(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ब्रह्मानंदी टाळी

    मी तुका चाललो पंढरीला पायी
    लोचनी ब्रह्म ते विठ्ठल रखुमायी।।धृ।।

    वेचुनिया संतांच्या सद्गुणी
    गुंफितो मी भावफुलांची वेणी ।।१।।

    रांगलो, खेळलो, धावलो पाऊली
    या साऱ्याच , विश्वाच्या अंगणी ।।२।।

    नुमजली मजला संसाराची खेळी
    मी अज्ञानी ऐकितो संतांची वैखरी ।।३।।

    लावूनी टिळा गंध अबीर कपाळी
    मी दंगतो भारूडी,अभंगी, कीर्तनी ।।४।।

    मी रचिता गाथेत जीवनाची भैरवी
    मजला लागते ती ब्रह्मानंदी टाळी ।।५।।

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८८.

    १९ - ३ - २०२२.

      April 3, 2022


  • चैतन्य

    भास्करा हेच चैतन्य तुझे
    चराचराचाच श्वास आहे

    उदय,अस्त, प्राची, पश्चिमी
    कांचनकेशरी रंग तूच आहे

    सूर्यचंद्र, ग्रह, तारे, तारका
    तूच एक प्रकाशसत्ता आहे

    सारीच मनभावुक प्रसन्नता
    केवळ तुझीच देणगी आहे

    तूच सूर्य, सृष्टी जगविणारा
    देवत्वाचा साक्षात्कार आहे

    ब्रह्मांडी, कालचक्र अविरत
    जगण्यासाठी अनिवार्य आहे

    सुखनैव, मन:शांती जीवा
    तेजोमय प्रकाशमंडल आहे

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २२०

    ३०/८/२०२२

      September 28, 2022


  • नाभिकेंद्रांत आत्मा

    आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?

    तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,

    सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,

    कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,

    विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी

    मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,

    मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा

    समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,

    मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,

    आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालविते.....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 17, 2018


  • घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)

    घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)

      November 14, 2010


  • अधीर तो…

    हात हातात गुंतवूनी, मान खाली दाडवण्यास ,
    लटकेच हसूनी गाली, गोड खळी उमटवण्यात...
    जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
    अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !! १!!

    हुरहूर मनाची हळूच, डोळ्यांच्या कोनांत लपवण्यास,
    तुफानी धडधड हृदयाची , नकळंत हाताने रोखण्यात...
    जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
    अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!२!!

    जवळ घेण्यात अन् जवळही येण्यास,
    भटकंती नजरेची मजभवती भिरभिरण्यात...
    जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
    अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!३!!

    सारूनी बटा हलकेच , हनुवटी वर उचलण्यास,
    ओठांवर ओंठ मुरले तरी, डोळे घट्ट बंद करण्यात...
    जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
    अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!४!!
    जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
    अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!

    -- श्वेता संकपाळ

      September 14, 2019


  • माती

    माती
    *अष्टाक्षरी ओवी*
    शिर्षक
    *मृदा*

    मृदा तुझी रुपे भिन्न
    चिकण,तांबडी,छान
    पिके खुप तिथे अन्न
    माती द्यावा मान पान ।।१।।

    राबती तुझी लेकरे
    अहोरात्र सेवा करी
    खत पाणी ही देत रे
    सोनं येई घरो घरी ।।२।।

    मातीचा टिळा लाविती
    बळी राजा तुझे भुषण
    नाही उतत,मातत
    तुच त्याचे आभुषण ।।३।।

    हा सुगीच्या दिवसात
    आनंद पर्वणी खास
    चीज होता कष्टाचेच
    विसरे साऱ्या कष्टास ।।४।।

    कण न् कण मातीचा
    परिस दगड पाहे
    रुजता धान्याचा कण
    कुस उजवली आहे ।।५।।

    गुण गावे तरी किती
    तुझी महान ही किर्ती
    मनी नसे भय मुळी
    स्वप्नांची होईल पुर्ती ।।६।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 15, 2020


  • आयुष्य लढा

    चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा
    कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा...१

    घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ
    क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२

    सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते
    आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते....३

    पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी
    वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे राहतील विविध आठवणी....४

    हाच हिशोब जीवनाचा, दुजा वाचतो इथेच पाढा
    इतरांसाठी जगता जेव्हां, सार्थकी होतो आयुष्य लढा...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      January 1, 2015


  • नाती मृगजळी

    वात्सल्य, प्रीत, लळा, जिव्हाळा
    या भावनांचे आज अर्थ बदललेले

    उरि न उरली माया ममता ममत्व
    ओढ, आस्था आपलेपण विरलेले

    निर्जीवी, पोकळ ते भावबंध सारे
    नातेच रक्ताचे, मृगजळी तरंगलेले

    इथे कुणीच कुणाचे कधीच नसती
    सत्य विदारक जगी पचनी पडलेले

    स्वसुखात जगणे उलघाल स्पंदनी
    स्वास्थ्य सारे मनामनांचे हरविलेले

    कलियुगाची रिती, स्वार्थी विकारी
    नात्यातील, प्रेमच सर्वत्र मालवलेले

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २९३

    १६/११/२०२२

      November 21, 2022


  • आई

    अंगणात उभी तुळस
    ईश्वराचे दुजे रूप आई
    वात्सल्याची प्रेमळ मूर्ती
    जगात सुंदर भासते आई..

    उदरात सांभाळते बाळ
    अमृताचा फुटतो पान्हा..
    डोळ्याआड जाताच बाळ
    कासावीस जीव त्या वीणा...

    जगण्याचा घडवते पाया
    आई आधार भक्कम...
    बोट धरून चालवते
    आयुष्य करते संस्कारक्षम..

    निस्वार्थी करूणा सागर
    आशीर्वाद तिचा पाठी..
    फिरून जन्माला यावे
    आईचे पांग फेडण्यासाठी..

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      July 22, 2026


  • आला उन्हाळा

    आला उन्हाळा आला घेऊन गरम गरम हवेच्या झळा
    अंगाची करीत लाही जीवाची करीत काहिली

    घामाच्या घेऊन धारा पंख्याचा शीतल वारा
    तहानेने पाणी-पाणी शीतपेयांची आणीबाणी

    सरबतांचा शितल मारा सगळे फ्रीजमध्ये सारा
    आइस्क्रीमचा चाटा मलिदा सोबत थंडगार फालुदा

    पेप्सी आणि कोकची जोडी गुलाबजाम वर कुल्फीची उडी
    सर्दी खोकल्याची जोड गोळी उन्हाळ्याची दोस्तमंडळी

    घराघरातून रहदारी उन्हाळी औषधांची घुसखोरी
    डॉक्टरांची पायरी पाय ठेवायला जागा नाही वरी

    आला उन्हाळा घेऊन गरम हवेच्या झळा
    ये रे बाबा पावसा नको रुसून बसू असा

    -- विनायक अत्रे.

      July 17, 2022