(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गौतम राजाध्यक्ष

    फॅशनफोटोग्राफी, व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रातल्या विश्वातील अग्रगण्य मराठी नाव म्हणजे “गौतम राजाध्यक्ष”! १६ सप्टेंबर १९५० रोजी मुंबई येथे जन्मलेल्या गौतम राजाध्यक्षांचे घराणे मुळातच बुध्दीवादी व्यक्तींनी संपन्न असल्यामुळे शिक्षण व करियरसाठी उत्तम वाव होता. मुंबईतल्या सेंट झेविअर हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील शिक्षण व याच महाविद्यालयातून बी.एस्सी पर्यंतच पदवीचं शिक्षण गौतमजींनी पूर्ण केले.

      April 18, 2014


  • बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

    पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत असत.

    हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी आग्रा घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.

    १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमाराशी बांधिलकी असते तसेच नोमतोम आलापाने ते राग मांडतात. हळदणकर आपल्या दरबारी, मियाँकी तोडी, मलुहा केदार वगैरे रागांतील चीजांमधून नोमातोम आलाप मांडत असत. बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवत असत. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत असत. हळदणकर आग्रा घराण्याचे भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात होते.

    आग्रा घराणे हे ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्यास बरीच प्रसिद्धी होती. त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती महाराष्ट्रातील हळदणकर बंगालमधील विजय किचलू यांनी मांडली. हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले.. रागांच्या प्रमाणीकरणावरही त्यांनी काम केले. पं. हळदणकर यांचा खूप मोठा शिष्यपरिवार आहे.

    अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत. भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार, कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार असे पं. बबनराव हळदणकर यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.

    पं. बबनराव हळदणकर यांचे १८ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले. बंदिशकार पं. बबनराव हळदणकर यांचे ग्रंथलेखन जुळू पहाणारे दोन तंबोरे

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 18, 2018


  • डॉ. संजीव गलांडे

    डॉ. संजीव गलांडे हे पुणे येथील शास्त्रज्ञ आहेत.

      October 4, 2010


  • लोकगायक प्रल्हाद शिंदे

    २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.

      June 28, 2022


  • सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर

    ‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली तरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत, हे अंतरकरांच्या वाङ्मयीन द्रष्टेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.

    साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. बा. ल. अंतरकर हे कोकणातले एक प्रसिद्ध शिक्षक होते. ते संस्कृत पंडित होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. ‘सरूप शाकुंतल’, ‘मेघदूतच्छाया’ आणि (उमर खय्यामकृत) ‘रुबाया’ हे त्यांचे मराठी अनुवादग्रंथ त्या काळात गाजले होते. अशा व्यासंगी आणि साहित्यिक वडिलांच्या सहवासात अनंत अंतरकरांची साहित्यरुची जोपासली गेली. त्या काळची ‘यशवंत’, ‘रत्नाकर’, ‘मनोरंजन’ यांसारखी साहित्यसंपन्न मासिके त्यांच्या वाचनात होती. अभिजात संस्कृत साहित्यकृतींबरोबरच गडकरी, ह. ना. आपटे, चिं. वि. जोशी, कोल्हटकर, कवी यशवंत, बालकवी यांची साहित्यसंपदाही त्यांनी अभ्यासली होती. वडिलांकडे विद्वज्जनांची ये-जा असल्यामुळे मराठी व इंग्रजी पुस्तकांवर साहित्यचर्चा झडत. त्या कानावर पडून इंग्रजी साहित्याचाही अंतरकरांचा अभ्यास सुरू झाला.

    शाळेत असताना अंतरकरांनी ‘विद्याविनोद’ नावाचे एक हस्तलिखित मासिक हौसेने काढले होते. ते पाहून त्यांचे शिक्षक फाटक यांनी ‘हा मुलगा मोठेपणी उत्तम संपादक होईल’ असे भाकीत केले होते.
    शिक्षणासाठी अंतरकर मुंबईत दाखल झाले. इथे त्यांना अभिनय, नाट्यदिग्दर्शन यांचा छंद जडला, पण साहित्याचे प्रेम प्रबळ ठरले. अंतरकरांनी पत्रकारिता सुरू केली. भिन्न भिन्न प्रकारच्या कथा, कविता, समीक्षापर पुस्तके, नाटके, विडंबन काव्य, विनोद आदींच्या वाचनाने आणि परिशीलनाने त्यांचा साहित्यिक पिंड घडत गेला. शेक्सपिअर, मार्लो, बर्नार्ड शॉ, ओ. हेन्री, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, अॅुगाथा ख्रिस्ती प्रभृती अभिजात साहित्यकारांपासून पी. जी. वुडहाऊस, सॉमरसेट मॉम, ऑर्थर कॉनन डॉयल या लोकप्रिय लेखकांच्या साहित्याचे त्यांनी वाचन केले. मराठीतल्या तत्कालीन नियतकालिकांबरोबरच ‘स्ट्रँड’, ‘व्हरायटी’, ‘अॅागासी’ यांसारख्या अभिरुचिसंपन्न पाश्चाॉत्त्य नियतकालिकेदेखील त्यांच्या नियमित वाचनात होती. जोडीला मराठी नाटके आणि हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती. त्यांचे साहित्य-कलाविषयक शिक्षण अनौपचारिकपणे बरेच पुढे गेले. यातूनच त्यांचे अभिजात संपादकीय व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच काळात त्यांनी विपुल लेखनही केले.

    सतरा-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. 1930 ते 38 या काळात निरनिराळ्या दैनिकांत व साप्ताहिकांत अंतरकरांनी लेखन, वार्तांकन व संपादन केले. त्यांच्या कविता आणि गद्यलेखन ‘संजीवनी’, ‘विहार’, ‘विविधवृत्त’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रभात’, ‘चित्रा’, ‘आशा’, ‘धनुर्धारी’, आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या चौदा टोपणनावांनी ते हे लेखन करीत असत. याखेरीज ‘आकाशवाणी’साठी ते दर आठवड्याला एक श्रुतिकाही लिहीत असत. ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ ही प्रसिद्ध झालेली अंतरकरांची पुस्तके अभिजात विनोदाचा उत्कृष्ट नमुना म्हणून गाजली.

    १९३८ साली, वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ‘सत्यकथा’ या तेव्हा अगदी गंभीर स्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या मासिकाचे ते कार्यकारी संपादक बनले आणि पुढे गाजलेल्या अनेक लेखकांचे उत्तम साहित्य त्यात साक्षेपाने प्रसिद्ध करून त्यांनी त्या मासिकाला आघाडीचे ललित साहित्यिक मासिक बनवले. १९४२ ते ४५ या काळात त्यांनी ‘वसंत’ या मासिकाचे संपादन समर्थपणे केले.
    साहित्यक्षेत्रातील पूर्ण एक तपाच्या तपश्च्र्येनंतर अनंत अंतरकरांना ओढ लागली होती ती स्वत:च्या मालकीचे एक सर्वांगसुंदर आणि अभिरुचिसंपन्न मासिक काढण्याची. आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम करून, प्रसंगी अर्धपोटी राहून थोडीशी पुंजी जमा केली आणि १९४६ मध्ये ‘हंस’ हे स्वत:चे मासिक सुरू केले. ‘हंस’च्या पाठोपाठ अंतरकरांनी १९५० साली विनोदप्रधान ‘मोहिनी’ची स्थापना केली आणि नंतर चार वर्षांनी १९५४ मध्ये सर्वार्थाने नवलपूर्ण अशा ‘नवल’ या मासिकाचा आरंभ केला. याच काळात या मासिकांची कचेरी त्यांनी दुबईहून पुण्याला हलवली.
    ‘हंस’च्या द्वारे कलात्मक कथावाङ्मयाला प्रोत्साहन देऊन त्यांनी यशस्वीरीत्या त्याचे पोषण व संवर्धन केले. नव्याने रूढ होत असलेल्या लघुकथेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन त्यांनी एक नवेच ‘हंसयुग’ मराठी वाङ्मयात प्रस्थापित केले. कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचा पगडा बसू न देता स्वच्छंद कथेच्या स्वायत्त अस्तित्वाला मान्यता देणारे ‘हंस’ हे एकमेव मासिक ठरले. गेल्या काही पिढ्यांतल्या श्रेष्ठसाहित्यिकांची सुरुवात ‘हंस’ व ‘मोहिनी’ या मासिकांमधून झाली आहे.

    ‘हंस’मध्ये कथांबरोबरच श्री. म. माटे, श्री. के. क्षीरसागर, वसंत शांताराम देसाई यांचे वैचारिक व समीक्षात्मक साहित्यदेखील नियमितपणे प्रसिद्ध झाले. विनोदी लेख, कथा, व्यंगचित्रे, नाटक-चित्रपटादी कलांचा आस्वाद यांच्यासाठी ‘मोहिनी’ हे एक दर्जेदार व्यासपीठ त्यांनी निर्माण केले. मुखपृष्ठावरील हास्यचित्र हे मोहिनीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य बनले. विनोदलेखनाच्या विकासात ‘मोहिनी’ने केलेल्या योगदानाची महती सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगितली होती. ‘नवल’मुळे रहस्यमय, भयकारी, विस्मयकारी, विज्ञानाधिष्ठित, आदी आगळ्या आणि उपेक्षित साहित्यप्रकारांना उचित आणि मानाचे प्रतिष्ठान मराठीत प्रथमच प्राप्त झाले. भारतीय साहित्यकोषात तज्ज्ञ अभ्यासकांनी विज्ञानकथेचे अस्तित्व मराठीत टिकवून धरण्याचे श्रेय केवळ ‘नवल’ला दिलेले आहे. रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांनी या मासिकासाठी लिहिलेल्या कथांमध्ये वैचित्र्याबरोबरच साहित्यगुणही होते. वेगळ्या प्रकारचे लेखन करणार्याठ तरुण लेखकांची पिढी ‘नवल’मधून उभी राहिली. मराठी वाङ्मयाच्या विकासाला अंतरकरांच्या अभिजात आणि उदारमनस्क संपादकीय दूरदृष्टीने नेमकी दिशा दिली. त्यांच्या तीनही मासिकांचे आपापले वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप इतके विलोभनीय आणि सौंदर्यसंपन्न होते, की समकालीन नियतकालिकांनी त्यांचे अनुकरण केले. त्यांच्या मासिकांच्या धर्तीची बरीच मासिके पुढे सुरू झाली. केवळ ‘नव’संप्रदायात संकुचितपणाने अडकून न बसणार्याम लघुकथा, गूढकथा, फँटसी, रहस्यकथा, भयकथा यांसारख्या अनेक नवीन कथाविधांचा विकास मराठीत होऊ शकला तो अंतरकरांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच.

    कथेच्या स्वायत्त स्वरूपाचे अंतरकरांनी हिरिरीने रक्षण केले. त्यामुळे जी.ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, द. पां. खांबेटे, वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या अनेक असामान्य लेखकांच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष मराठी साहित्याला संपन्न करते झाले. नवनवीन कथालेखक व कथेबाबतचे नवनवे प्रयोग पुढे आणण्याबाबत अंतरकर नेहमी प्रयत्नशील असत. लेखकांमधील प्रतिभेचा स्फुल्लिंग नेमका हेरणे, तो फुलवणे, लेखकाशी त्याचे लेखन अधिक प्रत्ययकारी कसे होऊ शकेल याबाबत विचारविनिमय करणे, त्याला आणखी कोणत्या प्रकारचे लेखन शक्य होईल याबाबत मार्गदर्शन करणे, प्रसंगी एखाद्याचे लिखाण पूर्णपणे पुन्हा लिहिणे, कथास्पर्धा घेणे, अशा नानाविध प्रकारे नव्या लेखकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य अंतरकरांनी निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक सातत्याने केले. नव्या लेखकांना उपयुक्त ठरेल असा वाङ्मयविचारही त्यांनी आपल्या मासिकांतून- विशेषत: ‘हंस’मधून- विपुल प्रमाणात दिला.

    लेखकांप्रमाणेच वाचकांनाही घडवण्याचे कार्य अंतरकरांना महत्त्वाचे वाटे. वाचकांची साहित्यविषयक दृष्टी अधिक विशाल व जाणती करण्याच्या उद्देशाने अंतरकरांनी एक महत्त्वाचा उपक्रम चालवला, तो म्हणजे श्रेष्ठ अशा परकीय साहित्यकृतींचा मूल्यमापनासहित परिचय. अनेक भारतीय आणि परकीय भाषांतील अभिजात साहित्याचे सरस अनुवादही अंतरकरांनी आपल्या मासिकांतून प्रसिद्ध केले. अनुवादित कथांची स्पर्धा ते आयोजित करीत असत. दर्जेदार जागतिक वाङ्मयाच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार होण्यासाठी आणि त्याचा वेगळ्या दिशेने विकास होण्यासाठी या उपक्रमांचा निश्चिततच हातभार लागला. ‘हंस’-‘मोहिनी’मधील हास्यचित्रांचा दर्जा तत्कालीन इतर मराठी नियतकालिकांमधील हास्यचित्रांच्या तुलनेत फार वरचा होता. अंतरकरांनी अनेक विदेशी मासिकांमधल्या चित्रांची उदाहरणे दाखवून, चर्चा करून हास्यचित्रकारांचे मन:पूर्वक प्रबोधन केले. विदेशी हास्यचित्रांबद्दलचे आस्वादपर लेखही त्यांनी आवर्जून प्रसिद्ध केले. त्यामुळे कमीत कमी व मार्मिक शब्दांचा आधार घेणारी, रेखासुंदर, सुबुद्ध हास्यचित्रे साकार होऊ लागली. सजावट हा अंतरकरांच्या मासिकांचा मानबिंदू होता. मुळातच तल्लख असलेल्या दृश्य सौंदर्यदृष्टीमुळे चित्रकारांच्या कलेला न्याय देणारे उत्तम ले-आऊट्स आणि तंत्राचा अधिकाधिक उपयोग करून साधलेले परिपूर्ण मुद्रण त्यांच्या मासिकांना अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवीत असे.

    स्वत: सर्जनशील लेखक आणि उत्तम चित्रकार असलेले अंतरकर हे मराठीमधील एक दुर्मिळ, निष्ठावंत संपादक. मराठीत सर्वाधिक पुस्तके ज्यांना अर्पण केली गेली आहेत असे एकमेव संपादक.
    अभिरुचिसंपन्न कलात्मकता हा जीवनोद्देश असलेली अंतरकरांची मासिके जाहिरातींचा आधार बाणेदारपणे नाकारूनही, कोणतेही सरकारी अनुदान वा सवलत न घेता, केवळ रसिक वाचकांमधील लोकप्रियतेच्या जोरावर यशस्वी झाली. मराठी वाचकांची कथाभिरुची संपन्न करणार्याक हया द्रष्ट्या संपादकाचे ४ ऑक्टोबर १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अरुणा अंतरकर, हेमलता अंतरकर

      October 9, 2017


  • भारतीय कसोटी पंच स्वरूप किशन

    भारतीय आणि परदेशी खेळाडूंना ‘लेग स्टंप गार्ड’ देण्याची त्यांची पद्धत औरच होती. भारतीयांना मान हलवून तर परदेशींना बोट वर करून ‘लेग’ देत. असे का, हे विचारताच भारतीयांना ‘जपून रहा’ तर इतरांस ‘बाद हो’ असे मनात म्हणायचो, असे ते सांगत.

      July 13, 2021


  • भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन

    केरेन मल्होत्रा हे सनी लियोनचे खरे नाव. भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला. भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन यांचा जन्म १३ मे १९८१ रोजी झाला. सनी सुरूवातीला नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनी लियोनही शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. सनीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचे नाव कॅथलिक शाळेत घातले होते. कारण शीख परिवारात वाढल्यामुळे पब्लिक स्कुलमध्ये सनीला अडचणी येतील असा विचार तिच्या आईवडिलांनी केला होता.

    सनी १५ वर्षांची असतांना तिने पहिला जॉब एका जर्मन बेकरीमध्ये केला होता. मात्र, पेंटहाऊस मॅग्झिनचा फोटोग्राफर जे एलेनला भेटण्यापूर्वी सनी लियोनने ऑरेंज काऊंटीमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनीने २००५ मध्ये एमटीव्ही इंडियाच्या रेड कार्पेटवर रिपोर्टरची भूमिका साकारली होती. ती २००३ मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१० मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते.

    भारतात २०११ मध्ये सनी पहिल्यांदा बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात टीव्हीवर झळकली होती. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले. त्यानंतर तिने सिनेमांत काम करायला सुरुवात केली. बालपणापासूनच सनीची यशस्वी अभिनेत्री होण्याची इच्छा होती. सनी लियोनचे स्वतःचे एका प्रॉडक्शन आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सनलस्ट पिक्चर्स असे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 13, 2019


  • वेदनेचा सुरेल अविष्कार – मदनमोहन

    आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव.

    मदनमोहन यांच्या सर्वंकष संगीताचा विचार करायचा झाल्यास, काही बाबी ठळकपणे नोंदवाव्या लागतील. मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.

    उदाहरणादाखल ‘नैना बरसे’ हे गाणे घेऊया. एक प्रणयगीत म्हणून ऐकताना, नेहमीच्या गझल रचनेचा वापर न करता संगीतकाराने गीताची पारंपरिक धाटणी अंगीकारली आहे; पण तरीही ‘मुखडा’ समोर ठेवत असल्याचा भास निर्माण करून एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, तसेच एकामागोमाग येणार्‍या कडव्यांची पट्टी बदलून केलेले गायन पण तरीही नकळत मूळ पट्टीकडे येणे! पट्टीच्या कानसेनांचे लक्ष वेधून घेणारे आहे.’
    दुसरा विशेष असा सांगता येईल, अशा संगीतकारांच्या गाण्याचे मुखडे गुणगुणत राहावे, असे असतात. तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उत्स्फूर्त वाटणार्‍या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येते. मुळात मदनमोहन यांच्यावर उत्तर भारतीय पण लखनवी परंपरेचा प्रभाव असल्याने उपशास्त्रीय संगीताकडे ओढ असणे स्वाभाविक ठरते. गझलेचे वर्णन करताना, ‘भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार’ या शब्दात केले जाते, आणि याचाच अप्रतिम आविष्कार मदनमोहन यांच्या संगीतात दिसून येतो. कुठलीही समृद्ध गझल काव्य म्हणून ध्यानात घेतली तर त्यात उत्कटता, अभावित सौंदर्यवादी धक्का देण्याची प्रवृत्ती आणि कुठल्याही भावनेचा ‘अर्क’ शोषून घेण्याची शोधक वृत्ती आढळते. त्यामुळे जेव्हा आपण मदनमोहन यांच्या रचना ऐकतो, तेव्हा यावरील गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला नेहमीच प्रत्यय येतो.
    जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देऊनही ज्या थोड्या संगीतकारांना अजिबात व्यावसायिक यश प्राप्त झाले नाही, अशा अत्यंत दुर्दैवी संगीतकारांत मदनमोहन यांचा समावेश करावा लागतो. जरा बारकाईने बघितले तर कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारा संगीतकार, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकला. हा माणूस किती प्रतिभावंत होता, याची ही चार गाणी साक्ष द्यायला पुरेशी आहेत. वास्तविक बघता, सांगीतिक रचनेच्या दृष्टिकोनातून वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन गाण्यांच्या रचना आणि नंतरच्या दोन गाण्यांच्या रचना, यात तसा फारसा फरक नाही!! वेगळ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, रचनेचा मूलभूत ‘ढाचा’ बराचसा मिळताजुळता आहे; पण फरक आहे तो वाद्यसंगीताचा आणि गायकीचा!
    गझल गायकीत जो भोगवादाचा अर्क असतो, त्याचे नितांत रमणीय दर्शन मदनमोहन यांच्या रचनेतून दिसून येते. हाताशी आलेल्या काव्यातील दडलेला आशय तितक्याच समर्पक सुरांतून व्यक्त करण्याची अद्भुत ताकद, या संगीतकाराच्या रचनेतून वारंवार दिसून येते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे गाण्याची रचना करताना ‘धून’ अशी तयार करावी, की त्यातून प्रत्येक वेळी नवीन सांगीतिक वाक्यांश प्रत्ययाला यावेत आणि त्यामुळे, मूळ चालीचे सौंदर्य अधिक विस्तीर्ण व्हावे. मदनमोहन यांची गाणी नेहमी इथे इतरांपेक्षा वेगळी होतात. चित्रपटात जेव्हा केव्हा उठवळ प्रसंगाला साजेसे गाणे करायची वेळ आली, तेव्हा मदनमोहन यांनी केलेल्या रचना केवळ कर्तव्यभावनेने केलेल्या आणि बर्‍याच रुक्ष वाटतात!! आपली प्रवृत्ती अशा गाण्यांना साजेशी नाही, याची पुरती जाणीव मदनमोहन यांना होती आणि त्यामुळे अशी गाणी बांधताना, त्यातील जो उत्स्फूर्तपणा असतो, त्याचा मदनमोहन यांच्या ठायी लवलेश नसतो. कदाचित म्हणूनही या संगीतकाराच्या वाट्याला व्यावसायिक या संज्ञेत बसणारे फारसे चित्रपट आले नसावेत!!
    अर्थात, प्रत्येक संगीतकाराची जशी बलस्थाने असतात, तसे तोकडेपणदेखील असते. तद्वत हॉटेलमधील नृत्यगीतांत वा त्या सदृश गाण्यांत, मदनमोहन अजिबात रमलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर बलस्थाने विचारात घेता, गझलसदृश गाण्यांत मात्र मदनमोहन एकमेवाद्वितीय! अशा गाण्यांत त्यांच्या प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराचे दर्शन घडते. वास्तविक संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतादेखील, ‘यमन’सारख्या चित्रपट संगीतात वारंवार वापरल्या जाणार्‍या रागात, ‘जारे बदरा बैरी जा’, ‘जिया ले गयो जी मोरा सांवरिया’सारख्या अवीट गोडीची ‘तर्ज’ तयार करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे! मदनमोहन यांच्या गाण्यात दुसरे खास वैशिष्ट्य दिसून येते, ते गाण्याच्या चालीसोबत रुणझुणणारा वाद्यमेळ. गायक/गायिकेने जिथे स्वर सोपवला आहे, तिथून वाद्यसंगीताच्या मदतीने तीच लय अधिक विस्तारित करत जायचे, हा या संगीतकाराचा अत्यंत मनोहारी खेळ!! बर्‍याच गाण्यांत हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो. जसे, रस्मे उल्फत को निभाये, तुम जो मिल गये हो... इत्यादी अनेक गाण्यांतून माझ्या म्हणण्याचे वाचकांस प्रत्यंतर येऊ शकेल.
    सुरुवातीला मी जे म्हटले, आपल्याकडे एखाद्या कलाकाराची बूज तो जिवंत असताना फारशी राखली जात नाही, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे गोडवे गाण्याची मात्र अहमहमिका लागते!! मदनमोहन यांच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. म्हणूनच कदाचित, आजही या संगीतकाराचे नाव रसिक गौरवाने घेत असावेत!!
    - अनिल गोविलकर

      September 2, 2018


  • कवयित्री संजीवनी मराठे

    कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणार्‍या संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत.

      February 14, 2018


  • कमलाकर सारंग

    विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले.

      June 12, 2022