(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रूर अपेक्षा

    निमहकीम लोकांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. रोगी मरणार नाही तर काय? कुणी सांगते पॅकेज द्या, कुणी सांगते सबसिडी द्या, कुणी स्प्रिंकलरसाठी अनुदान देण्याचा उपाय सुचवतो, तर कुणी बियाणे मोफत पुरवायला सांगतो आणि सरकारदेखील फारशी शहानिशा न करता हे सगळे उपाय करून पाहते, त्यासाठी कोट्यवधींची उधळण करते.

      September 9, 2007


  • त्यांच्या चितेतून उठतील क्रांतीच्या ज्वाला

    कर्ज किंवा नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्त्या, हे मर्यादित वर्णन बातमी म्हणून ठीक असले तरी या बातमीआड दडलेल्या काळोख्या वास्तवाचा वेध कोण घेणार? सरकार? सरकार आणि सरकारातल्या स्वनामधन्य पुढाऱ्यांना तेवढी फुरसत कुठे आहे? राजकारणाची दुकानदारी अव्याहत चालू राहण्यासाठी भांडवल उभारणीतून त्यांना वेळ मिळेल तर ना! शिवाय त्यांच्यासमोर एक-दोन पिढ्यांचा प्रश्न नसतो. पुढच्या सात पिढ्यांची सोय करायची असते. कुठल्यातरी कोपऱ्यात कोणत्या तरी शेतकऱ्याने जीव दिला म्हणून हातातली ‘महत्त्वाची’ कामं सोडून पळण्याइतके का ते मूर्ख असतात? एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतले, त्याला ते फेडता आले नाही आणि म्हणून त्याने आत्महत्त्या केली. या सर्व प्रकारात आमची भूमिका येतेच कुठे, आम्ही दोषी कसे ठरू शकतो, असा कोडगा सवाल उपस्थित करायला ते मोकळे असतात. परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.

      July 27, 2003


  • निष्ठेची किमत!

    जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणाऱ्या लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

      April 19, 2009


  • संयम सुटू देऊ नका !

    गेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!!

      September 16, 2020


  • मोबाईल घेऊन ‘बाहेर’ जाणार्‍यांचा देश!

    आज भलेही आपण जागतिक महासत्ता बनण्याचा दावा करीत असलो तरी ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही की आजच्या घडीला या देशात मोबाईल फोनची संख्या स्वच्छतागृहांपेक्षाही अधिक आहे. मोबाईलची संख्या वाढत आहे म्हणजेच देशाचा विकास किंवा आधुनिकीकरण होत आहे, असा दावा आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 साली केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 54.5 कोटी मोबाईलधारकांची नोंद करण्यात आली होती. हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत 45 टक्के होते. गेल्या दोन वर्षांत त्यात आणखी दहा टक्क्यांची भर नक्कीच पडली असेल. या तुलनेत स्वच्छतागृहे मात्र 36.6 कोटी, म्हणजे लोकसंख्येच्या मानाने फक्त 31 टक्के एवढीच आहेत! याचाच अर्थ स्वच्छतागृहाबाहेर जाणार्‍या लोकांचे प्रमाण आजदेखील खूप अधिक आहे. घरात स्वच्छतागृह नसले तरी चालेल, पण खिशात मोबाईल हवाच असे मानणार्‍यांचे प्रमाण प्रचंड आहे.

      June 9, 2010


  • “शेतकरी बंधुनौ आम्हा शहरवासियांना माफ करा…”

    मी माफी अशा करिता मागतोय कारण आम्हाला आमच्यात काहीच सुधारणा करायच्या नाहीयेत किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची बचत देखील करायची सवय तर नाहीच नाही....

    पहाना.. शहरवासियांना पाण्याचा ईतका मुबलक पुरवठा होतोय ना... की आम्हाला त्याची काहीच किंमत नाही... म्हणजे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी दररोजच वाया घालवतोत... साधी चारचाकी गाडी धुवायला... रुबाबदारपणे स्वच्छ दिसायला किमान 70 लिटर तरी पाणी आम्हीच वापरतोतच..... साधारणपणे चारपाच कपडे धुवायला वाशिंग मशिन मधुन तीनचार वेळा धुण्याच्या नादात अंदाजाने 300 लिटर पाणी वापरतोतच.... स्वताःच घर... आलिशान बंगला.... गृहनिर्माण सोसायटीतील रोजची स्वच्छता... मंगल कार्यालये... मोठमोठी हास्पीटल्स, भव्यदिव्य मॉल... चारचाकी गाड्याची सर्व्हीसिंग सेंटर्स, दारुचे बार... आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्स... आणि हो... सरकारी स्वच्छतावर न लिहलेलेच बरे.. ... अशी अनेक नानाविध ठिकाण ... या साठी कमी पाणी वापरुन कसे चालेल हो... जेवढे मुबलक पाणी.. तेवढा त्याचा वापर तर आम्ही शहरी माणस करणारच ना... भले कामापेक्षा जास्त पाणी वाया गेले तरी चालेल... पण बचतीचा विचार आम्हीच का करु....? गावातला ... खेड्यातला... शेतकरी शेतातील पिकांना ऊगवण्या...वाढवण्याकरिता... पाण्यासाठी सैरभैर होतो... त्या मेघाकडे तासनतास आस लावुन असतो...

    आमच्या शहरातील किमान शंभर कुंटुंबानी जरी ठरवल न.. की पाण्याची बचत करायचीच.... तर किमान पाच शेतकरी बंधुभगिनींच्या शेताला पुरेल ईतका पाणीसाठा शिल्लक उरेल... पण हे सर्वंच "क्षण भंगुर...." स्वप्नासारखच वाटतय.... कदाचित् जमल तर आम्हा शहरवासियांना माफ करा... पाण्याची बचत ही काळाची गरज जरी असली तरी आम्ही आमच्याच सुखसुविधामध्ये ईतके गुरफटुन गेलोत ना... की... भोवतालच्या जगातील सुखदुःखाची जाणच आम्हाला होत नाहीय... शहरी माणस आहोत ना... असंवेदनशिल...
    फक्त पेपरात सकाळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचुन नंतर आम्हीच दैनंदिन कामात व्यस्त होऊन जातोत... कशाचही आम्हाला देणघेण नाही.... मग पाणी बचतीचा प्रश्रन नाही...

    पण जे पाण्याची मनोमन बचत करतात... त्यांना खरोखरीच मनःपूर्वक धन्यवाद

    ...... देवच त्यांच भल करो... व बचतीच पाणी शेतकरी बंधुभगिनींच्या शेताला मिळुन भरपुर पिक येवो.... आमचा शेतकरी बंधु सुखात राहो...

    जय हिंद.....

    वंदे मातऱम

    -- विवेक जगन्नाथ जोशी
    [नेहमीच पाण्याची बचत करणारा]

      March 11, 2016


  • दंगलीतून वाजत आहेत निवडणुकीचे पडघम

    दोन समाजात तेढ निर्माण करणे, प्रसंगी दंगली घडवून आणणे किंवा दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातून आपले राजकारण साधणे हा इथल्या राजकीय पक्षांचा धंदा झाला आहे. हा करतो म्हणून तो करतो किंवा तो करतो म्हणून हा करतो, असे तर्क दिले जात असले तरी, शेवटी सगळेच पक्ष कमी-अधिक प्रमाणात जातीचे, धर्माचे राजकारण करतात ही वस्तुस्थिती आहे.

      September 8, 2012


  • प्रामाणिकपणा

    लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट प्रामाणिकपणा चे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी सांगितली  जात असे. आज तशीच घटना परत घडली तर आजचा लाकूडतोड्या  कसा वागेल आणि देवाकडे काय मागेल? तुम्हाला काय वाटते?

      December 19, 2018


  • माझी मैना गावावर राहिली !

    महाराष्ट्र आणि म्हैसूर (म्हणजे आताचे कर्नाटक) यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुख-या शिरेवर बोट ठेवून ” माझी मैना गावावर राहिली हे अजरामर गीत लिहिले होते .जोपर्यंत बेळगाव कारवर निपाणी आणि उंबरगाव महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत शाहिरांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ..

      February 13, 2019


  • जिवापेक्षा काहीही मौल्यवान नाही…  

    आपल्या देशातील मागील काही महिन्यातील आत्महत्येच्या घटना पाहिल्या तर त्यातील काही आत्महत्या विचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या होत्या. ज्या आत्महत्या कोणा अशिक्षित व्यक्तीने नव्हे तर चांगल्या उच्चशिक्षित लोंकानी केलेल्या होत्या .

      July 18, 2023