जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते.
December 12, 2021
‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग कुणीही विसरू शकणार नाही, असा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला. सर्वच मोठय़ा कलाकारांनी यामध्ये भाग घेतला आणि या नाटकाचे ५०० रुपयांचे तिकीट काळाबाजारात तब्बल १२ हजार रुपयांना विकले गेले होते.
June 22, 2022
इंदिरा संत यांची कविता पहिली की आपण एक वेगळ्याच विश्वात जातो , तिथे फक्त शब्द असतात आणि मनाला मिळणारी अनुभूती.
January 4, 2021
मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.
July 16, 2022
शारीरिक अपंगत्व सहन करणे महाकठीण असले तरी त्याने हरायचे नसते... जिद्द आणि उमेदीच्या जोरावर देशविदेशातील क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची बाजी मारणारे नागपूरचे विजय मुनीश्वर यांनी हे दाखवून दिले. पॅरालिम्पिकमध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले. अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिस यांत त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल घेत सरकारने त्यांना “अर्जुन पुरस्कारा” ने व राज्य सरकारने “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक” पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ते पॅरालिम्पिक कमिटीच्या उपाध्यक्षपदावर असून पॉवरलिफ्टिंगचे मुख्य कोच आहेत.
''पॉवर'' फुल प्रशिक्षक
July 24, 2015
मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावनभूमीत रममाण झाले.
त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
चमत्कारांनी साधुसंतांचे मोठेपण दर्शविणार्या लोकांना खोडच जडलेली आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेडयाच्या तोंडून वेद म्हणवून घेतले. अशा प्रकारच्या अनेक दंतकथा ज्याप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात तशीच दंतकथा सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितली जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हाव्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हाव्याला निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधीत होऊन सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करुन जातात.
नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वतःही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.
नंतर महाराष्ट्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत.
March 12, 2015
मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही.
September 10, 2018
‘आदिवासी प्रगती मंडळ’, तलासरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. ल. शि. कोम साहेब यांनी तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाला ‘के. जी.’ ते ‘पी. जी.’ पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य केले आहे. एका वसतीगृहाच्या स्थापने पासुन सुरु झालेल्या संस्थेची आज अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय व मुला-मुलींची अनेक वसतीगृह आजच्या आदिवासी समाजातील तरुण- तरुणींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पवित्र कार्य निरंतरपणे करीत आहेत.
November 12, 2020
मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते.
ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व ठाण्याची वास्तू घडण करणारे प्रसिध्द बांधकाम ठेकेदार अशी त्यांची संपुर्ण भारतामध्ये किर्ती पसरलेली होती. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईच्या जन्मापासून तिच्या गळ्यामधील दुर्मिळ अलंकाराचे काम करणारे, गॉथिक वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेले, व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रसिध्द होणार्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये नोंद झालेले पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा काही भाग त्यांनी बांधला होता.
याशिवाय मुंबईतील अनेक इमारती व पायाभूत सुविधांची बांधणी त्यांच्या हस्ते झाली. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ( हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय) , स्मॉल कॉसेस कोर्ट, व इन्स्टीटयूट ऑफ सायन्स या इमारतींच्या निर्मीतीची जबाबदारी अतिशय समर्थतेने त्यांनी पेलली होती. त्यांचे सुपुत्र नारायण सायना यांची गणतीदेखील मुंबईतल्या दर्जेदार व नामांकित इमारत कंत्राटदारांपैकी होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच व्यवसायामध्ये उंच भरारी मारली.
त्यांच्याच नावाने ठाणे येथे विठ्ठल सायन्ना मंदीर उभे आहे.
January 12, 2015
१९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
July 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti