मनोरंजनासोबतच थोडी समाजसेवाही ! उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात थोडे आनंदाचे रंग भरुया का ?
अफाट पसरलेल्या इंटरनेटच्या महासागरातून नेमके चांगले कंटेंट मिळवणे सोपे नाही. त्यासाठीच मराठीसृष्टीने एका क्लाऊड लायब्ररीची निर्मिती केली आहे. या क्लाऊड लायब्ररीमध्ये कथा, कविता, इ-पुस्तके, विविध विषयांवरचे लेख, जुन्या वृत्तपत्रांमध्ये आणि मासिके / दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेले लेख आणि कथा, च्हिडिओ, पॉडकास्ट असा मोठ्या प्रमाणावर मजकूर असणार आहे.
१९९५ मध्ये सुरु झालेली मराठीसृष्टी गेली ३० पेक्षा जास्त वर्षे जगभरातील लेखक, प्रकाशक, वर्तमानपत्रे आणि मराठी वाचकांशी जोडलेली आहे. त्यामुळे ४ लाखांपेक्षा जास्त पानांचा मजकूर आत्ता तयार आहे. विविध प्रकारचा मजकूर वेगवेगळ्या माध्यमातून सतत येत आहे. १० लाख पानांचा मजकूर उपलब्ध करुन देण्याचे मराठीसृष्टीचे उद्दिष्ट आहे.
या सर्व मजकूराच्या साठ्यातून तसेच नवीन येणाऱ्या मजकूरातून निवडक असा ३ लाख पानांचा मजकूर या क्लाऊड लायब्ररीमध्ये या वर्षामध्ये उपलब्ध होईल. वेगवेगळ्या वयोगटाच्या वाचकांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार मजकूर येथे मिळेल.
यालाच अनुसरुन मराठीसृष्टीने ज्येष्ठ नागरिक सन्मान सभासदत्त्व या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या काळात घेऊन जाण्यासाठी खास कंटेंट तयार करणे आणि इतरत्र असलेला कंटेंट शोधून लिंक्सच्या स्वरुपात उपलब्ध करणे यावर भर देण्याचे ठरवले आहे.
ज्येष्ठ नागरिक आता संगणक आणि मोबाईलचा नियमित वापर करतात. वेबसाईट, ब्लॉग, युट्युब वगैरे माध्यमे ते चांगल्या प्रकारे वापरतात. महाराष्ट्रातील विविध शहरात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी अनेकांची मुले-मुली नोकरी किंवा व्यवसायानिमित्त परदेशात किंवा परगावात स्थायिक झाली आहेत. परिणामी या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जोडीदारासोबत किंवा अनेकदा एकटे रहावे लागत आहे. अनेकजणांना नाईलाजाने वृद्धाश्रमात रहावे लागत आहे.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या घरातल्या व्यक्तींचा एकमेकांशी संवाद तुटत चाललेला आहे. कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही, याचा सर्वाधिक परिणाम वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांवर होतो. एकटेपण ही त्यांची सर्वात मोठी समस्या आहे.
ज्येष्ठ नागरिकांची मनोरंजनाची साधने मर्यादित आहेत. नाटक-सिनेमाला ते सहजपणे जाऊ शकत नाहीत. येण्याजाण्यासाठी सोबत, प्रवासखर्च, तिकिटांचे दर हेही परवडणारे नाही.
हीच गोष्ट कक्षात घेऊन मराठीसृष्टीने एक लाख ज्येष्ठ नागरिकांना मराठीसृष्टीच्या क्लाऊड लायब्ररीचे मोफत सभासदत्त्व देण्याचे ठरवले आहे. यामुळे त्यांच्या वाचनाची भूक काही अंशी भागेल, त्यांचे मनोरंजनही होईल आणि नवनवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या काळातील लेखकांच्या कथा-कादंबरी यासारखे साहित्य, दिवाळी अंकांमध्ये आलेले लेख, चित्रपट, नाटके, जुन्या काळातील आठवणी यांच्या विश्वात घेऊन जाण्यासाठी जसा क्लाऊड लायब्ररीचा उपयोग होईल तसाच नवनविन साहित्य आणि मनोरंजनाची साधनेही त्यांना उपलब्ध होतील.
यावर्षी किमान १०००० ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
या संपूर्ण उपक्रमात आपला अतिशय मोठा सहभाग असणार आहे. आपण घेतलेल्या मराठीसृष्टीच्या एका प्लॅटिनम सभासदत्त्वामागे पाच ज्येष्ठ नागरिकांना मराठीसृष्टीच्या क्लाऊड लायब्ररीचे सभासदत्त्व मोफत दिले जाणार आहे. या पाच ज्येष्ठ नागरिकांची नावे आपण सुचवू शकता. अपेक्षा एवढीच की ज्यांची नावे आपण सुचवाल त्यांना आपण दिलेल्या या भेटीची किंमत असावी.
तशी नावे आपल्याकडे नसल्यास आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे सारख्या माध्यमातून अशा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपली ही भेट पोहोचवू.
आपण एकापेक्षा जास्त सभासदत्त्व घेऊन त्या प्रमाणात जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद आणू शकता. आपण एखाद्या संस्थेमार्फतही हा उपक्रम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता.