आपल्या देशात आज अशी पिढी निर्माण झाली आहे, जी कुठल्याही कायद्याचे व नियमांचे पालन करत नाही. या पिढीला स्वत:च्या जीवाची सुद्धा चिंता नाही. परिणाम एकच, अश्या दुर्घटना होत राहतील. राजनेता एका-दुसर्यावर खापर फोडत राहतील. कुणाला तरी दोषी ठरवून, त्याच्यावर कार्रवाई होईल. मुख्य कारण दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही.
संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा.
उसाच्या इथेनॉलचा इंधनात वापर न करून आपण किती मोठी चूक केली, हे सहज लक्षात येऊ शकते. वस्तुस्थिती ही आहे, की स्वातंत्र्यानंतर साखर निर्मिती कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलचा संपूर्णपणे इंधन म्हणून वापर केला असता, तर आज भारतावर एका पैशाचेही कर्ज राहिले नसते. किमान आतातरी सरकारने उसापासून इथेनॉल आणि धान्यापासून मद्य निर्मितीचे धोरण स्वीकारून विनाकारण खर्च होणाऱ्या विदेशी चलनाची बचत करावी!


वर्तमानपत्रात बातम्यांना स्थान देताना साधारणपणे त्या बातम्यांचे महत्त्व पाहिले, तपासले जाते. सर्वाधिक महत्त्वाच्या बातमीला पहिल्या पृष्ठावर वरच्या भागात प्रसिध्दी मिळते. वृत्तपत्रीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या भाषेत अशा बातमीला ‘लिड’ म्हणतात.
हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें.
खर्या अर्थाने शेती आणि शेतकरी केंद्रीत अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर एक वेगळा आणि स्वदेशाभिमानी अर्थविचार घेऊन समोर येणार्या राजकीय ताकदीची गरज देशाला आहे. दुर्दैवाने सध्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांपैकी एकातही ती गरज पुरविण्याची क्षमता नाही. लोकांना काहीतरी वेगळा पर्याय शोधावाच लागेल.
शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते.
मध्यमवर्गाला अस्वस्थ करते ती महागाई आणि श्रीमंताना हवी असते ती प्रगती. प्रगती झाल्यावरही जर महागाईची झळ मध्यमवर्गाला पोह्चली तर त्याचा परिणाम आपल्या समोरच आहे. कधी – कधी प्रगतीच्या नावाखाली नेसर्गिक साधन- संपत्तीची हानी केली जाते त्याचे दुरगामी दुषपरिणाम लोकांना भोगावे लागतात.
भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्वेच्छेने पत्करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक आहे हे किती लोकांच्या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ?
आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.
Copyright © 2025 | Marathisrushti