जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.
August 16, 2011
दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.
April 14, 2010
मुंबईमधील मल्टीनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी सोडून राज्यस्थानच्या टोंक जिल्यातील सोढा पंचायतीची सरपंच छवी राजावत यांनी पूर्ण पंचायतीला आदर्श पंचायतमध्ये परिवर्तीत केले आहे. गावाच्या विकासासाठी त्या सरकारी पैशांवर निर्भर न रहाता, खाजगी क्षेत्रातून गुंतवणूकीची व्यवस्था करीत आहे. सोढा मध्ये पाणी, वीज, रस्त्यांच्या सुविधांचा अभाव या हद्दपार झालेल्या गोष्टी आहेत आता इथला ऐरणीचा विषय म्हणजे गावात बँक, एटीम, सौर उर्जा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय या व्यतिरिक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एखाद्या जागेची सोय. दिल्लीतील कॉलेज मधून आलेल्या मुलींशी गावातील स्त्रिया व मुली, मासिक पाळी व प्रसूती या मोकळेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांवर चर्चा करू लागल्या.
September 26, 2017
माळी, व्ही. ए.
महाराष्ट्राच्या कला परंपरेमध्ये कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कोल्हापूराने राज्याला एक श्रेष्ठ कलापरंपरा दिली. चित्रकार व्ही. ए. माळी, नव्हे माळीसर हे या कलापरंपरेतील शिरोमणी. या माळी सरांनी रविवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी सरांच्या अभिष्टचिंतनासाठी आलेल्या अध्र्याहून अधिक चित्रकारात सध्याच्या प्रख्यात चित्रकारांचा समावेश होता. ते सारे माळी सरांचे विद्यार्थी. सरांनी चितारलेली लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सेठ लालचंद हिराचंद, न्या. एम. सी. छागला, महात्मा फुले आदींची व्यक्तिचित्रे आदर्श मानली जाणारी.
त्या कलाकृतींनी केवळ नामवंतांच्याच संग्रहात नव्हे, तर कोलकात्याच्या व्हिक्टोरिया म्युझियमपासून ते मुंबई-बडोद्यातील म्युझियमपर्यंत अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांमध्ये स्थान पटकावले आहे. त्यांच्या कलाकृती लंडनमधील इंडिया हाऊसमध्येही आहेत. माळी सरांचे वडील अनंत माळी हेही चित्रकारच. मात्र त्यांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. मुंबईमध्ये नशिब अजमावण्यासाठी आलेल्या अनंत माळी यांचे निधन झाले, त्यावेळेस सर अवघे १० वर्षांंचे होते. शालेय शिक्षणानंतर केतकरांच्या कला संस्थेत दोन वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या माळी सरांनी जे. जे.मध्ये प्रवेश घेतला. १९३२ साली जी. डी. आर्ट झाल्यानंतर माळी सरांनी कोळवणकरांच्या स्टुडिओमध्ये काम सुरू केले. कोळवणकर हे माळी सरांच्या वडिलांचे जिगरी दोस्त. किंबहुना मुंबईत नशिब अजमावण्यासाठी येण्याचा निर्णय अनंत माळी व कोळवणकर यांनी एकत्रितरीत्या घेतलेला होता. माळी सर व्यक्तिचित्रण करीत ते फोटोवरून किंवा प्रत्यक्षात व्यक्तीला समोर बसवून. इथेच त्यांना व्यक्तिचित्रणाची प्रमुख गोडी लागली. हातातले काम संपल्यानंतर सर स्वत बाहेर पडत आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्यांना स्डुडिओमध्ये आणून बसवून त्यांची व्यक्तिचित्रे चितारत. व्यक्तिचित्रण हा रईसांचा शौक मानला गेल्याच्या कालखंडात त्याकाळी माळीसरांनी मात्र माकडवाला, गोंधळी, पोतराज, भिल्ल स्त्रिया यांना स्थान दिले. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ सुंदर किंवा दिमाखदार दिसणाऱ्या व्यक्तीचे चित्रण या समजाला त्यांनी यशस्वीरित्या छेद दिला. माळी सरांच्या व्यक्तिचित्रणात म्हणूनच कृष्णवर्णाच्या व्यक्तींचे चित्रण पाहायला मिळते. माळी सरांच्या चित्रणशैलीचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे, या गडद रंग छटांचे चित्रण त्यांच्या चित्रांमध्ये प्रभावी पद्धतीने येते. त्यात त्यांचा शैलीदार जोरकसपणाही आहे आणि रंगांची केलेली वेगळी हाताळणीही आहे. रूढार्थाने आपण ज्याला यश म्हणतो असे यशही माळी सरांना दीर्घकाळ लाभले. १९४० साली त्यांना कलकत्ता अॅकॅडमी ऑफ फाईन आर्टचे सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर माळीसरांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९४४ साली आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रौप्यचषक तर ४५ साली मोर विकणाऱ्या तरुणीच्या चित्रास बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक. या चित्राचे प्रचंड कौतुक आणि माळी सरांचे नाव सर्वतोमुखी झाले. गेल्या पंधरा- वीस वर्षांंत आणखी काही महत्त्वाचे बहुमान माळी सरांच्या दिशेने चालत आले. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रूपधर पुरस्काराचाही समावेश आहे. शरीराच्या थोडय़ा कुरबुरी सुरू झालेल्या असल्या तरी आजही चित्रकलेचा विषय निघाला की, सर तरतरीत होतात. कुणी चित्र दाखवायला गेले की, आजही मार्गदर्शन करतात, प्रसंगी सुनावतातही. त्यांच्या सुनावण्यात आशीर्वाद असतोच, पण मोलाचे मार्गदर्शनही असते. ते टीकाही करतात आणि तेवढय़ाच अधिकाराने चूक सुधारण्याचा मार्गही सांगतात. राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना वयाची शंभरी साजरी करणाऱ्या या दिग्गज चित्रकाराचा राज्य सरकारने यथोचित गौरव केला तर तो राज्याचाच मोठा सन्मान ठरेल. माळी सरांना शताब्दी वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.
August 5, 2017
हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म १ जानेवारी १९११ रोजी झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ यांचं वास्तव्य काही वर्ष मुंबईत होतं. मंजीखाँ फ्रेंचब्रिजजवळच्या हाजी कासमवाडीत राहत.
मल्लिकार्जुन मन्सूरांना तिथे त्यांची तालीम मिळाली. या तालमीविषयी मन्सूर म्हणत असत, “दररोज सकाळी `ते’ तालीम चाले. एक राग कितीही दिवस चालला असला तरी त्याचं रोजचं स्वरुप वेगळंच असे…. मंजीखाँ साहेबांचं गाणं मला नागाच्या विषाप्रमाणे चढलं.” मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ या त्यांच्या भावगीताने त्यांनी एके काळी सार्यां महाराष्ट्राला सुखविले. नाट्यगीते, ठुमर्याण आणि भजने मन्सूर उत्तम गात. पुर्वी ते संगीत कानडी नाटकांतून कामे करीत व आपल्या गायनाने कन्नड रशिकांना मुग्ध करीत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो.
उदा., त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग मल्लिकार्जुन मन्सूर मोठ्या अधिकाराने मांडत. मा.मन्सूर यांचे गाणे म्हणजे विद्वत्ता व रसिकता यांचे सुमधूर संमीलन असे. पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता याबरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती. भारत सरकारने मा.मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.
मध्य प्रदेश सरकारने १९८१ पासून सुरू केलेला, एक लाख रूपायांचा कालिदास सन्मान प्रशस्ती पुरस्कार सर्वप्रथम मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. तद्वतच कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभाग सुरू करून त्या विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले आहे. आपली संगीतविद्या मुक्तपणे मन्सूर तेथे देत असतात. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांनी नन्न रसयात्रे हे आत्मचरित्र झाले आहे, त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरूप्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 1, 2019
उदयनराजे भोसले यांचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी घेतली आहे. १९९० पासून राजकारणात सक्रीय असलेल्या उदयनराजे यांनी सर्वप्रथम १९९१ मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा नपा निवडणूक लढवली होती. तत्कालिन १४ क्रमांकाच्या प्रभातून ते विजयी झाले. १९९६-९७ मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली.
March 1, 2024
अमोल कोल्हे हे मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिकासृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते अभिनय क्षेत्रासोबत राजकारण क्षेत्रातही सक्रिय आहेत. सध्या ते खासदार पदावर कार्यरत आहेत.२०१९ , मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.
October 31, 2020
१९१२ साली ’वीर वामनराव’ जोशी यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३० च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 3, 2017
देशात एक काळ असा होता की प्रत्येक मध्यम वर्गातील कुटुंब बिग बाजारच्या सेलची वाट पाहायचा. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६१ रोजी राजस्थानात झाला. कारण या सेलमध्ये महत्त्वाच्या वस्तूंवर मोठी सवलत मिळायची. 'सबसे सस्ता, सबसे अच्छा', कंपनीची टॅगलाइनची घरा घरात पोहोचली होती.बिग बाजार हे किशोर बियाणी यांचा ब्रांड होता.
रिटेल किंग म्हणून ओळख असलेल्या किशोर बियाणी हे KB या नावाने प्रसिद्ध आहेत. किशोर बियाणी यांचा जन्म राजस्थानमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा एकेकाळी राजस्थानहून धोती आणि साड्यांचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले होते. वयाच्या १४- १५ व्या वर्षी किशोर बियाणी हे मुंबईच्या सेंचुरी मार्केटमध्ये जाऊ लागले होते. अभ्यासात फारसे चांगले नव्हते. वडील आणि दोन चुलतभावांबरोबर काम करायचे, पण किशोर यांना त्यांचा कामाचा अप्रोच आवडला नाही. मग स्वत: ची गिरणी लावून स्टोनवॉश विकायला सुरुवात केली. ते मुंबईतील छोट्या दुकानात विकत असत. त्या काळी, त्यांच्या स्टोअरचा देखील ट्रेड बॉडीत समावेश केला जात नव्हता.
वयाच्या २२ व्या वर्षी मुंबईत किशोर यांनी ट्राऊजर बनवायला सुरुवात केली, जे चालूच होते. १९८७ साली त्यांनी पॅटलूनची सुरूवात केली होती. मॅनस वेअर प्रा. लि. मध्ये पॅटलूनच्या नावावर कपडे विकले जात होते. पॅटलून हे नाव निवडले गेले कारण ते उर्दू शब्द पतलून जवळ होते. ते केवळ निवडक स्टोअरमध्ये विकले गेले.१९९१ मध्ये गोव्यात पहीले पॅटलून दुकान सुरू केले आणि १९९२ मध्ये शेयर मार्केटमधून पैसे जमवले आणि एक ब्रँड तयार केला. पण पैसे कमी पडू लागल्याने २०१२ साली हा व्यवसाय आदित्य बिर्ला ग्रुपला विकला. पॅटलून आणि बिग बाजारची सुरुवात कोलकातामधून झाली होती. २००१ साली बियानी यांनी संपूर्ण देशात बिग बाजार स्टोअर सुरू केले.
किशोर बियानी यांनी गेल्या अनेक वर्षांत सातत्याने कर्ज घेतले आहे. त्यामुळे फ्यूचर रिटेल 105 कोटी रुपये कर्जाचे व्याज परतफेड करू शकले नाही, त्यानंतर या कंपनीच्या डिफॉल्टचा धोका वाढला आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी फ्यूचर ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे कर्ज 12,778 कोटी रुपयांवर गेले होते, जे 31 मार्च 2019 पर्यंत 10,951 कोटी रुपये होते. काही थकीत देयके देण्यासाठी बियाणी यांच्याकडे मार्चपर्यंतची मुदत होती, पण रिझर्व्ह बँकेच्या बंदीने फ्यूचर समूहाला थोडा दिलासा दिला. फेब्रुवारी 2020 च्या मध्यावर, बियाणी यांची कर्जे फेडण्याची क्षमता नसल्याची बाजारात चर्चा होऊ लागली, त्यानंतर कंपनीच्या शेयरमध्ये जोरात घसरण सुरू झाली. यानंतर बियाणी यांच्याकडे कर्जदात्यांनी कर्जाच्या बदल्यात जास्त शेयर मागण्यास सुरवात केली. किशोर बियाणी यांनी त्यांचा रिटेल व्यवसाय सप्टेंबर २०२० मध्ये रिलायन्सला विकला.
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या या कराराची अनेक दिवस चर्चा सुरू होती. हा व्यवहार झाल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरूच आहे. पण बियाणी आणि अंबानी यांच्यात झालेल्या या व्यवहारातील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोघांच्यात झालेल्या करातानुसार किशोर बियाणी आता पुढील १५ वर्ष रिटेल व्यवसाय करू शकणार नाहीत. किशोर बियाणी यांची एक कंपनी आहे ज्याचे नाव Praxis Retail असून ती होम रिटेलचा व्यवसाय करते. Home Town स्टोअर याच कंपनीचे उत्पादन आहे. बियाणी आणि कुटुंब या व्यवसाय करू शकते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये होम टाऊनचा महसूल ७०२ कोटी रुपये इतका होता. रिलायन्स सोबतच्या व्यवहारात फ्यूचर ग्रुपने रिटेलमधील या कंपनीला मात्र विकले नाही. त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
नुकताच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता. त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
February 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti