल्या मलईचे गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्याच्याही पलीकडे जाणारे आहेत. हे तेल अत्यंत शुद्ध आणि हलकं असतं. त्यामुळे या तेलातून आजच्या जगतातल्या केसांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादनं बनवता येतात. हा कोवळा नारळ अत्यंत श्रमहारक आहे. शहाळ्यातील पाणी हे स्वादिष्ट, क्षारयुक्त व पचण्यास हलके असते. त्यामुळे आजारी व्यक्तीला पोटावर ताण न येता, त्वरित तरतरी देण्याचा हा एक सोपा उपाय आहे. शहाळ्याचे पाणी जुलाब, उलटी, उच्चरक्तदाब, ऍसिडिटी, अल्सर, पायात गोळे येणे, लघवीला कमी होणे, मुतखडा अशा सर्व तक्रारींवर उपयोगी ठरते. उन्हात कष्टाची कामे करणारे, नर्तक, क्रीडापटू या सर्वांना इन्स्टंट एनर्जी देणारे हे फळ आहे. १०० मिली.शहाळ्यातील पाण्यात निव्वळ २४ उष्मांक असतात व ०.१ ग्रॅम फॅट्स असतात. शहाळ्यातील मलईमध्येही १०० ग्रॅम मागे फक्त ४१ उष्मांक आणि १.४ ग्रॅम फॅट्स असतात. चहा, कॉफी, सिगारेट, दारू यांच्या व्यसनांनी बिघडलेला रक्ताचा पी.एच. नारळाच्या पाण्याने पूर्ववत आणता येतो. केसांच्या देखभालीसाठीची उत्पादनं विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य तेलांपासून बनवली जातात. त्यांच्यातल्या फॅटी अॅचसिड घटकांमुळे ती एकमेकांपेक्षा वेगळी असतात. काही तेलं सॅच्युरेटड फॅटी अॅकसिड्सनी समृद्ध असतात, पण त्यांच्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅॅसिडस् कमी असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या तेलामध्ये अत्यंत अभिनव आणि संतुलित ट्रायग्लिसराइड रचना असते, जी केसांना पूर्ण पोषण पुरवते. हे तेल हलकं असल्याने ते सहजपणे पसरतं आणि केसांमध्ये लवकर शोषलं जातं. त्यामुळे केसांना आवश्यक ते पोषण मिळतं. त्याचा सौम्य आणि ताजा सुगंध तेल लावण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतो. एकंदरीतच, ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईचं तेल असं एक आधुनिक तेल आहे जे निसर्गत:च हलकं आहे आणि पोषकही आहे.
काही पदार्थ शहाळ्याचे.
लाल भोपळा-शहाळ्याचे तोंडाल
साहित्य. १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, १ वाटी शहाळ्याचे तुकडे, ओले काजू २ वाटी, भिजवलेली चानाडाळ /४ वाटी मटार उभा चिरलेला कांदा बारिक चिरलेला कांदा-२ दालचिनी, २-३ लवंग-२ काळी मिरी टेबलस्पून अख्खे धने टेबलस्पून ओले खोबरे, ३ टेबलस्पून नारळाचे दूध टेबलस्पून हळद टेबलस्पून लाल तिखट टेबलस्पून मोहरी, हिंग, चिमुटभर,मीठ चवीनुसार.
कृती. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, उभे चिरलेले कांदे, धने टाका. कांदा लाल होईपर्यंत भाजा. त्यात ओले खोबरे टाका. एका प्लेटमध्ये हे काढून घ्या. त्यात हळद घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घ्या. भाजी बनविण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, काळी मिरी, कोथिंबीर, कांदा टाका. यात आता हळद, लाल मिरची पावडर, चनाडाळ, पाणी घाला. यात लाल भोपळ्याचे तुकडे आणि वाफवलेले मटार घाला. थोडे पाणी घालून ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर त्यात शहाळ्याचे तुकडे, ओलो काजू, कांदा-खोबऱ्याचे वाटण घाला. थोड्या वेळानंतर यात नारळाचे दूध आणि मीठ घाला. उकळी आली की गॅस बंद करा. गरमागरम शहाळे-भोपळ्याचे तोंडक तयार.
शहाळ्याचे सरबत
साहित्य.एका शहाळ्याचे पाणी, २ बाटल्या सिट्रा, साखर, मीठ, लिंबाचा रस, बर्फाचा चुरा
कृती. शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.
शहाळे आणि काजुची भाजी
साहित्य. ३ कप शहाळयातील कोवळे खोबरे, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, ४ टेबलस्पून तेल, ३ कप पातीचा कांदा बारीक चिरलेला, १ मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, १ टीस्पून
आले-लसूण पेस्ट, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून गरम मसाला पावडर, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, २ टेबलस्पून कोथिंबीर चवीनुसार मीठ.
कृती. शहाळयातील खोब-याच्या दोन इंच लांबीच्या पट्टया (तुकडे) कापून बाजूला ठेवाव्या. काजू पाण्यात भिजत घालावे. एक कढईत तेल गरम करून पातीचा कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवावा.खोब-याच्या पट्टया (तुकडे) व काजू घालून दोन मिनिटे परतावे. आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट व गरम मसाला आणि अर्धा कप पाणी घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. नंतर मीठ व टोमॅटो केचप घालून नीट ढवळावे. कोथिंबीर घालून भाजी सजवावी व गरम गरम खायला द्यावी.
शहाळ्याचे आइस्क्रीम
साहित्य.अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.
कृती. प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी. मिक्स रमधून फिरवावे. नंतर फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.
* फणसाच्या आठळ्या, काजू, शहाळ्याची भाजी*
साहित्य. २ वाट्या फणसाच्या आठळ्या, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, अर्धा कप कोवळे खोबरे पातळ काप करून, १ बारीक चिरलेला कांदा, २ छोटे स्पून गोड घट्ट दही, १ चमचा साय, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, ७-८ कढीपत्ता, २ चमचे तूप, जिरे, हळद
वाटण. २ ते ३ टेबलस्पून मलईचं खोबरं, १ छोटा कांदा उकडून, २-३ लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, १ चमचा लाल तिखट, पाव कप टोमॅटो हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या.
कृती. आठळ्या मीठ घालून उकडून घ्या. त्याची सालं काढून टाकून पातळ काप करा. कोवळ्या नारळाचंही काप करून ठेवा. २ तास काजू पाण्यात भिजवून ठेवा. कढईत २ चमचे साजूक तूप घाला. त्यात जिरं, कढीपत्ता घाला. कांदा परतून घ्या. हळद घाला. आता वाटलेलं वाटण घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात शहाळे काप, आठळ्याचे काप व काजू घाला. थोडं परता. त्यात दही व साय घाला. थोडे परतून त्यात १ वाटी गरम पाणी घाला. मीठ, साखर घाला. २-३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर, खोबरं, काजू घालून सजवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : कुरमुरे, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली), ४ हिरव्या मिरच्या, खारे शेंगदाणे, कैरीचे बारिक तुकडे, फरसाण, बारीक शेव, लिंबाचा रस, चवीपुरते मीठ,बारिक चिरलेला टोमॅटो.
कृती ः कुरमुरे २-४ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे म्हणजे कुरकुरीत राहतील. परतताना चमच्याने ढवळत राहावे म्हणजे कुरमुरे जळणार नाहीत. परतलेले कुरमुरे मोठ्या परातीत काढावे.
कुरमुरे जरा गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
साहित्य:-
१. १२ ते १५ कोलंब्या,
२. दोन चहाचे चमचे आले+ लसूण पेस्ट,
३. एक चहाचा चमचा लाल मिर्चीपूड,
४. अर्धा चहाचा चमचा हळद पूड,
५. मीठ चवीनुसार.
६. दोन पळ्या तेल.
कृती:-
१.तेलात सर्व जिन्नस मिसळून ते कोलंब्याना व्यवस्थित चोळून घ्या.
२. अर्ध्या तासानंतर नॉनस्टिक तवा तापवून,तव्यात पसरून वर झाकण ठेवा.गॅस मंद करा.
३. पाच मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूवर पलटा.आता झाकण काढून शिजूद्या. गॅस मंदच असुद्या. पाणी सुटले असेल. ते आटल्यावर पुन्हा एकदा पलटून दोन मिनिटांनी आच बंद करा.
४. गरमागरम वाफाळता भात आणि कोणतीही आमटी याबसोबत आस्वाद घ्या.
The Chocolate Chip
9869437168
साहित्य : सफरचंद 3 मोठे, दाण्याचा कुट भरड अर्धी वाटी, किसमिस अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर बारीक चिरून
कृती : सफरचंद स्वच्छ धुवून जाडसर किसणीने किसून घेणे. लागलीच लिंबाचा रस घाला म्हणजे काळपट होणार नाही. भाजलेल्या दाण्याची भरड, मीठ आणि किसमिस घालून छान कालवून घ्या. वरून कोथिंबीर घालून सजवा.
काही टिप्स
१. ह्यात बदामाची किंव्हा अक्रोडची भरड सुद्धा छान लागते.
२. किसमिस ऐवजी मनुका पण घालू शकता.
३. करायला झटपट आणि खायला अतिशय पौष्टिक
भेटू परत तोपर्यंत,
स्वस्थ राहा आणि त्यासाठी मस्त मस्त खा.
- सोनाली तेलंग
साहित्य:-४ हिरवट पेरू, २ हिरव्या मिरच्या, काळी मिरी, आलं, भाजलेल्या जिऱ्याची पूड, सैंधव आणि कोथिंबीर.
कृती:- पेरू धुवून कोरडे पुसून घ्या. बियांचा भाग वगळून तुकडे करून घ्या. मिरची, आलं आणि पेरूच्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करा. मग मीठ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा. काळ्या मिरीची पावडर, जिरे पावडर आणि सैंधव मीठ घालून चटणी तयार करा. कोथिंबीर वरून घाला किंवा वाटताना घातली तरी चालेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय.
अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत.
अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही.
त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.
नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते.
एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.
अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे.
जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.
अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.
उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.
उटणे बनविण्याची कृती.
साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मैदा आणि तूप मिसळून घ्या. त्यात पाणी मिसळून मळून घ्या. एका भांडय़ात तूप घाला. ते गरम करा. त्यात खोवलेला नारळ घालून तो चांगला परतून घ्या. तो बाहेर काढून ठेवा आणि त्याच भांडय़ात रवा परतून घ्या. रव्यात साखर, नारळ, वेलदोडे आणि सुका मेवा मिसळा. आता मळलेल्या मैद्याच्या लहान लहान पुऱ्या करून घ्या. त्यात खोबऱ्याचे मिश्रण भरा. त्या करंज्यासारख्या आकार द्या. तळा आणि गरम गरम खायला द्या.
अप्रतिम लोणचं ...... वर्षभर टिकते.....
साहित्य : 1 kg कैरी, 1/2 kg गुळ, 1 वाटी लसूण पाकळी, 3 चमचे मेथी (छोटे), 1 वाटी तिखट (किव्हा आपल्या आवडी नुसार), 1 चमचा हळद (छोटा चमचा), 1/2 चमचा हिंग (खडा हिंग वापरा), 1 वाटी मीठ, 2 छोटे चमचे , तैल
कृती : प्रथम कैरीच्या गुळाचे लोणचे आहे तर गुळ छान पाहिजे......जर आपल्याला खात्री असेल की गुळ छान आहे तर या लोणच्यात गुळ न काहीही करता टाकला तरी चालेल...जर गुळा बद्दल शँका असेल तर गुळा चा पाक करून घ्यावा ... खूप कडक पाक नको अगदी साधा पाक करून घ्या..जर गुळ छान नसेल तर काही दिवसांनी लोणच्याला फेस व वास येऊ शकतो.. म्हणून....पाक करावा..जर गुळा बद्दल खात्री असेल तर तसाच वापरावा ... इती..तर गुळाचा पाक करून ठेवावा ....तसेच कैरी च्या फोडी करून ठेवा.....आवडत असेल तर लसून भरपूर सोलून ठेवा अंदाजे एक मोठी वाटी...(आवडत असेल किव्हा नसेल तरी पण या लोणच्यात एकदा लसूण वापरून पहा...)
लोणच्या साठी जे मीठ घेतले त्याचे तीन भाग करा .....आता एका कढईत 1 चमचे तैल घ्यावे. त्यात 3 चमचे मेथी टाकून लालसर कलर येई पर्यन्त परतवा व मेथी मिक्सर मध्ये टाका व त्यात मिठाचे तीन भाग केले त्या पैकी 1 भाग मीठ टाकून मिक्सर मधून दरदरा काढून ठेवावे...व उरलेल्या तैलात गुळाचा पाक बनवावा...आणि थंड करायला ठेवा....पाक थंड झाल्यावर जरा गुळाचा पाक कडक होईल... तर तसाच लोणच्यात टाकावा....
दुसऱ्या भांड्यात परत 1 चमचा तैल गरम करावे....तैल खूप गरम न करता त्यात आपल्या आवडी नुसार तिखट टाकावे व थोडं अर्धा मिनिट परतवा....मग त्यात हळद, हिंग, व मिठा पैकी 2 रा भाग टाकून छान परतवा...(इथे हा मसाला योग्य रीतीने परतवा ..तिखट वगरे जळू देऊ नका .नाहीतर लोणच्या चा रंग काळपट येईल...तसेच हळद योग्य प्रमाणात टाका ..अति हळद लोणच्या रंग खूप पिवळसर होईल...तर प्रमाण योग्य ठेवा...) हा मसाला थंड करायला ठेवा ....गुळाचा पाक व मसाला थंड झाल्यावर....एका पसरट भांड्यात कैरी च्या फोडी घ्या..त्यात आवडत असेल तर भरपूर ...भरपूर म्हणजे भरपूर लसणाच्या पाकळ्या टाका..(20 ते 25 दिवसांनी म्हणजे लोणचं मुरल्यावर या लसना स्वाद ......हाहाहा..)
आता यात थंड झालेला तिखटाचे मिश्रण टाका...व त्यात गुळाचा पाक टाका...(यावेळी तो पाक कडक झाला राहील ...घाबरू नये) आता तो मिठा चा 3 रा व शेवटचा भाग ..(हे शेवट चे जे मीठ आहे ते सर्व भांड्याना पुसून टाकावे म्हणजे जे आपण लोणच्या साठी भांडे वापरले त्याच तैल वगरे या मिठा ला लागून जाते आणि भांडे पण स्वच्छ ..!) त्या लोणच्याच्या मिश्रणात टाका व छान मिक्स करून ठेवावे... 2 ते 3 तासाने या गुळाच्या लोणच्याला रस्सा सुटणे सुरू होईल.. आणि 10 तासा नंतर हे लोणचे काचेच्या बरणीत भरून थंड जागेत ठेवा...आणि एक दिवसा आड या लोणच्याला खालीवर करत रहा 15 दिवस ....एकदा का लोणचे सेट झाले तर वर्षभर मग पाहू नका !!
तर असे हे कैरी गुळाचे लोणचे अगदी सोपे...चवीला तर विचारू च नका...आणि मुख्य यात असलेला "लसूण" या लोणच्याला वेगळाच स्वाद देतो..कोणत्याही पदार्थां सोबत ...अप्रतिम प्रवासात तर...लय भारी... आमच्या लहानपणी घट्ट वरण, त्यावर कांदा बारीक चिरलेला आणि त्यावर हे गुळाचे लोणचे वरतून थोडं तैल... हा उन्हाळ्यातील मेनू....
दत्तप्रसंना विचोरे
नागपूर
9665053874
साहित्य:- २५० ग्रॅम सुरण, १ १/२ चमचा आले-मिरची पेस्ट, १०० ग्रॅम राजगिरा पीठ, २ चमचे मिरची पूड, २५० ग्रॅम गोड दही, पाव लीटर ताक, मीठ, तूप.
कृती:- सुरण कुकरमध्ये वाफवून घ्या. ते मळून घेऊन राजगिरा पीठ, मीठ, आले-मिरची पेस्ट टाका. सर्व एकत्र करून त्याचे चपटे गोळे करा. तुपात तळून घ्या. नंतर ताकात थोडेसे मीठ टाकून तळलेले वडे २ ते३ तास भिजत ठेवणे. सर्व्ह करताना ताकातले वडे काढून वरती दही टाकून चवीपुरते मीठ व लाल तिखट टाका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti