(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वेदना

    जाणता वेदना जगातील
    मम वेदनाही विरुन गेली
    पाहता दुःख या जगीची
    मम वेदनेलाही शरम आली ।

    होतो कवटाळून मी बसलो
    लहानशी वेदनाही फक्त माझी
    वेदना माझ्यहून किती कठोर
    जगी आहे कुणी भोगलेली ।

    प्रत्येकाचे आहे दुःख वेगळे
    आहे वेदनाही हर एक निराळी
    पाहूनी तु सोसलेल्या वेदना
    खरी वेदना मजला कळाली ।

    -- सुरेश काळे
    मो.9860307752
    सातारा.
    ७ ऑगस्ट २०१८

      August 8, 2018


  • निमिष एकची मजसी पुरे

    अजुनही, तुझाच चेहरा
    माझिया, बंद लोचनात

    प्रतिबिंब तुझे सोज्ज्वळ
    निर्मळ माझ्या काळजात

    सत्यसाक्षी तूच अनामिक
    हृदयस्थ! तूच तूं एक प्रीत

    जिथे पहावे, तिथे तूच तूं
    भास, तुझाच गे ब्रह्मांडात

    मी इथे, तर तू त्या सलीली
    प्रीतगंगा, दुथडी प्रवाहात

    मी डुंबतो सचैल प्रीतडोही
    निरंतर, तुझ्याच आठवात

    निमिष! एकची मजसी पुरे
    तव दर्शनाचे, या जीवनात

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १४९.

    १२ - १२ - २०२१.

      December 17, 2021


  • डोळ्यांत अश्रू जमला

    डोळ्यांत अश्रू जमला
    तरी तो धुळीने तरळला,
    अस हसत सांगते
    ती स्त्री च असते..
    वेदना विसरुन साऱ्या
    संसारात साखरेसारखी
    अलगद अशी विरघळते
    ती स्त्री च असते..
    स्वतःकडे नंतर पण
    नवरा मुलांचं सार
    आधी आवर्जून बघते
    ती स्त्री च असते..
    स्वतःच्या भावना मन
    वेळप्रसंगी न पाहता,
    संसारात इतरांना जपते
    ती स्त्री च असते..
    आवडी निवडी माहेर
    सवयी सगळं सोडून
    सासरचं पहिले पाहते
    ती स्त्री च असते..
    सगळे घाव सोसुन
    तडजोड करुन वेळप्रसंगी
    मनाला मुरड घालून मन मारते
    ती स्त्री च असते..
    जी हसतमुखाने संसार फुलवते
    आला गेला पाहुणा
    सार आनंदाने पाहते
    ती स्त्री च असते..
    पण स्त्री चं मन,भावना,
    फुलल्या जरा तर ती,
    चुकली हे पाहणारी
    पण स्त्री च असते..
    पुरुष स्त्री ला समजून घेतो पण
    स्त्री च स्त्रीची व्यथा न जाणते,
    रागवू नका सखींनो पण दुनियेत
    हीच करुण कहाणी कायम खरी असते..
    -- स्वाती ठोंबरे.

      May 3, 2022


  • देहातील शक्ती

    नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा

    थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते

    अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून

    भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती

    आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते

    भावना जेव्हां जागृत होती, रोमरोम ते पुलकित होती

    अवयवे सारी स्फूरीनी जाती, देहामधूनी विज चमकती

    धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे

    विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी

    प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही

    स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना

    उष्णता वीज प्रकाश शक्ती, हीच ईश्वरी रूपे असती.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 17, 2019


  • सावली

    जरी मी चालतोही एकटा
    असे तुमची सावली सोबती
    धरुनीया बोट जन्मदात्यांचे
    कृपाळु, चालवितो सुखांती...

    भेटता सहृद तुम्हासारखे
    रुजली अंतरी भावप्रीती
    अरुपाचे रूपडेही आगळे
    दृष्टांत सावलीत उजळीती...

    सत्कर्मे अनुभवता दुनिया
    सावलीत ब्रह्मानंदी तृप्ती...
    जे जे पेरावे ते तेच उगवते
    कृतज्ञतेतुनी ओसंडते मुक्ती...

    अशा भावनांच्या प्रेमादरात
    सावलीसंगे निर्मली मन:शांती...
    प्रांजळ प्रेमची सदा देत रहावे
    फुलवित जावी निष्पाप प्रीती...

    रचना क्र. ५६

    २५ /६ /२०२३

    -वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

      July 25, 2023


  • चिकूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

    चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात.

      November 9, 2016


  • परमोच्य बिंदु

    ऊर्जा शोषत असतां पाणी
    उकलन बिंदूवर येते
    पाण्याचे रुप बदलूनी
    बाष्प त्यांतून निघूं लागते

    एक सिमा असे निसर्गाची
    स्थित्यंतर जेव्हां घडते
    एक स्थीति जावून पूर्ण
    दुजामध्ये ती मिळून जाते

    तपोबलाची ऊर्जा देखील
    प्रभूमय ते सारे करिते
    परमबिंदूचा क्षण येतां
    साक्षात्कार तुम्हां घडविते

    तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं
    ईश्वरमय होऊन जाता
    सारे परि ते तेव्हांच घडते
    परम बींदूला जेव्हां पोहंचता

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      July 17, 2017


  • दु:खी अनूभवी

    दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
    सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता

    धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
    शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज

    मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
    चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी

    त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
    झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी

    सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
    दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 3, 2017


  • माझ्या भारतात ना…

    असा आहे ना … माझा …
    भारत महान, माझा भारत महान … १

    माझ्या भारतात ना ….
    (काही अपवाद वगळता)
    लायक व्यक्ती निवडून येतात … २

    माझ्या भारतात ना ….
    लायक माणसं नेते बनतात … ३

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोक, शिक्षण नसतांना मंत्री बनतात …४

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोकांना लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात … ५

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोकांना बँकेतून मोठमोठी कर्जे मिळतात … ६

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोकांच्या कंपन्यांना, मोठमोठी सरकारी कंत्राटं मिळतात … ७

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोकांना सरकारी अनुदानं आणि सुविधा मिळतात … ८

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोकांनी आयकर भरला नाही तरी चालतो … ९

    माझ्या भारतात ना ….
    लायक लोकांना राखीव भूखंडांचं श्रीखंड मिळतं … १०

    असा आहे ना … माझा …
    भारत महान, माझा भारत महान … ११

    -- गजानन वामनाचार्य

      July 19, 2016


  • अंबेस दाखवी काव्य

    पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने

    पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें....१,

    प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे

    अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे...२,

    शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला

    तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,

    जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते

    अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,

    पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले

    रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 16, 2016