महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
अक्रोड एक उत्तम दर्जाचे फूड आहे. यामधील एएलए ( अल्फा-लिनोलेनिक अॅसिड) अत्यंत उपयुक्त तत्त्व आहे. शाकाहारी लोकांसाठी हे नैसर्गिक वरदान आहे. हे विविध प्रकारे आहारात वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ सलाडसोबत, पास्ता, आयस्क्रीम व ब्राउनीसोबत याचा उपयोग सहजपणे केला जाऊ शकतो.
आरोग्याच्या दृष्टीने हे उपयुक्त मानले जाते. अक्रोडमध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते.
आक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात. मूड ठीक करणे आणि चांगली झोप येण्यासाठी मदतीचा ठरतो. - आक्रोडमध्ये असलेला हा फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. - अटेंशन, डेफिसिटी, हायपरअँक्टिव्हिटी सारखे आजार कमी होतात. आक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनेसाठी चांगले असतात.आक्रोडमध्ये असणारे रासायनिक गुणधर्म रक्तप्रवाह उत्तम होण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तजेलदार होते.
दररोज तीन ते चार आक्रोड खाल्ल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर होते.आक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात सहायक ठरतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : अंडी, साखर, नारळाचे दूध, पांदान पाने ( ही पाने साऊथ ईस्ट एशिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, थायलंड या शहरात मिळतात. )
कृती : अंडी आणि साखर एकत्र करुन घेणे. त्यानंतर नारळाच्या दूधात पांदान पाने घालून गरम करणे जेणेकरुन
दूधात पांदान पानांचा फ्लेवर येईल. त्यांनतर पांदान पाने मिश्रित नारळाचे दूध आणि अंडी व साखर यांचे मिश्रण एकत्र
करुन मंद आचेवर आटवून घेणे. त्यानंतर हे मिश्रण थंड करुन एका बाटलीत भरुन बाटली फ्रिजमध्ये ठेवून द्यावी.
अशा प्रकारे आपला काया जॅम तयार.
काया जॅमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ट्रेडिशनल काया जॅम ज्याचा रंग पिवळसर असतो. आणि दुसरा पांदान काया जॅम ज्याचा रंग हिरवा असतो.
साहित्य :
मॅकरोनी, ५० ग्रॅम बटर, ४ क्युब्स चिझ, ओरिगानो, चिली फ्लेक्स, दिड कप दूध.
कृती :
सर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे.
त्यानंतर दुसर्या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे.
त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. मॅक अॅण्ड चिझ पास्ता तयार.
साहित्य -
४ वाट्या ओल्या नारळाचा चव, २ वाट्या खडीसाखरेची पावडर,२ वाट्या साखर, ७ ते ८ विड्याची पाने, आर्धी वाटी दुध, १ वाटी गुलकंद, २ चमचे वेलची पावडर
कृती -
प्रथम विड्याची पाने दुध घालुन मिक्सरला वाटुन घ्यावी , कढई मध्ये नारळाचा चव साखर व खडीसाखरेची पावडर घालुन सर्व मिक्स करुन घ्या व गँसवर ठेवा, व ते ढवळत रहा थोडे गरम झाल्यावर त्या मध्ये ऊरलेले सर्व पदार्थ घाला व कडेने तेल सुटल्यावर गँस बंद करा, हे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात घालुन मोदक बनवा.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
साहित्य- ३ वाटय़ा मैदा, दीड वाटी रवा, १/२ वाटी तेल, चवीपुरते मीठ, १ वाटी आंबट ताक, २ वाटय़ा साखर, २ लिंबाचा रस, केशराच्या काडय़ा, तळणीसाठी तूप.
कृती- रवा आणि मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन आणि चवीला मीठ घालून ताकामध्ये घट्ट भिजवावे. साखरेचा एक तारी पाक करून त्यात केशर आणि लिंबाचा रस घालावा. तूपात पुऱ्या तळून लगेचच गरम पाकात टाकाव्यात.
साहित्य :- १ वाटी बारीक रवा, १ वाटी साय किंवा सायीचं दही, प्रत्येकी दोन टे.स्पू. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, एकत्रित अर्धी वाटी बारीक चिरलेल्या किंवा किसलेल्या मिक्सच भाज्या- फ्लॉवर, पत्ताकोबी, फ्रेंच बिन्स, २/३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, बॅटर पातळ करण्यासाठी लागेल तसे ताक किंवा पाणी, तेल, तूप किंवा बटर.
कृती :- रवा, साईचं दही, मीठ आणि ताक घालून सरसरीत बॅटर बनवा. वेळ असेल तर १५-२0 मिनिटे झाकून ठेवा. नाही तर लगेच त्यात सगळ्या भाज्या घाला. नीट मिक्स करून नेहमीसारखे उत्तप्पे घाला. (भाज्या पिठात मिक्स् न करता पिठाचा उत्तप्पा घालून वरूनही भाज्या पेरता येतील) झाकण घाला. तेल सोडून उलटवा. खमंग झाल्यावर थोडं तेल सोडून कोणत्याही चटणीबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कोनफळ हे नाव ऐकलेले असले तरी हा कंद सहसा मराठी लोकांत खाल्ला जात नाही. हा कंद मुंबईत थंडीच्या महिन्यात विकायला येतो. उंधीयू चा हा एक आवश्यक घटक असल्याने, त्या भाज्या विकणार्याल लोकांकडे असतोच. याला गुजराथीमधे कंद असाच शब्द आहे. मराठीत गराडू असेही म्हणतात. बाजारात हा साधारण बटाट्याच्या आकारात विकायला येतो.
साहित्य:- रताळी शिजवून साले काढून वाटलेला गोळा एक वाटी, गूळ किंवा साखर एक वाटी, कणीक एक वाटी, एक चमचा वेलची पूड-जायफळ पूड, तांदळाची पिठी, दोन-तीन चमचे तेल, मीठ.
कृती:- रताळी शिजवून सोलून वाटून घ्यावीत. एक वाटी रताळ्याचा गोळा, एक वाटी साखर किंवा गूळ हे एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. नंतर त्यात वेलची व जायफळ पूड मिसळावी. हे सारण तयार झाले. चाळलेल्या बारीक कणकेमध्ये मीठ व तेलाचे मोहन घालावे व पीठ मळावे. पीठ सैल असावे. पुरणाच्या पोळीप्रमाणे रताळ्याचे पुरण भरून पोळी करावी. या पोळ्या आकाराने लहान कराव्यात. नंतर नॉनस्टिक तव्यावर शेकाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : २ कप मधु मका दाणे, १/४ कप कोथंबीर (चिरून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ छोटा टोमॅटो (बारीक चिरून), १/४ टी स्पून मिरे पावडर, १/४ टी स्पून चाट मसाला, १ छोटे लिंबू रस, १ टे स्पून बटर, मीठ चवीन.
कृती : मक्याचे दाणे थोडे उकडून घ्यावे. (म्हणजे कुकर मध्ये एक शिट्टी काढावी). कांदा, टोमॅटो, कोथंबीर बारीक चिरून घ्यावी. एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमाटो घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम सर्व्ह केले तर छान लागते. सर्व्ह करतांना मक्याच्या दाण्यावर कांदा, टोमाटोने सजवावे. वरतून मिरे पावडर, चाट मसाला भूर भुरावा.
Copyright © 2025 | Marathisrushti