(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • चलबिचल निवारक (संक्षिप्त रूपांतरीत कथा १२)

    त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
    ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिका-याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला.

  • जोडवी – भाग २

    विजय आणि यामिनी बाहेर फिरून रात्री उशिरा घरी येतात… घरातील बंद केलेले दिवे सुरु करतात आणि सोफ्यावर बसतात…

  • रुद्रा – कादंबरी – भाग १५

    राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता.
    “हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!”
    “सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ”
    “धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!”
    “हो, सांगितलं शकीलने.”

  • गेट टुगेदर (कथा)

    स्पृहाचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत अनिकेतने कॉल कट केलासुद्धा. दुपारपासून स्पृहाचं डोकं धरलंय त्यात कालच गुडघा सुजलाय. हल्ली थोडी जरी चाल पडली तरी सुजतो. मग घ्या पेनकिलर. मग अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी. गेल्या दहा वर्षात या सगळ्या दुखण्याची सवय कशी झाली नाही शरीराला असा स्पृहा स्वत:ला प्रश्न विचारी.

  • शंभर मैलांवरची माती (कथा)

    फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं.

  • रुद्रा – कादंबरी – भाग १७

    मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य!

  • माझी घोडसवारी

    साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.

  • गोळी ….

    मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली.

  • ससा

    प्रातिभा आाणि विजयचा नुकताच  विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण  घरच्यांच्या आग्रहाखातर  नाईलाजानं  त्याला तस करावं लागलं  होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने  बहुदा नसावित.

  • करपलेल्या बालपणाचा व्याकुळपट – अरसड

    या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या