जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
२२ फेब्रुवारी स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लॉर्ड बेडन पावेल यांचा स्मृतीदिन. यांचा जन्म दि. २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला.
लॉर्ड बेडन पावेल यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले. १९०७ साली त्यांनी; बालवीर’ चळवळ सुरु केली.थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोडन- पॉवेल यांनी सांभाळली संघटनेच्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्राने मध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देशाना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.
भारतात १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली. १९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्याचे नाव बाय स्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोसीएेयन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.
भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व इतराच्या विषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्देश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ८ जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 29, 2024
शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती.
January 22, 2010
‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला.
रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 'रवींद्र मंकणी' यांची 'स्वामी' या मालिकेत 'माधवराव पेशवे' यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांनी मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या चित्रपटात 'नानासाहेब पेशवे' यांची भूमिका केली आहे.
रविंद्र मंकणी यांच्या २२ जून १८९७ व लिमिटेड माणुसकी या चित्रपटातील भूमिकेबद्दल पुरस्कार मिळाला होता. निवडुंग, स्मृतिचित्रे, वारस लक्ष्मीचा,बंद झरोके हे त्यांचे इतर चित्रपट.
आपला कलाकार या व्यवसायाबरोबरच रविंद्र मंकणी यांची पुण्यात रविराज पब्लीसीटी या नावाने प्रसिध्द अॅड एजन्सी आहे.
रविंद्र मंकणी हे जेष्ठ लेखक द.मा. मिराजदार यांचे जावई. रविंद्र मंकणी यांचा मुलगा सुश्रुत मंकणीसुद्धा चित्रपट सृष्टीत आहे. सुश्रुत याची संगीत अॅकेडमी पण आहे. गजेंद्र अहिरेंच्या 'नातीगोती' या सिनेमात तो पहिल्यांदा झळकला होता. 'स्वराज्य' या सिनेमात निगेटिव्ह भूमिका साकारुन त्याने अभिनयात वेगळी छाप उमटवली. 'ना ना नकोसे' आणि 'गुलमोहोर' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 21, 2017
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले.
April 18, 2022
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.
June 13, 2013
सुचेता दलाल या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्या मध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियां सारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन मधील गडबडी उघडकीस आणल्याच, परंतु त्यांनी ५०० कोटी रुपयांचं ‘बिग बुल’ प्रकरण उघडकीस आल्याने इतिहास घडवला.
January 31, 2022
निवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले
December 15, 2010
श्री के क्षी. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९०१ रोजी सातारा जिल्ह्यातील पाली येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते उर्दू शायरीचे अभ्यासक होते प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.
त्यांनी अनेक सामाजिक व साहित्यिक विषयात अभ्यासपूर्वक लेखन केले. श्री के क्षीरसागर यांचे निधन २९ एप्रिल १९८० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 6, 2017
आज ४ जानेवारी... आज आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस
आज फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी झाला. लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली म्हणून ४ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस साजरा करतात.
लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकर्याकची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत. चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असे आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे. वडिलांचे छोट्या लुईकडे सतत लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूर ठेवत. लुई तीन वर्षांचा असतांना एक दिवस त्याचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादत त्यांची एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले. काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसर्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला. लहानपणापासून लुई स्वावलंबी होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने छोटा लुई अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली. पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला.
लुई ब्रेल यांचे ६ जानेवारी १८५२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 4, 2017
भगवंत गांगल यांचे लेखन हे सहजस्फुर्तीमधून जन्माला आले. लेखनीक व्हायचे या आकांक्षेने ते कधीच जगले नसल्यामुळे, त्यांची लेखणी ही व्यावसायिक ध्येयाने कधीच मुहूर्तरूपात उमटली नाही. त्यात सफाईदारणा किंवा आभ्यासपूर्ण लिखाणामुळे जमून आलेली खमंग फोडणी नव्हती, परंतु मानवी स्वभावाच्या विवीध कडांच्या अचूक चित्रणामुळे, ती रसिकांच्या मनाला मात्र चांगलीच भावली. कथा व कादंबरी या दोन वाचकप्रिय प्रकारांना आपलेसे करून त्यांनी पहिल्यांदा हातात लेखणी धरली होती. त्यातून मध्यमवर्गीयांच्या भावना व मनोजीवनाचे हुबेहूब चित्रण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. नव्या व काहीश्या अपारंपारिक, विचारांची कुपी पहिल्यांदा आपल्या साहित्यातून वाचकांपर्यंत पोहोचवणारे लेखक ही ओळख त्यांना अल्पावधीत मिळाली. नव्या पिढीचे स्पष्ट विचार, पारदर्शीपणे तिच्या तत्वांचा, स्वप्नांचा व आकांक्षाचा आपल्या साहित्यामधून केलेला जिवंत उहापोह, ही खरं तर त्या काळामध्ये त्यांनी उचललेली धाडसी पाऊले होती. त्यामुळे त्यांचे साहित्य हे कर्मठ व सनातनी लोकांच्या पचनी पडलेले नसले, तरी तरूणांनी त्यांच्या साहित्याची पताका नेहमी उंचावरच फडकवत ठेवली.
क्षणचित्रे (१९३८), शल्ये (१९४४), आसवांची माळ (१९३४), पिंजर्यातील पक्षी (१९३८), पाझर (१९४०), रंगाचे घर (१९४४) या कादंबर्यांद्वारे त्यांनी मनुष्यस्वभावाच्या विविधांगी पैलुंचा, त्यांना झालेला साक्षात्कार कलात्मकरितीने रसिकांसमोर मांडला. हे सर्व रसिकांना पटवून देण्यासाठी त्यांनी, अनेक रोचक पात्रांचा व उत्कंठावर्धक परिस्थितींचा परस्परसंबंध मोठया कुशलपणे गुंफला. समाजात आपण पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले, नजरेस पडलेले सांस्कृतिक व नागरी जीवन संक्षिप्तरूपात चितारण्याच्या एकाच ध्येयाने, त्यांनी विपुल लेखन केले. हे ध्येय त्यांच्या साहित्याने काही प्रमाणात पुर्ण केले हे नक्की सांगता येईल. गांगलांनी त्यांच्या अनेक कथांमधून, त्या काळानुरूप विस्फोटक असलेल्या सामाजिक गोष्टींवर बिनधास्त मते नोंदवली. जसे- अधोगती की उध्दार या कथेमध्ये विधवाविवाहाची उपयुक्तता रसिकांमनावर बिंबवण्यासाठी, त्यांनी एक अप्रतिम व ओघवता कथासाचा निर्माण केला होता. आसवांची माळ या कथेतून त्यांनी प्रेमविवाहाचा जाज्वल्य पुरस्कार केला. मनाविरूध्द विवाह घडावून आणल्याने भविष्यात कोणते भीषण परिणाम होऊ शकतात, व प्रत्येक व्यक्तीला इमानाने आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार न दिल्याने कोणती परिस्थिती उद्भवु शकते, हे रसिकांना ह्या कादंबरीने प्रभावीपणे पटवून दिले होते. ही कादंबरी देखील भरपुर वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे नव्या जाणीवेने केलेले स्पष्टवक्ते लेखन हा त्यांच्या कथेचा आत्मा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आसवांची माळ या कादंबरीचा अपवाद सोडला तर पुढील लेखनात त्यांनी साध्या साध्या अर्थपूर्ण प्रसंगांतून घरगुती जिव्हाळ्याचे वातावरण तयार केले. पात्रांच्या वास्तव आणि मनोजीवनाचे धागे एकमेकांमध्ये, कौशल्यपुर्ण प्रसंग रचनेच्या व लक्षवेधी संवादांच्या साहाय्याने गुंतवून, वाचकांना त्या पात्राच्या भावविश्वामध्ये गुंगवून ठेवण्याचे कसब त्यांनी चांगलेच अवगत केले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti