(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जेवणाची बैठक कोणती ?भाग २

    पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ?
    त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे.

    आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.

    मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा वो चार दिन !
    आसन मांडी एकच.

    आज वागणंच एवढं सैल झालं आहे की,
    " बसणं जरा सैल केलं, तर काय एवढं बिघडलं ? " असं, फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्‍या, काही कमी नाहीत.

    स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की,
    गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,
    स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ?

    ......नक्कीच वाढलेले आहेत.
    .....जाडी वाढलेली आहे.
    ... .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे.

    आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.

    असं घट्ट बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, .... बाहेर यायची ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    18.09.2016

      September 18, 2016


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सोळा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे बावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    पदार्थ उघडा ठेवू नये
    तयार झालेला पदार्थ उघडा ठेवल्यास, भूमार्गाने येणारे झुरळ मुंगीआदि गण, आकाशमार्गाने येणारे किटक, डास, घरमाशी, कोळी इ. उपद्रवी जीव अन्न पदार्थात जाऊ शकतात. आणि अन्न विषमय होऊ शकते. किंवा उंदीर, पाल आदि जीवांची विष्ठा अन्नामधे पडू शकते. हे लक्षात असावे. नाहीतर दूषिविषाला (प्राण्यापासून निर्माण होणारा जंतुसंसर्ग, म्हणजे दूषीविष.) सामोरे जावे लागते. म्हणून आई ओरडायची. पदार्थ उघडा ठेवू नये. त्यावर झाकण घालून ठेवावे.

    दुधावर फुंकर घालू नये
    दुधावरची साय बाजूला करण्यासाठी पातेल्यातील दुधावर फुंकर घालू नये. साय बाजूला करताना त्यावर तोंडातील लाळ, थुंकी उडण्याची शंका असते. पुनः जन्तु संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून साय चमच्याने बाजूला करावी. यात गैर काय आहे? आजच्या भाषेत आपल्या हायजिनसाठी हे आवश्यक वाटते.

    पिंपात तांब्या बुडवू नये.
    तांब्याच्या तळाला लागलेला कचरा, माती पिंपात जाण्याची शक्यता असते. पिंपातील सगळेच पाणी फुकट जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन ही सूचना असते.

    पातेलं खरडून वाढू नये
    ज्याला मॅनर्स म्हणतात, त्यातील हा एक प्रकार आहे. पातेलं खरडून वाढताना रिकाम्या पातेल्याचा जो आवाज येतो, तो जेवणा ऱ्या च्या मनात संभ्रम निर्माण करतो, पातेल्यातील जिन्नस संपला असेल तर आपण आणखी मागायला नको, असे त्याला वाटून जेवणारा, अर्धपोटी उठू शकतो, त्याचा "अन्नदाता सुखी भव" हा आशीर्वाद मिळण्यासाठी पातेलं खरडण्याचा आवाज वाढताना होऊ नये.

    काही जणांना वाटेल काय हे एवढी साधी गोष्ट कळत नाही का आम्हाला? एवढे बुद्धु आहोत का ? पण काही वेळा साध्या गोष्टी मागील मर्मच लक्षात येत नसते, त्या कोणी एका शास्त्रज्ञाने म्हणे, मोठ्या मांजराला घरातून बाहेर जाण्यासाठी एक भोक आणि लहान पिल्लांना बाहेर जाण्यासाठी वेगळे लहान भोक ठेवले होते म्हणे !

    मुलांचे चालीने चालावे
    मुलांचे बोलीने बोलावे
    तैसे जनास सिकवावे
    हळूहळू
    असे समर्थ देखील म्हणतात.

    ताटाच्या बाहेर सांडू नये
    भूतदया असावीच, त्यांच्यासाठी चार शीते ताटाबाहेर काढूनही ठेवावीत, पण आपण जेवत असताना अन्न ताटाबाहेर पडत तर नाही ना याची काळजी देखील घ्यावी. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न द्यावा. ताटाबाहेरच नव्हे तर ताटात देखील अन्न टाकू नये. जेवढे हवे तेवढेच वाढून घ्यावे. हावरटपणाने वाढून घेऊन, नंतर ताटात टाकणे आईला पसंत नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ११.०८.२०१७

      August 11, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ६

    मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हे सत्य ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी, कृष्णानी सांगितलेल्या भगवतगीतेवर गीतारहस्य लिहिले आहे. कृष्णाच्या सत्यवचनावर लोकमान्यांचा पण विश्वास होता. सत्य बोलावे, पण अप्रिय होईल असे बोलू नये. आणि जर सत्य स्थापन होणार असेल तर खोटे जरूर बोलावे.

      August 1, 2017


  • याला जीवन ऐसे नाव भाग ३६

    पाण्याची प्रशंसता भाग एक

    पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !

    हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.

    निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
    जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
    जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
    तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.

    तो मूळ संदर्भ असा आहे.
    समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।

    भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
    अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
    मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।

    जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......

    देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
    केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
    इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....

    पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?

    "कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.

    जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.

    हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.

    आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !

    तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!

    कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.

    तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
    आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.

    गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.

    थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
    त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.01.2017

      January 12, 2017


  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 15, 2017


  • आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७२

    शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती.

      December 4, 2016


  • आजचा आरोग्य विचार-भाग तीस

    भक्तीमार्गातून मानवता, कर्म मार्गाने कृतज्ञता आणि संस्कृती संवर्धन किंवा ज्ञानमार्गाने जाऊन जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी साधना आणि सत् चित आनंद प्राप्ती, हे तीन्ही मार्ग जगाला सर्वप्रथम आमच्याच स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते.
    हा इतिहास आम्ही विसरत चाललो आहोत

      March 2, 2018


  • याला जीवन ऐसे नाव भाग ४

    आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार नाही.
    आपल्या शरीराला बरोबर कळते, आपल्याला पाणी किती हवे आहे ते. तेवढी तहान शरीर निर्माण करते. तेवढं पाणी जरूर प्यावं.

    आपण जिथे रहातो, तेथील हवामानानुसार आपली तहान कमी जास्त होत असते. जमिनीनुसार धान्यातील द्रव्य, भाज्यांमधील क्षार बदलत असतात.

    वाळवंटी प्रदेशात रहाणारा उंट एकदाच पाणी पिऊन घेतो. तेथील वनस्पतींना पाणी उत्सर्जित करणारी पाने कमी असतात. काटे जास्त असतात. त्यानेपानांचे देठ पाणी साठवण्यासाठी योग्य असे जाडजूड केलेले असतात. !
    तेथील अरब लोक पायघोळ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात, जे उष्णता फेकून देणारे असतात.

    इथे प्रत्येकातला तो वेगळा आहे. म्हणून प्रत्येकाची तहान वेगळी आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. जे उन्हात काम करतात, त्यांना पाणी जास्त लागेल. जे सावलीत काम करतात, त्यांना पाणी कमी लागेल, जे एसी मधे काम करतात, त्यांना पाणी लागणारच नाही.

    इथे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत.

    एक नियम पाण्याविषयी सांगितला जातो. तो म्हणजे 30 मिली पर केजी बाॅडी वेट. म्हणजे एक किलो वजनाला सर्वसाधारणपणे 30 ते 40 मिली पाणी प्यावे. नियम केला कि तो युनिव्हर्सल असावा. आणि नियम पाळण्यासाठी करावा. टाळण्यासाठी नको.

    पण हा पण नियम, नियम म्हणून पाळू नये. कारण, मी सत्तर किलो वजनाचा आहे. सकाळ पासून सायंकाळच्या सातपर्य॔त एसी मधे बसून काम करतोय. आणि त्याचवेळी सत्तर किलो वजनाचा एक हमाल रस्त्यावर ओझे वाहातोय.30मिली /किग्रॅ. या नियमानुसार या हमालाने फक्त 2100 मिलीच पाणी प्यायचे, आणि गरज नसताना मी पण एवढे एकवीसशे मिली प्यायचे ?

    हे दोन्ही चुकच आहे.

    इथे प्रत्येकाची गरज वेगळी आहे.

    मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातील वैश्विक नियम मात्र इथे आरोग्यशास्त्रातील पाण्यालादेखील तंतोतंत लागू पडतो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.12. 2016

      December 11, 2016


  • आजचा आरोग्य विचार – भाग दोन

    हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले.

      February 2, 2018


  • आजचा आरोग्य विचार – भाग चार

    पाश्चात्य विद्वानांनी लावलेल्या शोधाबद्दल पूर्ण आदर ठेवून ही लेखमाला लिहितोय. कृपया गैरसमज नसावेत. आणि जे शोध लावले जात आहेत, ते विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळेच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्रातील जे मौलिक संशोधन झाले आहे, त्याबद्दल वाद नाहीच आहे.

      February 4, 2018