खोड्या करणे, त्रास देणे,
हाच बनला स्वभाव त्याचा
वाटत होते बघून त्याला,
दूरोपयोग करि तो शक्तीचा...१
पाय ओढणे, खाली पाडणे,
कपड्यावरी तो चिखल फेकणे
मारपिट ती करूनी केंव्हां,
गुंडपणा तो करित राहणे...२,
बेफिकीर ती वृत्ती तयाची,
स्वार्थाने तो भरला पुरता
तुच्छ लेखी इतर जनाना,
स्व आनंद साधत असतां....३,
'आनंद' मिळवणे हेच ध्येय,
जीवनाचे तत्त्व खरे ते
विपरीत मार्ग अवलोकितां,
समाधान राही दूर तेथें...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 1, 2016
क्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून ।
मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो ।।
जीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता ।
ढोबळतेचा विचार येता, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो ।।
मृत्यू येई हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला ।
गेला क्षण परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई ।।
समाधान जे मिळे तुम्हाला, देता किंमत प्रत्येक क्षणाला ।
घटनांची क्रिया चाले सतत, झिजवावा देह ईश सेवेत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 31, 2020
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल.......।।धृ।।
लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल ।।
झाली होती पितृज्ञा ती ।
पाठवी रामा वनीं ।।
माता कैकेयीच हट्ट करिते ।
दूजे नव्हते कुणी ।।
कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल....१,
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।
उंचबळूनी हृदय भरता ।
कंठी दाटला सारे ।।
शब्द फुटती मुखा मधूनी ।
जे होते हुंदके देणारे ।।
थरथरणाऱ्या ओठांमधूनी भाव कसे उमटतील....२,
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।।
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 28, 2019
करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो
जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते १
बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी
त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी २
धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो
सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे ३
मात करूनी विचारावरती सुप्त गुण हे विजयी होती
गुणधर्म ही ईश्वरी योजना घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 21, 2021
पाऊलोपाऊल चालत जाते,
मनामधली एक वारी,
ना टाळ, ना मृदुंग हाती,
तरी भक्तीची गोड तयारी.
रस्ता नाही धुळीचा येथे,
ना दिंडींची गर्दी भारी,
अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
अखंड सुरू ईश्वराची वारी.
सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
हीच खरी जीवनवारी.
अहंकाराचे ओझे टाकून,
प्रेमाची घेऊन शिदोरी,
करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.
कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
कधी आनंदाची फुले फुलती,
तरी न थांबे हा अंतःप्रवास,
ओढ लागलेली पंढरीची न्यारी.
शेवट नसतो या प्रवासाला,
ना थांबे कधी ही स्वारी,
ईश्वर भेटतो अंतःकरणी,
जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 15, 2026
अक्षर अक्षर झुलते सुंदर हिरव्या हिरव्या रेषांवर
July 12, 2026
क्षण तोच धुंद , बेभान
अस्तित्वा हरवुनी गेला
मी , तू सहज विसरूनी
मिठितच गुंतवुनी गेला
तो सोहळाच प्रीतस्पर्शी
अंतरंगी विर्घळूनी गेला
तादात्म्य ! भाव निर्मळी
स्वत्वास ! समर्पूनी गेला
तोच अवीट स्पर्शानंद
श्वासास सजवुनी गेला
खेळ साराच संचिताचा
जन्म , हा कृतार्थ झाला
--वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र.१८६
३/८/२०२२
September 4, 2022
जीवनभर घासुन घेतल्यावर
आता म्हणता चंदन आहे |
दूर व्हा दष़्टांनो, तुम्हाला
माझं वंदन आहे || १ ||
आता नाही मला कधी
चंदन व्हायचं |
सहाणच होईन बरी
मला नाही झिजायचं || २ ||
एक एक पान काढलंत
फांदी सहित ओरबाडून |
व़क्ष झाला पर्णहिन तेव्हा
चित्र काढता रेखाटून || ३ ||
आता कुठला राग नाही
लोभ नाही उरला |
स्थानक येण्याआधीच माझा
प्रवास होता सरला || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
January 7, 2016
त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी
हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।।
आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी
तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।।
दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले
दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।।
मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा
ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो ।।४।।
राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना
हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
September 8, 2020
वेगाने तो जात असता, घटना एक घडली ।
तुडवले गेले जीव जंतू , त्याच्या पाययदळी ।।
ज्ञात नव्हते कांहीं त्याला, त्याच्या कृत्याचे ।
स्वकर्मा मध्ये गुंतले होते, एक चित्त त्याचे ।।
नजर गेली अवचित त्याची, एका सरड्यावरती ।
दगड मारूनी बळी घेतला, असूनी अंतरावरी ।।
पापाचा बने भागीदार, मारूनी सरड्याला ।
अकारण कृत्य जे केले, पात्र ठरे शिक्षेला ।।
अगणित जिवाणू जेंव्हां मेले, कृत्य नव्हते त्याचे ।
जाणतेपणातील कर्म आणिते, हिशोब पाप पुण्ण्याचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 10, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti