(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पार्श्वगायक मुकेश

    ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.

      July 22, 2021


  • अरविंद देशपांडे

    अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’

      June 20, 2022


  • ज्येष्ठ नेत्या अहिल्या रांगणेकर

    अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.

      April 19, 2022


  • मंगेश पाडगावकर

    ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.

      December 30, 2015


  • हिंदी चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा

    यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.

      October 21, 2017


  • लेखक आणि पटकथालेखक य. गो. जोशी

    जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती.

      June 27, 2019


  • सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू

    पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता.

      September 25, 2020


  • बॉलिवूडचे अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन

    राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून १९७० मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म ६ सप्टेबर १९४९ रोजी झाला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली.

    'काला बाजार', 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना प्यार है', 'कोई मिल गया', 'क्रिश' या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले. हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 6, 2017


  • हॉलीवुडचे प्रख्यात कथाकार, पटकथाकार सिडने शेल्डन

    त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबऱ्या लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले आणि चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला.

      January 31, 2022


  • कल्याणजी-आनंदजी: बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील एक अजरामर आणि सदाबहार संगीतकार जोडी

    हिंदी चित्रपटसृष्टीच्या (बॉलिवूड) सुवर्णकाळात आपल्या वैविध्यपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अभूतपूर्व जोडी म्हणजे कल्याणजी-आनंदजी. कल्याणजी विरजी शाह (३० जून १९२८ – २४ ऑगस्ट २०००) आणि आनंदजी विरजी शाह (जन्म २ मार्च १९३३) या दोन सख्ख्या भावांनी मिळून ४० वर्षांपेक्षा जास्त काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय काम केले. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुमारे २५० चित्रपटांना संगीतबद्ध केले. मूळचे गुजरातच्या कच्छमधील कुन्द्रोडी गावचे असलेले हे कुटुंब नंतर व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले. बालपणापासूनच संगीताची आवड असलेल्या या दोन्ही भावांनी पुढे जाऊन भारतीय चित्रपट संगीताचा चेहरामोहरा बदलून टाकला.

      August 1, 2026